शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
2
स्कुबा डायव्हिंग करताना ५२ वर्षीय प्रसिद्ध गायकाचा मृत्यू, चाहत्यांना मोठा धक्का
3
परप्रांतीयांना भाड्याने घरं देऊ नका, पंजाबमध्ये ठिकठिकाणी आवाहन; यूपी-बिहारींना हाकलण्याची मागणी
4
"काय अर्थ निघतील, याचाही विचार केला पाहिजे", CM फडणवीसांनी गोपीचंद पडळकरांचे टोचले कान
5
तीन सख्ख्या बहिणींवर नातेवाईकच २०२० पासून करत होता बलात्कार; अहिल्यानगरमधील संतापजनक घटना
6
स्कँडल, कर्ज आणि घसरते शेअर्स... जगातील सर्वात मोठ्या फूड कंपनीला वाचवू शकतील का नवे बॉस?
7
VIDEO: अरे देवा! 'मोटूलाल'ने प्यायली ७२ लाखांची दारू, जमीनही विकली; मुलाखत झाली व्हायरल
8
इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत संघात स्थान का मिळालं नाही? कुलदीपचं गंभीरबाबत मोठं विधान, म्हणाला...
9
'सकाळी उठतात, डोळे चोळत काहीही पोस्ट करतात...', कंगना राणौतचा राहुल गांधींवर पलटवार
10
तुम्हालाही छोट्या छोट्या गोष्टींचा राग येतो, आताच ठेवा ताबा नाहीतर हार्ट अटॅकचे ठराल बळी
11
तुमचा मारुती, ह्युंदाई, टाटावर विश्वास पण डीलर्सचा? या कंपन्या त्यात नाहीच...
12
महायुती सरकारमध्ये सहकारी होण्याचा निर्णय का घेतला? पक्षाच्या चिंतन शिबिरात दादांनी स्पष्टच सांगितलं!
13
कोण होईल रशियाचा पुढचा राष्ट्राध्यक्ष? राजकीय वारसदाराबद्दल व्लादिमीर पुतिन यांचा खुलासा
14
Gold Silver Price 19 September: सोन्याच्या दरात घसरण, पण चांदीच्या किमतीत जोरदार उसळी; कॅरेटनुसार पाहा सोन्याचे नवे दर
15
'हाफिज सईदला भेटलो, याबद्दल मनमोहन सिंग यांनी आभार मानले', यासिन मलिकचा खळबळजनक दावा
16
‘मोहरा’ मध्ये सुनिल शेट्टीसोबत रोमान्स करणारी ही अभिनेत्री आता दिसते अशी, ओळखणंही झालं कठीण
17
अनिल अंबानी यांना दणका; येस बँक कर्ज घोटाळा प्रकरणात CBI कडून चार्जशीट दाखल
18
सेकंड हँड कारच्या किंमती धडाधड घसरल्या...; स्पिनी, कार्स २४ सारखे २ लाखांपर्यंत डिस्काऊंट देऊ लागले...
19
"मोदी-फडणवीसांच्या आईवर बोलले गेले, तेव्हा शरद पवारांनी फोन केला नाही, मी माफी कशासाठी मागू"
20
सरकारी नोकरी मिळवण्याचा गोल्डन चान्स; इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये भरती

एका पठ्ठ्याला सापडलं एक निर्जन घर, आत जाऊन जे पाहिलं त्यानंतर बसला जबरदस्त धक्का

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2021 15:05 IST

एका अर्बन एक्स्प्लोरर डेनिअल सिम्सने अनेक वर्षांपासून बंद असलेल्या घराचे फोटो शेअर केले आहेत. हे घर अनेक वर्षांपासून बंद होतं. जेव्हा डेनिअल या घरात गेले तेव्हा त्यांना असं वाटू लागलं जणू वेळ थांबली आहे.

कोरोनाकाळात जगभरातील अनेक लोकांनी नवनवे अनुभव घेतले आहेत. सुरुवातीला लोकांना आपल्या घरातच बंद राहावं लागलं होतं. यामुळे सोशल मीडियावर अर्बन एक्सप्लोरर्सची (Urban Explorers) संख्या प्रचंड वाढली. हे लोक जगातील त्या ठिकाणी जातात ज्या लोकांच्या नजरेत आलेल्या नसतात. यानंतर तिथले फोटो काढून लोकांसोबत शेअर करतात. अशाच एका अर्बन एक्स्प्लोरर डेनिअल सिम्सने अनेक वर्षांपासून बंद असलेल्या घराचे फोटो शेअर केले आहेत. हे घर अनेक वर्षांपासून बंद होतं. जेव्हा डेनिअल या घरात गेले तेव्हा त्यांना असं वाटू लागलं जणू वेळ थांबली आहे.

हे सुनसान घर यूकेच्या यॉर्कशायरमध्ये (Yorkshire) आढळलं. इंग्लंडच्या हॅडर्सफिल्डमध्ये राहणाऱ्या ३२ वर्षीय डेनिअलची नजर या घरावर पडली होती. खूप आधी त्यांनी या घराबद्दल इतर अर्बन एक्सप्लोरर्सकडून ऐकलं होतं. तेव्हापासून याठिकाणी भेट देण्याची त्याची इच्छा होती. या घराचे दरवाजे उघडल्यानंतर काही वेळ तेदेखील मागील काळातच गेले. त्यांनी या संपूर्ण घराचा व्हिडिओ बनवून आपल्या यूट्यूब चॅनेलवर (Video on Youtube Channel) शेअर केला.

डेली मेलच्या वृत्तानुसार, घरातील एक रूममध्ये अनेक वर्षांपासून बंद असलेलं सामान जशाच्या तशा अवस्थेत दिसलं. घराच्या लिव्हिंग रूममध्ये अनेक वर्षांपूर्वीच वृत्तपत्र आढळलं. सोबतच तिथे अनेक अँटिक वस्तू आढळल्या. रूममध्ये एक जुनी साऊंड सिस्टिमही आढळली. किचनमध्ये हा व्यक्ती गेला असता तिथे एका भांड्यात पाणी होतं. असं वाटत होतं की जणू कोणीतरी चहा बनवण्याची तयारी करत होतं. मात्र चहा बनवण्याआधीच त्याला हे घर सोडावं लागलं. किचनमध्ये अनेक भांडी पडलेली होती.

घराच्या बाथरूममध्ये डेनिअलला अनेक टूथब्रश आढळले. यातील प्रोडक्ट एक्सपायर झालेले होते. यातून हे लक्षात येतं की घरात राहणाऱ्या महिलेला मेकअपची आवड होती. सोबतच घरात अनेक प्रकारच्या बाहुल्याही मिळाल्या. यावरुन घरात लहान मुलंही होती, असं जाणवलं. डेनिअलला हे घर अतिशय भीतीदायक वाटलं (Scary House). घराच्या बेसमेंटमध्ये जाताच डेनिअल हैराण झाला. तिथे अनेक प्रकारचे अँटीक ठेवले होते. ज्याची किंमत मार्केटमध्ये लाखो रूपये आहे.

टॅग्स :Internationalआंतरराष्ट्रीयJara hatkeजरा हटके