शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
3
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
4
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
5
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
6
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
7
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
8
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
9
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
10
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
11
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
12
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
13
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
14
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
15
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
16
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
17
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
18
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
19
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
20
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
Daily Top 2Weekly Top 5

"इस्रायलच्या दबावामुळे इराणवर युद्ध लादले"; अमेरिकन अधिकाऱ्याचा मोठा गौप्यस्फोट, चुकीची माहिती दिल्याचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2026 20:08 IST

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनातील एका बड्या अधिकाऱ्याने दिलेल्या राजीनाम्यामुळे जागतिक राजकारणात खळबळ उडाली आहे.

Joe Kent Resign: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या इराणवरील धोरणामुळे घरचा आहेर मिळाला आहे. अमेरिकेच्या नॅशनल काउंटरटेररिझम सेंटरचे प्रमुख जो केंट यांनी मंगळवारी आपल्या पदाचा तडकाफडकी राजीनामा दिला. इराणकडून अमेरिकेला कोणताही धोका नसताना केवळ इस्रायलच्या दबावाखाली येऊन अमेरिकेने हे युद्ध पुकारले आहे, असा गंभीर आरोप केंट यांनी केला आहे.

इस्रायलच्या दबावापोटी युद्ध; जो केंट यांचा आरोप

जो केंट यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आपली भूमिका स्पष्ट केली. "मी अत्यंत विचारपूर्वक हा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे. इराणसोबत सुरू असलेल्या युद्धाला माझा पाठिंबा असू शकत नाही. इराणकडून आपल्या देशाला कोणताही धोका नव्हता. इस्रायल आणि अमेरिकेतील त्यांच्या शक्तिशाली लॉबीच्या दबावामुळे आपण हे युद्ध सुरू केले," असे केंट यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले.

ट्रम्प यांना आठवण करून दिली जुन्या घोषणेची आठवण

केंट यांनी ट्रम्प यांच्या २०१६, २०२० आणि २०२४ च्या निवडणूक प्रचारातील अमेरिका फर्स्ट धोरणाची आठवण करून दिली. "जून २०२५ पर्यंत तुम्हाला याची पूर्ण कल्पना होती की, मध्य पूर्वेतील युद्धे म्हणजे एक प्रकारचा सापळा आहे. या युद्धांमुळे अमेरिकेच्या सैनिकांचा विनाकारण बळी जातो आणि आपल्या देशाची अफाट संपत्ती वाया जाते. तुमच्या पहिल्या कार्यकाळात तुम्ही कासिम सुलेमानीचा खात्मा केला आणि आयसीसला हरवले, पण देशाला कधीही न संपणाऱ्या युद्धात ओढले नाही," असे केंट यांनी म्हटले.

चुकीच्या माहितीचा प्रसार केल्याचा दावा

इराण युद्ध हे एका नियोजित चुकीची माहिती पसरवण्याची मोहीमेचा भाग असल्याचे केंट यांनी म्हटले आहे. इस्रायली अधिकारी आणि अमेरिकन मीडियातील काही घटकांनी ट्रम्प यांची दिशाभूल केली. "ज्याप्रमाणे आपल्याला इराक युद्धाच्या संकटात ओढले गेले होते, त्याच रणनीतीचा वापर करून आता इराणविरोधात युद्ध लादले गेले आहे. हा एक खोटेपणा आहे," असा खळबळजनक दावा त्यांनी केला.

जो केंट हे स्वतः एक माजी सैनिक असून त्यांनी ११ वेळा युद्धभूमीवर सेवा बजावली आहे. त्यांची पत्नी शॅनन या देखील एका युद्धात शहीद झाल्या होत्या. "एक गोल्ड स्टार पती म्हणून, ज्याने आपली पत्नी एका इस्रायल युद्धात गमावली, मी अमेरिकेच्या पुढच्या पिढीला अशा युद्धात ढकलण्यास पाठिंबा देऊ शकत नाही ज्याचा देशाला कोणताही फायदा नाही," असेही केंट म्हणाले.

राजकीय पार्श्वभूमी

जो केंट यांची जुलै २०२५ मध्ये या पदावर नियुक्ती झाली होती. ते कट्टर उजव्या विचारसरणीच्या गटांशी संबंधित मानले जातात. मात्र, ट्रम्प प्रशासनाच्या सध्याच्या आक्रमक इराण धोरणामुळे त्यांनी अवघ्या काही महिन्यांतच पायउतार होण्याचा निर्णय घेतल्याने ट्रम्प यांच्या फॉरेन पॉलिसीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Israel pressure led to Iran war: US official resigns, alleges misinformation.

Web Summary : Joe Kent resigned as counterterrorism chief, alleging US war on Iran was due to Israeli pressure and misinformation. He cited Trump's 'America First' policy, criticizing endless wars and questioning the strategic benefit.
टॅग्स :US Israel Iran Warअमेरिका-इस्रायल-इराण वॉरDonald Trumpडोनाल्ड ट्रम्पAmericaअमेरिकाIsraelइस्रायल