शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
8
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
9
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
10
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
11
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
12
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
13
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
14
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
15
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
16
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
17
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
18
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
19
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
20
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus: संयुक्त राष्ट्रसंघाकडून भारताची प्रशंसा; मदतीचे कौतुक

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2020 06:56 IST

अमेरिकेसह ५५ देशांना औषधपुरवठा

संयुक्त राष्ट्रे : कोरोनाच्या मुकाबल्यासाठी इतर देशांना मदत करत असल्याबद्दल संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनिओ गुटेरस यांनी भारताचे कौतुक केले आहे. हायड्रॉक्झिक्लोरोक्वीन हे औषध भारताने अमेरिकेसह काही देशांना पाठविल्यानंतरच्या दुसऱ्या दिवशी गुटेरस यांनी हे गौरवोद्गार काढले आहेत.मलेरियावर वापरले जाणारे हायड्रॉक्झिक्लोरोक्वीन हे औषध कोरोनावरील उपचारांसाठीही उपयुक्त असल्याचे अमेरिकेच्या अन्न व औषध विभागाने म्हटले होते. या औषधाचा प्रयोग न्यूयॉर्कमधील १५०० रुग्णांवरही करण्यात आला होता.हायड्रॉक्झिक्लोरोक्वीनवरील निर्यातबंदी भारताने काही दिवसांपूर्वी मागे घेतल्यानंतर या औषधाच्या मागणीत लक्षणीय वाढ झाली होती. या पार्श्वभूमीवर गुटेरस म्हणाले की, कोरोना विषाणूविरोधात जगभरातील लढ्यामध्ये मदत करण्याची क्षमता असलेल्या प्रत्येक देशाने दुसºया देशाला सहकार्य केले पाहिजे.देशात औषधांचा पुरेसा साठा आहे याची नीट खात्री केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हायड्रॉक्झिक्लोरोक्वीनसह १४ औषधांच्या निर्यातीवरील बंदीउठविली होती. त्यानंतर हायड्रॉक्झिक्लोरोक्वीन अनेक देशांना निर्यात करण्याचा निर्णय भारताने घेतला. (वृत्तसंस्था)हायड्रॉक्झिक्लोरोक्वीन औषधावरून अमेरिकेने दिला होता इशाराभारत हायड्रॉक्झिक्लोरोक्वीन हे औषध अमेरिकेसह ५५ देशांना पाठवत आहे. ते काही देशांना मदतस्वरूपात तर काही देशांमध्ये व्यावसायिक विक्री तत्त्वावर पाठविण्यात येणार आहे. हायड्रॉक्झिक्लोरोक्वीन अमेरिकेला पाठवावे म्हणून राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दूरध्वनी करून विनंती केली होती. त्यानंतर काही दिवसांनी ‘हायड्रॉक्झिक्लोरोक्वीन औषध अमेरिकेला न पाठविल्यास भारताला गंभीर परिणाम भोगावे लागतील’ असे ट्रम्प म्हणाले होते.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याunited nationsसंयुक्त राष्ट्र संघ