शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
2
राहुल गांधींच्या सुरक्षेत मोठी चूक; तरुण Kiss घेऊन पळाला, व्हिडिओ व्हायरल...
3
आता त्या गोष्टीवर मी काहीच बोलणार नाही; सचिन-द्रविड अन् MS धोनीचं नाव घेत पुजारा म्हणाला की,..
4
आईस्क्रीम विक्रेत्याला कॉलेज प्लेसमेंटमधून १.८ कोटींचं पॅकेज? व्हायरल Video मागचं 'सत्य'
5
सासू केस ओढून मारायची, पती हुंडा घेऊन...; निक्कीच्या आईने जावयाबद्दल केला धक्कादायक खुलासा!
6
"वडिलांच्या नवीन मर्सिडीजवर विपिनची नजर, ६० लाखांची मागणी", निक्कीच्या भावाने मांडली व्यथा
7
दुसरे घर घेण्याचा विचार करताय? आधी ‘या’ महत्त्वाच्या गोष्टी तपासा, अन्यथा होईल मोठं नुकसान!
8
बायकोला जिवंत जाळल्याचा आरोप असलेल्या पतीची पहिली प्रतिक्रिया, पत्नीच्या हत्येमागील कारण काय सांगितले?
9
पहिल्यांदाच मिझोरममध्ये पोहोचली रेल्वे; १४२ पूल अन् ४८ बोगद्यांद्वारे तयार झाला मार्ग...
10
निवृत्तीनंतर चेतेश्वर पुजाराला BCCI किती पेन्शन देणार? निवृत्त वेतनासाठी कोणतं सूत्र वापरतात?
11
खुशखबर...! पुढच्याच महिन्यात मारुती नवी धाकड SUV आणणार; क्रेटा, सेल्टोसला थेट टक्कर देणार, किंमतही असणार या सर्वांपेक्षा कमी!
12
ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही रशियाचे युक्रेनवरील हल्ले सुरूच, दोन गावांवरही कब्जा!
13
नेतन्याहू यांचा 'कंट्रोल गाझा' प्लॅन सुरू! इस्रायली हल्ल्यात ६३ जणांचा मृत्यू; पुढे काय होणार?
14
गर्भवती पत्नीची निर्घृण हत्या, मृतदेहाचे तुकडे करून पतीने लपवले; धक्कादायक घटनेने परिसर हादरला!
15
"रोज म्हणतात व्होट चोरी... व्होट चोरी..., यांचं डोकं चोरी झालंय!" देवेंद्र फडणवीस यांचा विरोधकांवर हल्लाबोल; स्पष्टच बोलले
16
३० वर्षीय पत्नीने प्रियकरासोबत रचला कट, ६० वर्षीय पतीला जंगलात नेऊन आवळला गळा
17
घसा खूपच खवखवतोय अन् खोकलाही जाता जाईना... 'या' ६ गोष्टी आहेत रामबाण उपाय
18
५,००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल लखपती? जाणून घ्या १५ वर्षांत किती परतावा मिळेल
19
"मर्यादेत राहा...!"; आशिया कपमध्ये भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी वसीम अक्रमचा इशारा, नेमकं काय म्हणाला?
20
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी ६८ अर्ज; अनेक खासदारांच्या बनावट स्वाक्षरी केल्याचे उघड

अमेरिका, ब्रिटन इबोलाला रोखण्यासाठी सरसावले

By admin | Updated: September 10, 2014 05:57 IST

पश्चिम आफ्रिकेतील इबोला आजाराला रोखण्यासाठी अमेरिका व ब्रिटन तेथे वैद्यकीय साहित्य व सैनिक पाठविणार आहे.

मोनरोविया : पश्चिम आफ्रिकेतील इबोला आजाराला रोखण्यासाठी अमेरिका व ब्रिटन तेथे वैद्यकीय साहित्य व सैनिक पाठविणार आहे. दरम्यान, जागतिक आरोग्य संघटनेने इबोलाचे हजारो नवे रुग्ण येत्या काळात लायबेरियामध्ये समोर येऊ शकतात, अशी भीती व्यक्त केली आहे.आतापर्यंतच्या नोंदीनुसार इबोलाचा सध्या झालेला हल्ला हा महाभयंकर आहे. गिनी येथून इबोलाची साथ सुरू झाली व ती सिएरा लिओन, लायबेरिया, नायजेरिया आणि सेनेगलमध्ये पसरली आहे. इबोलाने गेल्या आठ महिन्यांत २,३00 नागरिकांचा बळी घेतला आहे. इबोलाची सर्वाधिक लागण झालेल्या देशांमध्ये येत्या काळात नवे रुग्ण समोर येण्याची भीती संघटनेने व्यक्त केली आहे. इबोलावरील उपचारांसाठी नवे केंद्र सुरू करताच तेथे मोठ्या संख्येने रुग्ण येतात, त्यावरून हे लक्षात येते की, अंदाजापेक्षाही किती तरी जास्त रुग्ण आहेत, असे संघटनेने निवेदनात म्हटले आहे.इबोलाची लागण आतापर्यंत ३५०० जणांना झाली असून त्यातील निम्मे रुग्ण हे लायबेरियातील आहेत. या आजाराने मोठ्या संख्येने मृत्यूही झाले आहेत. अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी रुग्णांची मदत करणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांना संरक्षण दिले जाईल, असे सांगितले. इबोला रुग्णांवर उपचार करणाऱ्या मोठ्या संख्येने आरोग्य कर्मचाऱ्यांनाही त्याची लागण झाली आहे. या कर्मचाऱ्यांच्या उपचारांसाठी लायबेरियाच्या राजधानीत लष्कराचे जवान २५ खाटांचे रुग्णालय सुरू करतील. स्थापनेनंतर रुग्णालयाची जबाबदारी लायबेरिया सरकारकडे सोपविली जाईल. अमेरिकेच्या या पुढाकाराचे लायबेरियाने स्वागत केले आहे. हे युद्ध एकट्या लायबेरियाचे नाही. हे युद्ध असे आहे की, सगळ्या जगाने यात गांभीर्याने एकत्र येऊन सर्व प्रकारचे सहकार्य केले पाहिजे, असे लायबेरियाचे सूचना मंत्री लेव्हिस ब्राऊन यांनी म्हटले. ब्रिटन लायबेरियात ६५ खाटांचे रुग्णालय स्थापन करणार आहे. या रुग्णालयाची व्यवस्था सैन्याचे अभियंते व वैद्यकीय कर्मचारी करतील. (वृत्तसंस्था)