शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
9
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
10
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
11
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
12
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
13
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
14
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
15
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
16
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
17
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
18
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
19
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
20
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  

अमेरिकेतील रेस्टॉरंटमध्ये ब्राझीलच्या राष्ट्रध्यक्षांना नो एन्ट्री, फुटपाथवर उभे राहून खाल्ला पिझ्झा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2021 17:14 IST

brazil president bolsonaro not allowed in restaurant : सोशल मीडियावर सध्या व्हायरल फोटोमध्ये ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष जायर बोल्सोनारो न्यूयॉर्कच्या रस्त्यावर फुटपाथवर पिझ्झा खाताना दिसून येत आहेत.

संयुक्त राष्ट्राच्या महासभेच्या (United Nation General Assembly) 76 व्या सत्रात सहभागी होण्यासाठी सर्व देशांचे प्रमुख अमेरिकेत दाखल झाले आहेत. दरम्यान, ब्राझीलचे (Brazil)राष्ट्राध्यक्ष जायर बोल्सोनारो  (Jair Bolsonaro) यांचा अमेरिकेतील एक फोटो समोर आला आहे, जो सध्या सर्वत्र चर्चेत आहे. या फोटोमध्ये जायर बोल्सोनारो फुटपाथवर उभे राहून पिझ्झा खाताना दिसत आहेत.

सोशल मीडियावर सध्या व्हायरल फोटोमध्ये ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष जायर बोल्सोनारो न्यूयॉर्कच्या रस्त्यावर फुटपाथवर पिझ्झा खाताना दिसून येत आहेत. हा फोटो पाहून लोकांच्या मनात प्रश्न उद्भवला आहे की, संयुक्त राष्ट्र महासभेत सहभागी होण्यासाठी अमेरिकेत आलेल्या एका देशाच्या राष्ट्राध्यक्षांच्या मागे असे काय कारण असू शकते, ज्यामुळे ते रस्त्याच्या बाजूला उभे राहून अशा प्रकारे पिझ्झा खात आहेत.

दरम्यान, यामागील कारण आहे कोरोना लस.  अमेरिकेतील हॉटेल्स/रेस्टॉरंटमध्ये प्रवेश करण्यासाठी कोरोना लस घेतल्याचा पुरावा असणे आवश्यक आहे. याशिवाय, तुम्हाला हॉटेल किंवा रेस्टॉरंटमध्ये प्रवेश मिळणार नाही. अशा परिस्थितीत, ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष जायर बोल्सोनारो आणि त्यांच्याबरोबर असलेल्या लोकांना रेस्टॉरंटमध्ये प्रवेश मिळू शकला नाही, कारण त्यांच्याकडे कोरोना लसीकरणाचा कोणत्याच पुरावा नव्हता.

रॉयटर्सने दिलेल्या माहितीनुसार, ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष जायर बोल्सोनारो यांनी अद्याप कोरोनाची लस घेतली नाही. त्यांचे म्हणणे आहे की त्यांची रोगप्रतिकारक शक्ती कोरोना विषाणूशी लढण्यासाठी पुरेशी मजबूत आहे. दरम्यान, ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांच्या शिष्टमंडळात समाविष्ट असलेल्या मंत्र्यांनी रविवारी रात्री न्यूयॉर्कच्या फुटपाथवरील सहकाऱ्यांसह एक फोटो पोस्ट केला होता, ज्यात राष्ट्राध्यक्ष जायर बोल्सोनारो देखील पिझ्झा खात होते.

टॅग्स :AmericaअमेरिकाCorona vaccineकोरोनाची लसBrazilब्राझील