शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
3
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
4
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
5
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
6
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
7
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
8
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
9
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
10
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
11
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
12
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
13
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
14
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
15
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
16
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
17
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
18
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
19
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
20
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर

अमेरिकेकडून भारताला 50 कोटी डाॅलरची मदत, मोदी-बायडेन चर्चेनंतर अवघ्या पंधरा दिवसात मिळाला दिलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2021 06:10 IST

गेल्यावर्षी भारताने अमेरिकेला केलेल्या मदतीची आठवण ठेवून राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी भारताला संपूर्ण सहकार्य करण्याची घोषणा केली होती.

वॉशिंगटन : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकी राष्ट्रपती जो बायडेन यांच्याशी बातचीत केल्यानंतर १५ दिवसांच्या आत अमेरिकेकडून भारताला कोविड-१९ विरोधातील लढ्यासाठी सुमारे ५० कोटी डॉलरचे (सुमारे ३६६८ दशलक्ष रुपये) अर्थसाह्य व वैद्यकीय उपकरणांची मदत मिळाली आहे. गेल्यावर्षी भारताने अमेरिकेला केलेल्या मदतीची आठवण ठेवून राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी भारताला संपूर्ण सहकार्य करण्याची घोषणा केली होती. भारताचा उल्लेख त्यांनी नैसर्गिक मित्र असा केला होता.या १५ दिवसांत अमेरिका सरकारने तर भारताला  मदत केलीच आहे; पण त्याबरोबरच मोठ्या कंपन्या व कंपन्यांच्या सीईओंनी बनविलेला ग्लोबल टास्क फोर्स, अमेरिकी नागरिक आणि अमेरिकेत स्थायिक झालेले भारतीय नागरिक यांनीही मोठ्या प्रमाणात निधी व वैद्यकीय साहित्याची मदत केली आहे. हजारो ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्स आणि इतर वैद्यकीय उपकरणे घेऊन अमेरिकी विमाने दररोज भारतात येत आहेत.अमेरिकेतून मिळालेल्या ५० कोटी डॉलरच्या मदतीपैकी १०० दशलक्ष डॉलरची (७३३.६० दशलक्ष रुपये) मदत बायडेन प्रशासनाची आहे. ७० दशलक्ष डॉलर (५१३.४४८ दशलक्ष रुपये) औषधी कंपनी फायझरची आहे. साडेचार लाख रेमडेसिविरच्या डोसचाही त्यात समावेश आहे. एका डोसची शासकीय खरेदी किंमत  ३९० डॉलर आहे. यूएस इंडिया स्ट्रॅटेजिक अँड पार्टनरशिप फोरमचे अध्यक्ष मुकेश आघी यांनी सांगितले की, या महिन्याच्या अखेरपर्यंत अमेरिकेच्या मदतीचा आकडा १ अब्ज डॉलरवर जाईल.

विविध संस्था आणि व्यक्तींकडून भारताला देण्यात आलेली मदत -- बोईंग - १० दशलक्ष डॉलर- मास्टरकार्ड - १० दशलक्ष डॉर- गुगल - १८ दशलक्ष डॉलर- ग्लोबल टास्क फोर्स - ३०                दशलक्ष डॉलरची उपकरणे- विनोद खोसला - १० दशलक्ष डॉलर- जॉन टी. चेंबर्स - १ दशलक्ष डॉलर- सेवा इंटरनॅशनल - १५ दशलक्ष डॉलर- एएपीआय (भारतीय डॉक्टरांची संघटना ) - ३.६ दशलक्ष डॉलर- इंडियासपोरा -२.५ दशलक्ष डॉलर- जय शेट्टी - ४ दशलक्ष डॉलर- प्रॉक्टर अँड गॅम्बल -  ६.७ दशलक्ष डॉलर- मेर्क - ५ दशलक्ष डॉलर- वॉलमार्ट - २ दशलक्ष डॉलर- सेल्सफोर्स - २.४ दशलक्ष डॉलर- कॅटरपिलर - ३.४ दशलक्ष डॉलर- डेलॉईट - १२ हजार ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्स 

टॅग्स :AmericaअमेरिकाUSअमेरिकाcorona virusकोरोना वायरस बातम्याJoe Bidenज्यो बायडनNarendra Modiनरेंद्र मोदी