शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
2
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
3
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
4
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
5
डेबिट कार्ड फी, मिनिमम बॅलन्स नसल्यास दंड आणि लेट पेमेंट चार्जेपासून होणार मुक्तता; RBI बँकांवर लगाम लावण्याच्या तयारीत
6
मुलाच्या शाळेतच वडिलांनी सोडला जीव, अर्जावर सही करताना खुर्चीवरून कोसळले आणि...  
7
हाफिज सईदच्या भेटीनंतर पंतप्रधानांनी आभार मानले; दहशतवादी यासीन मलिकच्या शपथपत्रातील अनेक दाव्यांमुळे खळबळ
8
सोडून गेलेले परत आले तरी उमेदवारी नाही, उद्धव ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांसाठी मार्गदर्शक सूचना जाहीर
9
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
10
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
11
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
12
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
13
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
14
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
15
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
16
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
17
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
18
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
19
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
20
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा

हमासवर अमेरिकेची मोठी कारवाई, आर्थिक निर्बंधांसह संघटनेशी संबंधित १० जणांवर बंदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2023 20:03 IST

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी इस्रायलमध्ये जाऊन इस्रायलला पाठिंबा दर्शवला आहे. 

इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्ध आता अत्यंत धोकादायक टप्प्यावर पोहोचले आहे. हमास आणि इस्रायलमधील युद्ध १२ व्या दिवशीही सुरू आहे. गाझा पट्टीतून कार्यरत असलेल्या हमास या दहशतवादी संघटनेने ७ ऑक्टोबर रोजी दक्षिण इस्रायलवर प्राणघातक हल्ला केला होता, त्यानंतर दोन्ही बाजूंमध्ये युद्ध सुरू झाले. या युद्धात दोन्ही बाजूंनी आतापर्यंत चार हजारहून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. दरम्यान, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी इस्रायलमध्ये जाऊन इस्रायलला पाठिंबा दर्शवला आहे. 

हमाससोबतच्या युद्धात अमेरिका पूर्णपणे इस्रायलच्या पाठीशी उभी आहे. अमेरिकन सरकारच्या आदेशानुसार सुमारे २००० अमेरिकन सैनिक आणि युनिट्सना अलर्ट करण्यात आले आहे. अमेरिकेने अनेक प्रसंगी सांगितले आहे की, जोपर्यंत ते अस्तित्वात आहे तोपर्यंत ते इस्रायलची साथ सोडणार नाही. एपीच्या रिपोर्टनुसार, अमेरिकेने हमासच्या १० सदस्यांवर बंदी घातली आहे. यासोबतच अमेरिकेने पॅलेस्टिनी दहशतवागी संघटनेवर आर्थिक निर्बंधही लादले आहेत. या बंदीनंतर ही संघटना गाझा, सुदान, तुर्कस्तान, अल्जेरिया आणि कतारमध्ये आर्थिक क्रियाकलाप करू शकणार नाही. 

दुसरीकडे, इस्रायलने गाझा पट्टीतील अल अहली हॉस्पिटलवर हवाई हल्ला केला होता. या हल्ल्यात ५०० लोकांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले होते. यावर पॅलेस्टाईनचे परराष्ट्र मंत्री रियाद मल्की यांनी गाझा येथील हॉस्पिटलला जाणूनबुजून लक्ष्य केल्याचा आरोप इस्रायलवर  केला आहे. गाझा पट्टीत राहणाऱ्या लोकांची जाणीवपूर्वक हत्या केली जात असल्याचा आरोप त्यांनी केला. दरम्यान, इस्रायली सैन्य गाझामध्ये जमिनीवर हल्ला करण्याच्या तयारीत आहे. याआधी इस्रायली लष्कराने उत्तर गाझामध्ये राहणाऱ्या लोकांना स्थलांतर करण्याचा इशारा दिला होता. त्यामुळे मोठ्या प्रमाणात विस्थापन दिसून आले. 

अमेरिकन नागरिकही उतरले रस्त्यावरगाझा पट्टीवरील हल्ल्यानंतर लेबनानमधील अमेरिकन दूतावासाबाहेर हजारोंचा जमाव जमला होता. या जमावातील लोकांच्या हाती पॅलेस्टाईनचा झेंडा होता. हे लोक अमेरिका आणि इस्रायलच्या विरोधात घोषणाबाजी करत होते. याच वेळी जमावातील काही लोकांनी दूतावासाला आग लावली. एवढेच नाही, तर काहींनी अमेरिकेच्या दुतावासारून अमेरिकेचा झेंडा काढून त्या ठिकाणी पॅलेस्टाईनचा झेंडा लावण्याचाही प्रयत्न केला. याशिवाय, लेबननमध्ये सक्रिय असलेल्या हिजबुल्लाह या दहशतवादी संघटनेने एक दिवसीय बंदची घोषणाही केली आहे. 

टॅग्स :Israelइस्रायलIsrael Palestine Conflictइस्रायल पॅलेस्टाईन संघर्षIsrael-Hamas warइस्रायल - हमास युद्धAmericaअमेरिका