अमेरिकेने विकसित केले हायपरसोनिक क्षेपणास्त्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2017 01:25 PM2017-07-23T13:25:53+5:302017-07-23T13:25:53+5:30

नवी दिल्ली, २३ - आज जगातील अनेक देशांकडे अद्यावत क्षेपणास्त्रे आहेत. एका खंडातून दुस-या खंडात काही तासात पोहोचू शकतात अशी क्षेपणास्त्रे अनेक देशांनी विकसित केली आहेत.

US-developed HyperSonic missile | अमेरिकेने विकसित केले हायपरसोनिक क्षेपणास्त्र

अमेरिकेने विकसित केले हायपरसोनिक क्षेपणास्त्र

Next
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली, २३ - आज जगातील अनेक देशांकडे अद्यावत क्षेपणास्त्रे आहेत. एका खंडातून दुस-या खंडात काही तासात पोहोचू शकतात अशी क्षेपणास्त्रे अनेक देशांनी विकसित केली आहेत. दिवसेंदिवस क्षेपणास्त्र तंत्रज्ञान अधिक प्रगत होत असून, त्यांचा टप्पाही वाढत चालला आहे. जिथे एकाबाजूला क्षेपणास्त्राची मारक क्षमता अधिक अचूक करण्यावर काम सुरु आहे त्याचवेळी क्षेपणास्त्र रोधी म्हणजे क्षेपणास्त्र हवेतच नष्ट करण्याचे तंत्रज्ञानही विकसित झाले आहे. क्षेपणास्त्र तंत्रज्ञानात अमेरिका-रशिया हे दोन देश सर्वाधिक प्रगत आहेत. आता अमेरिकेने यामध्ये पुढचा पल्ला गाठला आहे.


हायपरसोनिक क्षेपणास्त्र
या महिन्यात अमेरिकेने आपल्या हायपरसोनिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली. ध्वनिपेक्षा अधिक गतीने हे क्षेपणास्त्र लक्ष्यभेद करते. या क्षेपणास्त्राच्या रेंजमधून सहजासहजी काहीही सुटू शकत नाही. अमेरिका आणि ऑस्ट्रेलियाने संयुक्तपणे हे क्षेपणास्त्र विकसित केले आहे. ऑस्ट्रेलियाच्या वूमेरा येथे या क्षेपणास्त्राची चाचणी करण्यात आली. या क्षेपणास्त्राचा वेग प्रतितास 6 हजार मैल आहे. अत्यंत कमी वेळात शत्रूला कोणतीही संधी न देता हे क्षेपणास्त्र हल्ला करते. ऑस्ट्रेलियाच्या डिफेंस सायन्स अँड टेक्नोलॉजिने या क्षेपणास्त्र चाचणीचा व्हिडीओ जारी केला आहे.
ऑस्ट्रेलिया आणि अमेरिका 2009 पासून या क्षेपणास्त्राच्या निर्मितीवर काम करत होते. स्क्रॅमजेट इंजिनने या क्षेपणास्त्राची चाचणी केली. जी पूर्णपणे यशस्वी ठरली. या इंजिनमुळेच क्षेपणास्त्राला इतकी गती मिळाली. उत्तरकोरियाबरोबर अमेरिकेचा तणाव वाढत असताना केलेली ही क्षेपणास्त्र चाचणी महत्वपूर्ण आहे. अमेरिकेच्या तळावरुन नॉर्थ कोरियापर्यंत पोहोचायला या क्षेपणास्त्राला फक्त 40 मिनिटे लागतील. बी-2 बॉम्बर विमानाला हेच अंतर कापण्यासाठी नऊ तासांचा वेळ लागतो.
चीन आणि रशिया सुद्धा हायपरसोनिक क्षेपणास्त्राच्या तंत्रज्ञानावर काम करत आहे. चीन आपल्या डीएफ-झेडएफ क्षेपणास्त्राचा स्पीड 5 मॅकवरुन 10 मॅक करण्यावर काम करत आहे. चीनने सातवेळा या क्षेपणास्त्राची चाचणी केली. रशिया वाययू-71 क्षेपणास्त्र विकसित करण्यावर काम करत आहे. हे हायपरसोनिक क्षेपणास्त्र आहे.

Web Title: US-developed HyperSonic missile

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.