शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

रोहिंग्या मुस्लिमांना अमेरिकेने केली 3.2 कोटी डॉलर्सची मदत

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2017 14:23 IST

म्यानमारमधून जिवाच्या भीतीने पळून जाणाऱ्या आणि बांगलादेश व नो मॅन्स लॅंडमध्ये आश्रय घेणाऱ्या रोहिंग्यांना अमेरिकेने 3.2 कोटी डॉलर्सची मदत देऊ केली आहे.

ठळक मुद्दे25 ऑगस्टपासून राखिन प्रांतात सुरु असलेल्या हिंसक हल्ले आणि लष्करी कारवाईमुळे 4 लाख 15 हजार रोहिंग्या, हिंदूंनी पलायन केले आहे. रोहिंग्यांना केलेल्या मदतीसह अमेरिकेने2017 या आर्थिक वर्षामध्ये 9.5 कोटी डॉलर्सची मदत केल्याचे सायमन हेन्शॉव्ह यांनी स्पष्ट केले.

वॉशिंग्टन, दि. 21- म्यानमारमधून जिवाच्या भीतीने पळून जाणाऱ्या आणि बांगलादेश व नो मॅन्स लॅंडमध्ये आश्रय घेणाऱ्या रोहिंग्यांना अमेरिकेने 3.2 कोटी डॉलर्सची मदत देऊ केली आहे.  या मदतीतून संकटात सापडलेल्या रोहिंग्यांना मदत करण्याप्रती अमेरिकेची बांधिलकी व्यक्त होते असे संयुक्त राष्ट्राच्या आमसभेत बोलताना अमेरिकेच्या गृह विभागाचे प्रभारी सहाय्यक सरचिटणीस सायमन हेन्शॉव यांनी सांगितले. अमेरिकेच्या या मदतीमुळे इतर देशही रोहिंग्यांना मदत करण्यासाठी पुढे येतील अशी अपेक्षा सायमन यांनी व्यक्त केली.म्यानमारच्या नेत्या आंग सान सू की यांच्याशी अमेरिकेच्या गृह विभागाचे सचिव रेक्स टिलरसन यांनी चर्चा केल्यानंतर तसेच राखिन प्रांतामधील हिंसा रोखण्यासाठी सू की यांच्या सरकारने व्यक्त केलेल्या बांधिलकीनंतर हा निर्णय घेण्यात आल्याचे अमेरिकेच्या गृह विभागाने स्पष्ट केले आहे. मानवाधिकाराचे झालेले उल्लंघन आणि हिंसा या विषयांकडे लक्ष द्यावे तसेच बाधित क्षेत्रातील गावे सोडून जाणाऱ्या लोकांना मानवतेच्या आधारावर मदत करावी अशी विनंती म्यानमार सरकार आणि लष्कराकडे टिलरसन यांनी केली आहे. या मदतीमुळे बेघर झालेल्या लोकांना तात्पुरती घरे, अन्नसुरक्षा, पोषक आहाराची मदत, मानसिक आधार, पाणी, स्वच्छता, हे लाभ होतील , तसेच 4 लाख लोकांना संरक्षण, मोडकळीस आलेल्या कुटुंबांची पुन्हा बांधणी, आपत्तीची भीती कमी करण्यासाठीही या निधीचा वापर होईल असे गृहविभागाने स्पष्ट केले. रोहिंग्यांना केलेल्या मदतीसह अमेरिकेने 2017 या आर्थिक वर्षामध्ये 9.5 कोटी डॉलर्सची मदत केल्याचे सायमन हेन्शॉव्ह यांनी स्पष्ट केले.

रोहिंग्या का पळून जात आहेत ते माहिती नाही - अाँग सान सू की25 ऑगस्टपासून राखिन प्रांतात सुरु असलेल्या हिंसक हल्ले आणि लष्करी कारवाईमुळे 4 लाख 15 हजार रोहिंग्या, हिंदूंनी पलायन केले आहे. त्यातील लाखो लोक अत्यंत वाईट अवस्थेत उघड्यावर राहात आहेत. त्यांचे आरोग्य, सुरक्षा यांचा मोठा प्रश्न बांगलादेश आणि म्यानमारच्या सीमेवर निर्माण झाला आहे.