Donald Trump Volodymyr Zelensky: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी बुधवारी (१९ फेब्रुवारी) युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमीर झेलेन्स्की यांच्यावर तिखट शब्दात टीका केली. विना निवडणुकीचा हुकुमशाह असे ट्रम्प झेलेन्स्कींना म्हणाले. झेलेन्स्कींनी रशिया आणि अमेरिका यांच्यातील बैठकीला विरोध करत ट्रम्प रशियाच्या दुष्प्रचाराखाली असल्याचे म्हटले होते. त्यानंतर ट्रम्प झेलेन्स्कींवर भडकले.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी केलेल्या टीकेला उत्तर देताना डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, "जरा विचार करा, एका छोटा यशस्वी कॉमेडियन, वोलोडिमीर झेलेन्स्की यांनी अमेरिकेला ३५० बिलियन डॉलर्स खर्च करण्यासाठी तयार केले, एका अशा युद्धासाठी जे जिंकले जाऊ शकत नव्हते. जे युद्ध कधीही सुरू व्हायला नको होते. पण, आता हे युद्ध अमेरिका आणि ट्रम्पशिवाय कधीही थांबवले जाऊ शकत नाही."
झेलेन्स्की हुकुमशाह -डोनाल्ड ट्रम्प
फेब्रुवारी २०२२ मध्ये रशियाच्या हल्ल्यामुळे युक्रेनने २०२४ मध्ये होणाऱ्या निवडणुका स्थगित केल्या होत्या. त्याला उद्देशून डोनाल्ड ट्रम्प झेलेन्स्कींना "विना निवडणुकीचा हुकुमशाह", असे म्हणाले.
झेलेन्स्कींचा आक्षेप काय?
मंगळवारी (१८ फेब्रुवारी) सौदी अरेबियातील रियादमध्ये रशिया आणि अमेरिकेमध्ये एक बैठक झाली. ज्यामध्ये रशिया-युक्रेन युद्ध थांबवण्याबद्दल चर्चा करण्यात आली. ही बैठक युक्रेन-रशिया युद्धाबद्दल होती, तर युक्रेनलाही त्यात सहभागी करून घ्यायला हवे होते, अशी भूमिका झेलेन्स्कींनी घेतली. युक्रेनला सहभागी करून घेतल्याशिवाय कोणताही निर्णय स्विकारणार नाही, असे ते म्हणाले.
डोनाल्ट ट्रम्प हे रशियाच्या अपप्रचाराचे बळी ठरले आहेत, अशी टीकाही झेलेन्स्कींनी केली. त्यानंतर ट्रम्प झेलेन्स्कींना कॉमेडियन म्हणाले.