अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एक नवा कार्यकारी आदेश जारी केला आहे. यानुसार, सोमवारपपासून (८ ऑगस्ट), जे देश अमेरिकेसोबत औद्योगिक निर्यातीसंदर्भात करार करतील, अशा व्यापारी भागीदार देशांना टॅरिफ सूट देण्यात येणार आहे. या सवलतीचा फायदा प्रामुख्याने, निकेल, सोने, औषधी संयुगे आणि रसायने यांसारख्या महत्त्वाच्या गोष्टींवर दिला जाईल. याचा उद्देश, जागतिक व्यापार व्यवस्थेची पुनर्रचना करणे, अमेरिकेची व्यापार तूट कमी करणे आणि व्यापारी भागीदारांना अधिक सौदाबाजीसाठी प्रेरित करणे आहे.
नव्या आदेशात विशेष काय? - ट्रम्प प्रशासनाच्या या आदेशांतर्गत, 45 हून अधिक गोष्टींच्या श्रेणी समाविष्ट करण्यात आल्या आहेत, ज्यांवर सहयोगी भागीदारांना शून्य आयात शुल्क मिळेल. हे असे भागीदार देश असतील, जे अमेरिकेसोबत एक फ्रेमवर्क करारावर स्वाक्षरी करतील आणि ट्रम्प प्रशासनाने लादलेले रेसिप्रोकल टॅरिफ आणि टॅरिफ कमी करण्याचे वचन देतील. हा निर्णय, जापान, युरोपीय संघासह (EU) अमेरिकेच्या विद्यमान सहयोगी देशांशी केलेल्या करारांशीही सुसंगत आहे. ही सूट सोमवारी रात्री 12 वाजल्यापासून लागू होईल.
कोणत्या वस्तूंना सूट दिली जाईल? व्हाईट हाऊसने दिलेल्या माहिती नुसार, ज्या वस्तूंचे उत्पादन अथवा उत्खनन अमेरिकेत नैसर्गितरित्या करता येत नाही, अथवा ज्या गोष्टीचे देशांतर्गत उत्पादन पुरेसे नाही, अशा वस्तूंवर कर कपात लागू होईल. या सवलती दिलेल्या वस्तूंमध्ये नैसर्गिक ग्रेफाइट, विविध प्रकारचे निकेल (जे स्टेनलेस स्टील आणि इलेक्ट्रिक वाहनांच्या बॅटरीसाठी आवश्यक आहेत), लिडोकेन सारखे औषधी संयुगे आणि मेडिकल डायग्नोस्टिक टेस्टींगच्या रियाजेंट्सचा समावेश आहे. याशिवाय, पावडर, पाने आणि बुलियन सारख्या सोन्याच्या विविध वस्तूंचा देखील या सवलतींमध्ये समावेश आहे.या आदेशात काही कृषी उत्पादने, विमान आणि त्याचे भाग आणि पेटंट नसलेल्या औषधी वस्तूंसाठी देखील सूट देण्यात आली आहे. तसेच, या नवीन आदेशाने, प्लास्टिक आणि पॉलिसिलिकॉन (जे सौर पॅनेलसाठी आवश्यक आहे) सह काही पूर्वी दिलेल्या सवलतीही रद्द केल्या आहेत.