शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

US Election 2020: लोकप्रियतेत ज्यो बायडन यांचीच आघाडी, अध्यक्षीय निवडणूक निकालांकडे जगाचे लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2020 06:38 IST

US Election 2020: अभूतपूर्व अशा कोरोना कहराने जगातील एकमेव महासत्ता असलेली अमेरिका त्रस्त असताना अध्यक्षीय निवडणुकीचा कार्यक्रम होत आहे. कोरोना संसर्गामुळे अनेकांनी मुदतीच्या आत मतदान केले आहे, तर अनेकांनी टपाली मतदानाला पसंती दिली आहे.

वॉशिंग्टन : आक्रस्ताळे डोनाल्ड ट्रम्प हवे की, शांत-संयत ज्यो बायडन यांच्या हाती सत्तासूत्रे सोपवावी याचा अंतिम निर्णय आज, मंगळवारी अमेरिकी मतदार घेतील. दरम्यान, लोकप्रियतेत बायडन यांनी ट्रम्प यांना पिछाडीवर टाकल्याचे चित्र विविध कल चाचण्यांतून निदर्शनास येत आहे. त्यामुळे अध्यक्षीय निवडणुकीत कोण बाजी मारतो, याकडे जगाचे लक्ष लागले आहे. अभूतपूर्व अशा कोरोना कहराने जगातील एकमेव महासत्ता असलेली अमेरिका त्रस्त असताना अध्यक्षीय निवडणुकीचा कार्यक्रम होत आहे. कोरोना संसर्गामुळे अनेकांनी मुदतीच्या आत मतदान केले आहे, तर अनेकांनी टपाली मतदानाला पसंती दिली आहे. आतापर्यंत ९ कोटी मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. अध्यक्षपदी कोणाची निवड झाली, हे मतदानानंतर लगेचच समजू शकणार नाही. टपाली मतांची मोजणी करण्यासाठी किमान दोन आठवडे तरी लागणार आहेत. त्यानंतरच चित्र स्पष्ट होईल. मतदानाचा दिवस जसजसा जवळ येऊ लागला आहे, तसतसे अनेक कल चाचण्यांचे अहवाल प्रसिद्ध होऊ लागले आहेत. त्यात आतापर्यंत बायडन आघाडीवर असल्याचे चित्र आहे. अनेक राज्यांनी बायडन यांना झुकते माप दिल्याचे निदर्शनास येत आहे. मात्र, ट्रम्प यांची सारी मदार कुंपणावरच्या राज्यांवर आहे. या कुंपणावरच्या राज्यांपैकी अरिझोना, विस्कॉन्सिन, पेनसिल्व्हेनिया आणि फ्लोरिडा या राज्यांनी बायडन यांना आपली पसंती असल्याचे संकेत दिले.

डॉ. फौची यांची टीकाडॉक्टरांमुळेच कोरोना आटोक्यात येत नसल्याचे सांगत कोरोना कहराचे सारे खापर त्यांच्यावर फोडण्याचा ट्रम्प यांचा प्रयत्न त्यांच्या अंगलट आला आहे. ट्रम्प महोदय या संकटाकडे फारसे गांभीर्याने पाहत नाहीत, हा त्यांचा दृष्टिकोन लोकांसाठी घातक असल्याची टीका अमेरिकेच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ॲलर्जी अँड इन्फेक्शन्स या संस्थेचे प्रमुख डॉ. अँथनी फौची यांनी केली.

मंगळवारी मतदान झाल्यानंतर लगेचच रात्री उशिरापर्यंत अध्यक्ष निवडीची घोषणा होईल. टपाली मतदानाच्या मोजणीपर्यंत वेळ काढणे अशक्य आहे. आम्ही आमच्या वकिलांशी या विषयावर चर्चा करत आहोत.     - डोनाल्ड ट्रम्प,     अमेरिकेचे अध्यक्ष.

टॅग्स :AmericaअमेरिकाUS ElectionAmerica ElectionJoe Bidenज्यो बायडनDonald Trumpडोनाल्ड ट्रम्प