शहरं
Join us  
Trending Stories
1
Apple Awe Dropping Event : Apple नं लाँच केला सर्वात स्लीम iPhone 17 Air! जाणून घ्या, किंमत अन् संपूर्ण स्पेसिफिकेशंस
2
Asia Cup 2025: कधी अन् कुठं पाहता येईल IND vs UAE मॅच? कसा आहे दोन्ही संघांमधील हेड-टू-हेड रेकॉर्ड?
3
iPhone 17, iPhone 17 Air, Pro आणि Pro Max ची किंमत किती? जाणून घ्या सविस्तर
4
अफगाणिस्तानची विजयी सलामी; हाँगकाँगची पाटी पुन्हा कोरीच! Asia Cup स्पर्धेतील सलग १२ वा पराभव
5
Apple Event 2025 : iPhone 17 Pro आणि 17 Pro Max लाँच, नवीन डिझाइन, अपग्रेड कॅमेरा अन्...; जाणून घ्या किंमत
6
Apple Event 2025 : iPhone 17 सीरीज लाँच, Pro Motion डिस्प्ले, 20 मिनिटांत चार्ज, आणखी काय-काय आहे खास? जाणून घ्या
7
ठाण्यात सत्ता आणायची असेल तर रावणाच्या...; गणेश नाईकांनी फुंकलं ठाणे महापालिका निवडणुकीचं रणशिंग
8
Apple Awe Dropping Event : Apple Watch 11 लाँच, '5G'सह मिळणार 'हे' ढासू फीचर्स; आतापर्यंतची 'बेस्ट स्मार्ट वॉच', कंपनीचा दावा
9
Apple चे नवे AirPods Pro 3 लाँच; किंमत मोठी, पण फीचर्स खुश करणारे!
10
इंडिया आघाडीची १४ मते फुटली! मतदानापैकी १५ मते बाद ठरली, उपराष्ट्रपती निवडणुकीत काय घडले...
11
ज्या DSP नं गोळीबाराचा आदेश दिला, त्याला Gen-Z आंदोलनकांनी बेदम मारहाण करत संपवलं! आतापर्यंत २२ जणांचा मृत्यू
12
Asia Cup T20 Fastest Fifty : वादळी खेळीसह ओमरझाईचं विक्रमी अर्धशतक; सूर्यकुमार यादवचा विक्रम मोडला
13
Breaking: महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन नवे उपराष्ट्रपती! निकाल जाहीर, एनडीएला जादा मते मिळाली
14
इस्रायलनं संपूर्ण मध्यपूर्वेलाच बनवलं युद्धभूमी, आता 'या' देशावर केली बॉम्बिंग...! कारण काय?
15
मद्य धुंद ट्रकचालकाने मेंढ्यांसह मोटरसायकल चालकाला चिरडले, एक ठार, एक जखमी; आष्टा-इस्लामपूर मार्गावरील घटना
16
Sediqullah Atal First Fifty of Asia Cup 2025 : पहिल्या नबंरला येऊन ठोकली पहिली फिफ्टी!
17
Video: नेपाळच्या माजी पंतप्रधानांच्या पत्नीला जिवंत जाळले; आंदोलकांनी सर्व सीमा पार केल्या
18
VinFast VF6: टाटा गपगार होणार! विनफास्टने दोन स्वस्त ईव्ही लाँच केल्या; किंमत १६.४९ लाखांपासून...
19
कतारची राजधानी दोहा हादरली! इस्रायलचा हमास नेत्यांवर हल्ला; शांतता प्रयत्नांना धक्का
20
नेपाळची लोकसंख्या किती? किती हिंदू? किती मुस्लीम? जाणून घ्या सर्व धर्मांसंदर्भात सविस्तर

ट्रकचे छत उघताच बाहेर पडले ड्रोन, ४१ विमाने नष्ट; ५० लाखांत झालं रशियाचे ६० हजार कोटींचे नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2025 13:21 IST

युक्रेनने रशियाला मोठा धक्का देत ऑपरेशन स्पायडर वेब अंतर्गत मोठा हल्ला करत रशियन हवाई तळांवर विमाने नष्ट केली.

Ukraine Drone Attack : युक्रेनने रशियावर रविवारी मोठा ड्रोन हल्ला करत जगाला धक्का दिला आहे. युक्रेनने ड्रोनचा वापर करत रशियाची ४१ अत्यंत शक्तिशाली लढाऊ विमाने नष्ट केली आहेत. ‘ऑपरेशन स्पायडर वेब’ असं नाव या मोहिमेला देण्यात आले होते. कंटेनरमध्ये ड्रोन भरून ते कंटेनर ट्रकच्या माध्यमातून रशियामध्ये तब्बल ४ हजारांहून अधिक किमी दूरवरील हवाई तळांवर नेण्यात आले होता. त्यानंतर रिमोटच्या सहाय्याने ते हवाई तळांवर पाठवून स्फोट घडवण्यात आला.  रशियाचे ६०,००० कोटी रुपयांचे नुकसान फक्त ५० लाख रुपयांच्या ड्रोनने केल्याचा दावा युक्रेनने केला. हे ड्रोन हल्ले रशियाच्या ४ एअरबेसवर झाले आहेत.

