तेहरान: युक्रेनचं प्रवासी विमान इराणची राजधानी तेहरानमध्ये कोसळलं आहे. या विमानात १८० प्रवासी असल्याची माहिती समजते आहे. तेहरानच्या इमाम खोमेनी आंतरराष्ट्रीय विमातळाजवळ हे विमान कोसळल्याची माहिती स्थानिक प्रसारमाध्यमांनी दिली आहे. उड्डाण करताच विमानात तांत्रिक बिघाड झाला. यानंतर हे विमान कोसळलं. उड्डाणानंतर अवघ्या काही मिनिटांत अपघातग्रस्त झालेल्या विमानातील प्रवाशांच्या सुरक्षेबद्दलची कोणतीही अधिकृत माहिती अद्याप उपलब्ध झालेली नाही. सध्या तपास पथक दुर्घटनास्थळी पोहोचल्याची माहिती तेहरानच्या नागरी उड्डाण विभागाचे प्रवक्ते रेझा जफरझादेह यांनी दिली आहे.
180 प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या युक्रेनच्या विमानाला इराणमध्ये अपघात
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2020 09:44 IST