अमेरिकेतील कॅलिफोर्नियामध्ये नौदलाचं F-35 फायटर जेट क्रॅश झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हे फायटर जेट नेव्हल एअर स्टेशन लेमूर येथे कोसळलं. नौदलाने याची पुष्टी केली आहे.
बुधवारी पहाटे ४.३० च्या सुमारास ही मोठी दुर्घटना घडली. नौदलाने एका निवेदनात म्हटलं आहे की, दुर्घटनेच्या वेळी पायलटने पॅराशूटद्वारे वेळेवर बाहेर पडून आपला जीव वाचवला. पायलट आता सुरक्षित आहे. या घटनेत कोणीही जखमी झालेलं नाही. दुर्घटनेमागचं कारण अद्याप समोर आलेलं नाही.
F-35 फायटर जेट फायटर स्क्वॉड्रन VF-125 रफ रेडर्सचा भाग होतं. हे युनिट फ्लीट रिप्लेसमेंट स्क्वॉड्रन म्हणून काम करतं, ज्याचं मुख्य काम पायलट आणि एअरक्रूला ट्रेनिंग देणं आहे.
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या दुर्घटनेच्या व्हिडिओमध्ये आग आणि धुराचे लोट उठताना दिसत आहेत. या दुर्घटनेचा नौदल बेस ऑपरेशनवर काय परिणाम झाला हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.