रशियाची महत्त्वाची विमाने नष्ट

युक्रेनच्या एसबीयू सुरक्षा सेवेकडून मिळालेल्या माहितीनुसार, या हल्ल्यांमध्ये रशियाच्या ४ हवाई तळांवर असलेल्या ४१ विमानांना लक्ष्य करण्यात आले. यामध्ये टीयू-९५ आणि टीयू-२२ स्ट्रॅटेजिक बॉम्बर विमाने, ए-५० रडार डिटेक्शन आणि कमांड विमाने यांचा समावेश आहे. टीयू-९५ आणि टीयू-२२ सारखी विमाने  अणुहल्ले करू शकतात. तर ए-५० चा वापर हेरगिरी आणि इनपुट गोळा करण्यासाठी केला जातो. ही खूप महागडी आणि दुर्मिळ विमाने होती.'मिलिटरी बॅलन्स २०२५' या अहवालानुसार, वर्षाच्या सुरुवातीला रशियाच्या हवाई ताफ्यात ५५ टीयू-२२एम३ जेट आणि ५७ टीयू-९५ होते. सुमारे १६ ए-५० विमाने होती.  अंदाजानुसार, या हल्ल्यामुळे रशियाला ७ अब्ज डॉलर्स म्हणजेच ५९.७७ हजार कोटी रुपयांचे नुकसान झाले.

युक्रेननं रशियातच सुरु केलं होतं ऑफिस

संपूर्ण मोहिम युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांच्या देखरेखीखाली झाले. मोहिमेची सुत्रे सुरक्षा सेवा प्रमुख लेफ्टनंट जनरल बासिल माल्युक यांच्याकडे होती. हे युक्रेनच्या एसबीयूने पार पाडले. एसबीयूने आधी रशियाच्या सुरक्षा आणि गुप्तचर संस्थेच्या एफएसबीच्या मुख्यालयाशेजारी असलेल्या रुंची परिसरात त्यांचे ऑफिस सुरु केले. तिथे काही एजंट तैनात करण्यात आले होते. 

खास ड्रोनची निर्मिती

या हल्ल्यासाठी फर्स्ट पर्सन व्ह्यू म्हणजेच एफपीव्ही ड्रोन बनवण्यात आले होते. हे ड्रोन खूप स्वस्त आणि लहान आहेत, जे कमी उंचीवर उडतात. ते रडार आणि हवाई संरक्षण प्रणालींना चकवा देऊन हल्ला करतात. त्यात बसवलेले कॅमेरे लाईव्ह फुटेज पाठवत राहतात, ज्यामुळे ऑपरेटरला विमानाप्रमाणेच ड्रोनचा वेग आणि हालचाल कळते. 'द इकॉनॉमिस्ट'च्या वृत्तानुसार, या ड्रोनने युक्रेनला व्हिडिओ फुटेज पाठवण्यासाठी रशियन मोबाइल-टेलिफोन नेटवर्कचा वापर केला.यातील बहुतेक व्हिडिओ नंतर सोशल मीडियावर व्हायरल केले गेले.

रशियाचे ६० हजार कोटींचे नुकसान

युक्रेनने वापरेलेल्या एका एफपीव्ही ड्रोनची किंमत ४३० ते ६०० डॉलर्स दरम्यान असल्याचा दावा केला जात आहे. म्हणजेच सुमारे ३६.७ हजार ते ५१.२ हजार रुपये. आकडेवारीनुसार, ११७ ड्रोनची एकूण किंमत ४३ लाख ते ६० लाख रुपये होती. स्फोटके आणि कॅमेरे बसवलेले हे ड्रोन खास डिझाइन केलेल्या लाकडी पेट्यांमध्ये बसवले होते, जे ट्रकवर लोड करण्यात आले होते. हे ट्रक गुप्तपणे रशियाला पाठवण्यात आले. नंतर, ते रशियन हवाई तळांच्या परिसरात उभे करुन त्यातून ड्रोन सोडण्यात आले. ऑपरेशन स्पायडर वेबमध्ये ११७ ड्रोन आणि तेवढ्याच ऑपरेटर्सनी काम केले. रशियामध्ये राहून या ऑपरेशनमध्ये मदत करणाऱ्यांना मोहिमेनंतर सुरक्षित ठिकाणी नेण्यात आल्याची माहिती झेलेन्स्की यांनी दिली.

टॅग्स :Russia Ukrainयुक्रेन आणि रशियाVladimir Putinव्लादिमीर पुतिन