शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

लोकांना संक्रमित करण्यासाठी अमेरिका तयार करतोय नवा कोरोना व्हायरस

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2020 06:41 IST

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी अमेरिकेने एक नवीन कोरोना व्हायरस स्ट्रेन तयार करायला सुरु वात केली आहे. त्याच्या सहाय्याने लस घेणाऱ्या स्वयंसेवकांना जाणुनबुजून संक्रमित करण्यात येऊ शकते.

वॉशिंग्टन : अमेरिकेत लाखो नागरिक कोरोनाबाधित असल्याने अमेरिकेने त्यांनी तयार केलेली कोरोनावरील लस प्रभावी आहे की नाही, हे समजण्यासाठी अमेरिका सध्या प्रयत्नशील आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी अमेरिकेने एक नवीन कोरोना व्हायरस स्ट्रेन तयार करायला सुरु वात केली आहे. त्याच्या सहाय्याने लस घेणाऱ्या स्वयंसेवकांना जाणुनबुजून संक्रमित करण्यात येऊ शकते.रॉयटर्सने दिलेल्या वृत्तानुसार, अमेरिकन सरकारच्या आरोग्य संस्थेने म्हटले आहे की ह्युमन चॅलेंज ट्रायलसाठी काम सुरू करण्यात आले आहे. सामान्यपणे लसीच्या परिक्षणादरम्यान स्वयंसेवकांना डोस देण्यात येतो आणि ते व्हायरसच्या संपर्कात येण्याची वाट पाहिली जाते. लोक व्हायरसच्या संपर्कात आल्यानंतर त्यांच्यावर झालेल्या परिणामांचा अभ्यास केला जातो. जर ते आजारी पडले नाही तर लस यशस्वी असल्याचे समजण्यात येते.मात्र, लस घेतलेला स्वयंसेवक व्हायरसच्या संपर्कात येण्यास उशीर होऊ शकतो. परिणामी परिक्षणही उशिरा होते. परंतु, आणखी विलंब होणे परवडणारे नसल्याने अमेरिकेने एक नवा कोरोना व्हायरस स्ट्रेन तयार करून स्वयंसेवकांवर संक्रमित करण्यावर काम सुरू केले आहे. याला ह्युमन चॅलेंजट्रायल असे म्हटले जाते. मात्र अमेरिकेची ही ह्युमन चॅलेंज ट्रायल सध्या वादाच्या भोवºयात आली आहे. कारण ह्युमन चॅलेंज ट्रायलमध्ये सहभागी होणाºया स्वयंसेवकांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. कारण लस परिणामकारक आहे, याची खात्री नसते.>रॉयटर्सने दिलेल्या माहितीनुसार, अमेरिकेत नवा कोरोना व्हायरस स्ट्रेन तयार करण्याचे काम प्राथमिक टप्प्यावर असून जर ह्युमन चॅलेंजला परवानगी मिळाली तर ही ट्रायल आधीपासून सुरू असलेल्या फेज-३ ट्रायलपेक्षा वेगळी असेल. लस तयार करणारी कंपनी एस्ट्राजेनेका आणि जॉन्सन अँड जॉन्सनने म्हटले आहे की, आवश्यकता भासल्यास ह्युमन चॅलेंज ट्रायलवर विचार केला जाईल.कोरोना व्हायरसवर अद्याप कसल्याही प्रकारची लस किंवा औषध सापडले नसल्याने ह्युमन चॅलेंज ट्रायल धोकादायक असल्याचे मानण्यात येत आहे. मात्र, वैज्ञानिकांनी मूळ कोरोना व्हायरसच्या तुलनेत कमी धोकादायक स्ट्रेन तयार केल्यास ह्युमन चॅलेंज ट्रायलला परवानगी मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या