शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

रोहिंग्याविरोधातील हिंसाचार रोखण्यासाठी म्यानमारवर संयुक्त राष्ट्राचा दबाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2017 10:56 IST

सुरक्षा परिषदेने एकमुखाने म्यानमारमध्ये सुरु असलेल्या हिंसाचाराचा निषेध केला. तसेच या हिंसात्मक वातावरणामध्ये होत असलेल्या मानवाधिकारांच्या उल्लंघनाचाही निषेध करण्यात आला.

ठळक मुद्देआंग सान सू की यांनी गेल्या आठवड्यात उत्तर राखिन प्रांताचा दौरा केला. ऑगस्ट महिन्याच्या अखेरीपासून उफाळलेल्या असंतोष, जाऴपोळीच्या सत्रानंतर आंग सान सू की यांच्यावर चहूबाजूंनी टीका होत होती.आंग सान सू की यांना दक्षिण आफ्रिकेचे आर्चबिशप डेस्मंड टूटू यांनी पत्र लिहून राखिन प्रांतात शांतता प्रस्थापित करावी अशी विनंती केली आहे.

न्यू यॉर्क- म्यानमारच्या राखिन प्रांतात रोहिंग्यांविरोधात सुरु असणाऱ्या हिंसाचाराला व गोंधळाच्या वातावरणाला तात्काळ शांत करावे असे संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेने म्यानमारला सांगितले आहे. तसेच राखिनमधील लष्करी कारवाईलाही आता आवरते घेण्याच्या सूचना केल्या आहेत. सुरक्षा परिषदेने एकमुखाने म्यानमारमध्ये सुरु असलेल्या हिंसाचाराचा निषेध केला. तसेच या हिंसात्मक वातावरणामध्ये होत असलेल्या मानवाधिकारांच्या उल्लंघनाचाही निषेध करण्यात आला. म्यानमार लष्कराच्या कारवाईमध्ये रोहिंग्यांवर हत्या, स्त्रियांवर बलात्कार, घरे जाळणे अशा प्रकारचे निषेध झाल्यामुळे त्याचीह तीव्र शब्दांमध्ये संयुक्त राष्ट्राने निषेध केला आहे आणि रोहिंग्याच्या सुरक्षेप्रती काळजी व्यक्त केली आहे. तसेच म्यानमार सरकारने राखिनमधील लष्करी कारवाई थांबवून तेथे कायदा आणि सुव्यवस्था पुन्हा प्रस्थापित करावी अशा सूचनाही केल्या आहेत. या निवेदनामध्ये मागच्या महिन्यात फ्रान्स आणि इंग्लंडने केलेल्या सुचनांचाही समावेश आहे.सध्या बांगलादेशात गेलेल्या रोहिंग्यांना तेथे स्वच्छतेचे प्रश्न, शुद्धध पाणी तसेच औषधांचा तुटवडा अशा अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. गेल्या आठवड्यामध्ये भारताच्या परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसिना वाजेद यांची भेट घेतल्यानंतर म्यानमारला आपल्या नागरिकांना माघारी बोलवावेच लागेल असे विधान केले होते. चार दिवसांपुर्वीच आंग सान सू की यांना दक्षिण आफ्रिकेचे आर्चबिशप डेस्मंड टूटू यांनी पत्र लिहून राखिन प्रांतात शांतता प्रस्थापित करावी अशी विनंती केली आहे. संपुर्ण जग तुला अन्यायाविरोधात लढणारी, स्वातंत्र्यासाठी लढणारी म्हणून आदर्श मानते. तुमच्या देशात चालू असलेला विवाद लवकर मिटवावा अशी अपेक्षा टूटू यांनी व्यक्त केली आहे.म्यानमारच्या स्टेट कौन्सिलर आंग सान सू की यांनी गेल्या आठवड्यात उत्तर राखिन प्रांताचा दौरा केला. ऑगस्ट महिन्याच्या अखेरीपासून उफाळलेल्या असंतोष, जाऴपोळीच्या सत्रानंतर आंग सान सू की यांच्यावर चहूबाजूंनी टीका होत होती. सू  की या प्रकरणामध्ये कोणतीही भूमिका घेत नसून त्या रोहिंग्याच्या संरक्षणामध्ये कमी पडत आहेत अशी टीका त्यांच्यावर आंतररराष्ट्रीय समुदायाकडूनही होत होती. 24 ऑगस्टपासून राखिन प्रांतातून 6 लाख रोहिंग्या बांगलादेशाच्या दिशेने पळाल्याचे सांगण्यात येते. म्यानमारच्या लष्कराकडून होणारी कथित कारवाई, बलात्कार, जाळपोळ आणि हत्या यांना घाबरून ते देश सोडून गेल्याचे सांगितले जाते.

टॅग्स :Rohingyaरोहिंग्या