शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

रशियात पाय ठेवताच अटक करणार! 'या' देशाच्या पंतप्रधानांविरोधात पुतिन यांच्या पोलिसांचं वॉरंट!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2024 20:11 IST

एस्टोनिया, लातव्हिया आणि लिथुआनिया, या तीनही देशांनी युक्रेन युद्ध सुरू झाल्यानंतर, सोव्हियत काळातील अनेक स्‍मारके नष्ट केले आहेत. यात दुसऱ्या महायुद्धात मारल्या गेलेल्या सोव्हियत सैनिकांच्या स्मरणार्थ उभारण्यात आलेल्या स्मारकांचाही समावेश आहे.

युक्रेनसोबत युद्ध सुरू असतानाच रशियन पोलिसांनी नाटो देशांच्या अनेक नेत्यांना 'वॉन्टेड लिस्ट'मध्ये टाकले आहे. यात एस्‍टोनियाच्या पंतप्रधान काया कलास यांचे नाव मुख्य आहे. याशिवाय लिथुआनियाच्या  सांस्कृतिक मंत्री आणि लतावियाच्या गेल्या सरकारमधील अनेक मंत्र्यांची नावेही या वॉन्टेड लिस्टमध्ये टाकण्यात आली आहेत. रशियन सरकारी संस्था TASS नुसार, बाल्टिक नेत्यांवर 'सोव्हियत सैनिकांच्या स्मरनार्थ तयार करण्यात आलेले स्मारक नष्ट केल्याचा' आरोप आहे. रशियामध्ये अशा गुन्ह्यासाठी 5 वर्षे कारावासाच्या शिक्षेची तरतूद आहे. 

या नेत्यांनी सीमा ओलांडून रशियात प्रवेश केल्यास त्यांना अटक होऊ शकते. राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन यांच्या सरकारकडून या नेत्यांविरोधात खटलाही चालविला जाऊ शकतो, असे संकेत देण्यात आले आहेत. यासंदर्भात बोलताना रशियन परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या मारिया झखारोवा म्हणाल्या, "ही केवळ सुरुवात आहे. नाझीवाद आणि फॅसिझमपासून जगाला मुक्त करणाऱ्यांच्या स्मृतीच्या विरोधात गुन्हा करणाऱ्यांवर खटला चालवायला हवा."

पुतिन सरकारच्या या निर्णयासंदर्भात बोलताना कलास म्हणाल्या, ही कारवाई आपल्या गप्प करू शकणार नाही. तसेच, स्पेनचे पंतप्रधान पेड्रो सांचेज यांनी कलास यांच्या समर्थनार्थ X वर पोस्‍ट करत पुतिन यांना सुनावले आहे.

'संपूर्ण युरोप आपल्यासोबत' - कलास यांनी X वर लिहिले आहे, 'क्रेमलिन वाटत असेल की, ते अशा पावलांद्वारे मला आणि इतरांना गप्प करू शकतील. मात्र असे होणार नाही. मी युक्रेनच्या समर्थनार्थ अशीच उभी राहील.' याच बरोबर सांचेज यांनी कलास यांच्या समर्थनार्थ X वर पोस्ट केली आहे. यात, 'पुतिन यांचे हे पाऊल लोकशाही आणि स्वतंत्रतेच्या रक्षणार्थ आपला साहस आणि एस्टोनियाच्या नेतृत्वाचे आणकी एक प्रमाण आहे. ते आपल्याला धमकावू शकणार नाहीत. स्‍पॅनिश लोक आणि युरोप आपल्या पाठीशी आहे.'

म्हणून पुतिन यांनी उचललं असं पाऊल - एस्टोनिया, लातव्हिया आणि लिथुआनिया, या तीनही देशांनी युक्रेन युद्ध सुरू झाल्यानंतर, सोव्हियत काळातील अनेक स्‍मारके नष्ट केले आहेत. यात दुसऱ्या महायुद्धात मारल्या गेलेल्या सोव्हियत सैनिकांच्या स्मरणार्थ उभारण्यात आलेल्या स्मारकांचाही समावेश आहे. यानतंर रशियन तपास समितीचे प्रमुख अलेक्झॅन्डर बॅस्ट्रीकिन यांनी तपास सुरू केला आहे. 

टॅग्स :russiaरशियाVladimir Putinव्लादिमीर पुतिनRussia Ukrainयुक्रेन आणि रशिया