शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

रशियावर युक्रेनचा हल्ला; ऑइल डेपो झाला उद्ध्वस्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2022 08:49 IST

या अणुप्रकल्पातील वाढत्या किरणोत्सर्गाचा धोका लक्षात आल्याने रशियाच्या लष्कराने तिथून काढता पाय घेतल्याचे सांगण्यात येते.

किव्ह :  युक्रेनने रशियात प्रथमच हवाई हल्ला केला असून, तेथील बेल्गोरोड शहरातला एक ऑइल डेपो उद्ध्वस्त केला. त्यात रशियाचे दोन जण जखमी झाले आहेत. कब्जा केलेल्या चेर्नोबिल अणुप्रकल्पातून रशियाने आपले सैन्य मागे घेतले असून, तो प्रकल्प पुन्हा युक्रेनच्या ताब्यात गेला आहे. या अणुप्रकल्पातील वाढत्या किरणोत्सर्गाचा धोका लक्षात आल्याने रशियाच्या लष्कराने तिथून काढता पाय घेतल्याचे सांगण्यात येते.

युक्रेनची ऊर्जा कंपनी एनेर्जोॲटमने सांगितले की, चेर्नोबिल अणुप्रकल्पाजवळील जंगलात खंदक खणत असलेल्या रशियाच्या सैनिकांना वाढलेल्या किरणोत्सर्गाचा सामना करावा लागला. जिवाला धोका आहे हे ओळखून त्यांनी या परिसरातून काढता पाय घेतला. युक्रेनने पलटवार करून रशियातला बेल्गोरोड येथील ऑइल डेपो उद्ध्वस्त केला, तसेच युक्रेनने चेर्निहिवजवळील स्लोबोडा व लुकाशिवका या गावांवर पुन्हा ताबा मिळविला आहे.

रशिया आणखी हल्ले करणारn किव्ह व चेर्निहिववरील हल्ले कमी केल्याचा रशियाने दावा केला असला तरी, या दोन ठिकाणी अद्यापही हवाई, तसेच क्षेपणास्त्र हल्ले सुरू आहेत. रशियाने आणखी जोरदार हल्ले करण्याची पूर्वतयारी केली असल्याचा आरोप युक्रेनने केला आहे.n मारियुपोलमध्ये अडकलेल्या शेकडो नागरिकांना अन्न-पाण्याचा पुरवठा करण्याचे प्रयत्न रशियाच्या लष्कराने पुन्हा एकदा हाणून पाडले, तसेच मारियुपोलमधून दुसऱ्या शहरात जाऊ इच्छिणाऱ्या नागरिकांची रशियाकडून अडवणूक होत आहे.

ऑस्ट्रेलिया सुरुंगरोधक बुशमास्टर ही चारचाकी लष्करी वाहने युक्रेनला देणार आहे. ही वाहने युरोपला लवकरच रवाना होतील. 

मात्र, ती युक्रेनमध्ये कधी दाखल होतील हे सांगता येत नाही, अशी माहिती ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांनी दिली. 

ही लष्करी वाहने व संरक्षणविषयक मदत देण्याचे आवाहन युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष जेलेन्स्की यांनी ऑस्ट्रेलियाला केले होते. 

टॅग्स :russiaरशियाRussia Ukrainयुक्रेन आणि रशियाwarयुद्ध