शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

दहशतवादी संघटनांवर कारवाई केलीत, तरच मिळेल 255 दशलक्ष डॉलर्सची मदत - अमेरिकेचा पाकिस्तानला इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2017 15:16 IST

अफगाणिस्तानात हल्ले करणाऱ्या देशांतर्गत दहशतवादी संघटनांचा बीमोड केलात तरच 255 दशलक्ष डॉलर्सची लष्करी मदत मिळेल असे अमेरिकेने पाकिस्तानला सुनावले आहे

ठळक मुद्दे2002 पासून आत्तापर्यंत अमेरिकेने पाकिस्तानला 33 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त सहाय्य केले आहेपाकिस्तानचा हक्कानी नेटवर्कला असलेला छुपा पाठिंबा लक्षात आल्यानंतर गेल्या काही वर्षांमध्ये हा मदतीचा ओघ आटला आहे

वॉशिंग्टन, दि. 31 - अफगाणिस्तानात हल्ले करणाऱ्या देशांतर्गत दहशतवादी संघटनांचा बीमोड केलात तरच 255 दशलक्ष डॉलर्सची लष्करी मदत मिळेल असे अमेरिकेने पाकिस्तानला सुनावले आहे. डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाने ही माहिती काँग्रेसला दिली आहे. पाकिस्तानला लष्करी सहाय्य मिळेल, परंतु त्यासाठी दहशतवादाविरुद्ध त्यांनी लढा देण्याची पूर्वअट आहे, असं अमेरिकेने आव्रजून नमूद केलं आहे. थोडक्यात, अमेरिकेने पाकिस्तानसाठी 255 दशलक्ष डॉलर्सच्या लष्करी सहाय्याची तरतूद केली आहे आणि पाकिस्कानने दहशतवादी संघटनांना काबूत ठेवले तरच ती रक्कम त्यांना प्रत्यक्षात मिळेल अशी तजवीज केली आहे.2002 पासून आत्तापर्यंत अमेरिकेने पाकिस्तानला 33 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त सहाय्य केले आहे. परंतु पाकिस्तानचा हक्कानी नेटवर्कला असलेला छुपा पाठिंबा लक्षात आल्यानंतर गेल्या काही वर्षांमध्ये हा मदतीचा ओघ आटला आहे. अफगाणिस्तानमध्ये अमेरिकी सैनिकांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या हक्कानी नेटवर्कला पाकिस्तान सरकारचा पाठिंबा आहे. त्यामुळे अमेरिकेच्या आर्थिक सहाय्याच्या बळावर अमेरिकेच्याच सैनिकांच्या मृत्यूस कारणीभूत ठरायचं असा हा पाकिस्तानचा एकूण प्रकार होता. त्याला चाप लावण्याचा प्रयत्न ट्रम्प प्रशासन करत आहे.गेल्या आठवड्यात डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला उघडं पाडलं आहे. तालिबानसारख्या दहशतवादी संघटनांना पाकिस्तान आश्रय देत असून आता आपण शांत बसू शकत नाही असे ट्रम्प म्हणाले आहेत. या संघटनांचा सगळ्यांनाच धोका असल्याचंही ट्रम्प म्हणाले होते. पाकिस्तानला आपण अब्जावदी डॉलर्स देतो आणि आपण ज्यांच्याशी लढतोय, त्यांना पाकिस्तान संरक्षण देतं असा थेट आरोप ट्रम्प यांनी केला आहे. ही परिस्थिती ताबडतोब सुधारायला हवी असेही त्यांनी सांगितले.पाकिस्ताननं दहशतवादी संघटनांवर कारवाई करायला हवी आणि त्यानंतरच त्यांना सहाय्य करण्यात येईल असे स्टेट सेक्रेटरी रेक्स टिलरसन यांनीही स्पष्ट केले आहे. 

टॅग्स :Donald Trumpडोनाल्ड ट्रम्पPakistanपाकिस्तानBorderसीमारेषा