शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना लस घेतली ना, मग नको डिस्टन्सिंग, नको मास्क; अमेरिका भलतीच 'बिनधास्त'

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2021 09:42 IST

US CoronaVirus: अमेरिकेत कोरोना लसीकरणाचा वेग वाढल्यानं दैनंदिन जीवन पूर्वपदावर आणण्याची तयारी सुरू

वॉशिंग्टन: भारतात कोरोना लसीकरण वेगानं सुरू असताना दुसऱ्या बाजूला कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा एकदा वाढताना दिसत आहे. त्यामुळे काही भागांत निर्बंध लागू करण्याची वेळ आली आहे. अमेरिकेत मात्र कोरोनाचा कहर (US CoronaVirus) कमी होताना दिसत आहे. लसीकरणाचा वेग वाढल्यानं प्रशासनानं निर्बंध हळूहळू शिथिल करण्यास सुरुवात केली आहे. लसीकरण पूर्ण झालेल्या व्यक्ती घरात एकत्र जमू शकतात. त्यासाठी मास्क घालण्याची गरज नाही, अशा सूचना आरोग्य अधिकाऱ्यांकडून देण्यात आल्या आहेत. कोरोना लसीकरण पूर्ण झालेल्या व्यक्ती आजाराचा धोका कमी असलेल्या व्यक्तींसोबत घरात एकत्र येऊ शकतात. लसीकरण पूर्ण झालेले वयोवृद्ध त्यांच्या मुलांची आणि नातवंडांची भेट घेऊ शकतात, अशा सूचना साथ नियंत्रण आणि प्रतिबंध केंद्रानं (सीडीसी) सोमवारी जाहीर केल्या. अमेरिकेतही लसीकरण अभियानात ज्येष्ठांना प्राधान्य देण्यात आलं आहे. बहुतांश ज्येष्ठ नागरिकांचं लसीकरण पूर्ण होत आलं आहे. या व्यक्तींना त्यांच्या कुटुंबीयांना भेटता यावं, यासाठी नव्या मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. ...तर कोरोना लसीचा प्रचंड तुटवडा भासणार; सीरम इन्स्टीट्यूटचा केंद्राला इशाराकोरोना लसीकरणाचा वेग वाढल्यानं दैनंदिन जीवन पूर्वपदावर आणण्याच्या दृष्टीनं पावलं टाकण्याची तयारी अमेरिकन प्रशासनानं सुरू केली आहे. दिवसागणिक लसीकरणाचा वेग वाढत आहे. लस घेतलेल्या लोकांची संख्या वाढत आहे. त्यामुळे आता दैनंदिन परिस्थिती बदलण्याचे प्रयत्न आम्ही सुरू केले आहेत, अशी माहिती सीडीसीच्या संचालिक डॉ. रॉशेल वॅलेनस्की यांनी दिली.लस घेतल्यानंतर महिनाभर काळजी घेणे गरजेचे!लसीकरण पूर्ण झालेल्या व्यक्ती सोशल डिस्टन्सिंग, विनामास्क एकत्र येऊ शकतात, अशा सूचना आम्ही दिलेल्या आहेत. दैनंदिन जीवन पूर्वपदावर आणण्याच्या दृष्टीनं हे पहिलं पाऊल आहे. उपचार घेत असलेल्या कोरोना रुग्णांची संख्या आणि मृत्यूदर कमी झाल्यानंतर निर्बंध आणखी शिथिल केले जातील. लसीकरण करण्यात आलेल्या नागरिकांची संख्या वाढल्यावर निर्बंध कमी होतील, असं वॅलेनस्की यांनी सांगितलं.

टॅग्स :Americaअमेरिकाcorona virusकोरोना वायरस बातम्या