शहरं
Join us  
Trending Stories
1
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
2
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
3
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
4
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
5
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
6
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
7
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
8
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
9
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
10
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
11
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
12
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
13
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
14
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
15
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
16
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
17
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
18
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
19
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
20
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
Daily Top 2Weekly Top 5

इकडं संपूर्ण जगात टॅरिफचं टेन्शन, तिकडं ट्रम्प म्हणाले, "मला माझ्या सुंदर केसांची..."; घेतला असा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2025 12:55 IST

ऑर्डवर स्वाक्षरी करताना ट्रम्प गमतीत म्हणाले, माझ्या बाबतीत, मला माझ्या सुंदर केसांची निगा राखण्यासाठी चांगले शॉवर हवे आहे. पण मला 15 मिनिटे उभे रहावे लागते. तेव्हा कुठे केस ओले होतात. हे हास्यास्पद आहे...

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प कधी काय निर्णय घेतील, हे कुणीही सांगू शकत नाही. सध्या एकीकडे अमेरिकेसह संपूर्ण जगात टॅरिफसंदर्भात मोठा गोंधळ उडाला आहे. एक प्रकारचे ग्लोबल ट्रेड वॉर सुरू झाले आहे. यामुळे संपूर्ण जग टेन्शनमध्ये आले आहे. तर दुसरीकडे बुधवारी ट्रम्प यांनी नळाच्या पाण्यासंदर्भातील एका कार्यकारी आदेशावर स्वाक्षरीही केली. यात, अधिकृतपणे शॉवर, सिंक आणि टॉयलेट सारख्या घरगुती गोष्टींसाठी जुने जलसंधारण नियम शिथिल करण्यात आले असल्याचे, म्हणण्यात आले आहे. मात्र, ट्रम्प यांनी हे आपल्या पद्धतीने सांगिते आहे.

"मला 15 मिनिट उभं रहावं लागतं" -खरे तर, डोनाल्ड ट्रम्प यांनी अनेक वेळा तक्रार केली आहे की, अमेरिकेत शॉवर आणि टॉयलेटमध्ये पाण्याचे प्रेशर कमी असते. यामुळे अंघोळ आणि केस धुणेही कठीण होते. ऑर्डवर स्वाक्षरी करताना ते गमतीत म्हणाले, माझ्या बाबतीत, मला माझ्या सुंदर केसांची निगा राखण्यासाठी चांगले शॉवर हवे आहे. पण मला 15 मिनिटे उभे रहावे लागते. तेव्हा कुठे केस ओले होतात. हे हास्यास्पद आहे.

ट्रम्प यांनी यापूर्वीही घेतले आहेत असे निर्णय -व्हाईट हाऊसने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे, " या निर्णयाच्या माध्यमाने ट्रम्प यांनी शॉवरचे स्वातंत्र्य देत आहेत. ओबामा-बायडन यांच्या काळात तयार करण्यात आलेले नियम संपुष्टात आणून सर्वसामान्य अमेरिकीन नागरिकांना दिलासा देत आहेत. ही ऑर्डर टॉयलेट आणि सिंक सारख्या अनेक गोष्टींवर लागू असेल. यापूर्वीही ट्रम्प यांनी बल्ब आणि डिशवॉशरसारख्या उपकरणांसंदर्भातील नियमही शिथील केले होते. यात नंतर ज्यो बायडेन सरकारने बदलही केले होते. 

टॅग्स :Donald Trumpडोनाल्ड ट्रम्पAmericaअमेरिकाUSअमेरिकाWaterपाणी