शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

अमेरिकेचे माजी राष्ट्रपती Donald Trump यांना न्यायालयाचा दणका, रोज भरावा लागणार 7 लाख रुपये दंड

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2022 11:10 IST

न्यायाधीश आर्थर एंगोरोन यांनी ट्रम्प यांना रोज 10 हजार डॉलरचा (जवळपास 7.6 लाख रुपये) दंड भरण्याचा आदेश दिला आहे.

अमेरिकेचे माजी राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प हे नेहमीच चर्चेत असतात. आता न्यूयॉर्कमधील अॅटर्नी जनरल यांच्यासोबतच्या एका कायदेशीर प्रकरणात न्यायाधिशांनी सोमवारी त्यांना न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी दोषी ठरवले. याच बरोबर त्यांना मोठा दंडही ठोठावला आहे. 

ट्रम्प यांना मोठा दंड - ट्रम्प, न्यूयॉर्कच्या अटॉर्नी जनरलकडून त्यांच्या व्यवसायिक सौद्याच्या एका चौकशीसंदर्भात जारी करण्यात आलेल्या समनला योग्य प्रकारे उत्तर देण्यास अयशस्वी ठरले, असा आरोप त्यांच्यावर आहे. यानंतर, न्यायाधीश आर्थर एंगोरोन यांनी ट्रम्प यांना रोज 10 हजार डॉलरचा (जवळपास 7.6 लाख रुपये) दंड भरण्याचा आदेश दिला आहे.

ट्रम्प यांच्या संस्थेने आकड्यांसोबत छेडछाड केली, तसेच अनेक रिअल इस्टेट डीलमध्ये टॅक्स कमी करण्याच्या उद्देशाने लोन कव्हरेज अनुकूल करण्याचे काम केले, असे ट्रम्प यांच्या विरोधात सुरू असलेल्या खटल्याच्या तपासातून समोर आले आहे. न्यायालयाच्या या निर्णयाकडे डेमोक्रेट अटॉर्नी जनरल जेम्स यांच्या विजयाच्या स्वरुपात पाहिले जात आहे. जेम्स यांनी ट्रम्प यांच्यावर गेली अनेक महिने समनकडे दुर्लक्ष केल्याचा आरोपही केला होता. 

न्यायालयात दस्तऐवज सादर केले नाही -मॅनहट्टनच्या कोर्ट रूममध्ये निर्णय देण्यापूर्वी एंगोरोन म्हणाले, 'मिस्टर ट्रम्प, आपण आपल्या व्यवसायाप्रती अत्यंत गंभीर आहात, हे मला माहीत आहे. पण मीही माझ्या कामाप्रती गंभीर आहे.' खरे तर, ट्रम्प यांना वेळेत संबंधित दस्तऐवज न्यायालयात सादर करता आले नाही. यासाठी त्यांना मार्चची डेडलाईन देण्यात आली होती. आता न्यायालयाच्या आदेशाचे पालन करेपर्यंत त्यांना हा दंड भरावा लागेल. यातच आपण या निकालाविरोध अपील करू, असे ट्रम्प यांच्या वकिलाने म्हटले आहे.

टॅग्स :Donald Trumpडोनाल्ड ट्रम्पCourtन्यायालयAmericaअमेरिका