शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

Russia vs Ukraine War: आक्रमकांना एकत्र रोखुया! युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्कींचा पंतप्रधान मोदींना फोन; मदतीचं आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2022 19:02 IST

Russia vs Ukraine War: बलाढ्य रशियाचा सामना करण्यासाठी युक्रेनला हवीय भारताची मदत

नवी दिल्ली/कीव: बलाढ्य रशियाचा सामना करताना युक्रेनची वाताहत झाली आहे. अनेक शहरांवर हल्ले होत आहेत. रशियन सैन्य राजधानी कीवपर्यंत शिरलं आहे. कीव ताब्यात घेण्यासाठी रशियन फौजांचे प्रयत्न सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी संवाद साधला आहे. 

मोदी यांच्यासोबत संवाद साधून त्यांच्याकडे मदतीची मागणी केल्याची माहिती झेलेन्स्की यांनी ट्विट करून दिली आहे. 'पंतप्रधान मोदी यांच्याशी संवाद साधला. रशियाचे १ लाखाहून अधिक हल्लेखोर आमच्या भूमीवर असून ते नागरी वस्त्यांना लक्ष्य करत असल्याची माहिती त्यांना दिली. सुरक्षा परिषदेत राजकीय पाठिंबा देण्याची विनंती त्यांच्याकडे केली. आक्रमकांना एकत्र येऊन रोखुया,' असं झेलेन्स्की यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की आणि पंतप्रधान मोदी यांच्यात झालेला संवाद महत्त्वाचा मानला जात आहे. रशिया-युक्रेन युद्धाबद्दल भारतानं तटस्थ भूमिका घेतली. त्याबद्दल युक्रेननं नाराजी व्यक्त केली. अमेरिकेसह युरोपियन देशांनी रशियाचा निषेध केला असला तरीही कोणत्याही देशानं युक्रेनच्या मदतीला लष्कर पाठवलेलं नाही. भारत आणि रशियाचे संबंध उत्तम आहेत. त्यामुळे झेलेन्स्की यांनी मोदींशी साधलेला संवाद महत्त्वपूर्ण आहे. संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेत भारतानं युक्रेनची साथ द्यावी, अशी विनंती झेलेन्स्की यांनी केली आहे. पंतप्रधान मोदी आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्यामध्ये दोनच दिवसांपूर्वी संवाद झाला. जवळपास २० ते २५ मिनिटं दोन नेत्यांमध्ये चर्चा झाली. युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांच्या सुरक्षेचा आणि त्यांच्या घरवापसीचा मुद्दा यावेळी मोदींनी उपस्थित केला. युक्रेनसोबतचा वाद चर्चेतून सोडवावा, यावर मोदींनी जोर दिला होता.

टॅग्स :Russia Ukrainयुक्रेन आणि रशियाVladimir Putinव्लादिमीर पुतिनNarendra Modiनरेंद्र मोदी