शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
3
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
4
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
5
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
6
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
7
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
8
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
9
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
10
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
11
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
12
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
13
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
14
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
15
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
16
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
17
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
18
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
19
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
20
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
Daily Top 2Weekly Top 5

पुतिन यांच्या हत्येचा प्रयत्न, युक्रेनने मध्यरात्री घरावर केला ड्रोन हल्ला, रशियाचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2023 07:27 IST

घटनेवेळी पुतिन क्रेमलिनबाहेर, इमारतीचे किरकोळ नुकसान

मॉस्को : युक्रेन आणि रशिया यांच्यातील युद्ध दिवसेंदिवस तीव्र होत आहे. युक्रेनकडून मध्यरात्री रशियाच्या अध्यक्षांचे निवासस्थान असलेल्या क्रेमलिनवर ड्रोन हल्ला करण्यात आला. अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या हत्येचा युक्रेनचा कट असल्याचा आरोप रशियाने केला. हे रशियाचेच कारस्थान असल्याचे युक्रेनने म्हटले आहे.

दोन ड्रोनद्वारे क्रेमलिनवर हल्लाचा प्रयत्न केला. मात्र, ते तातडीने निष्क्रिय करण्यात आले. वास्तूचे कोणतेही नुकसान झाले नाही. हल्ला झाला त्यावेळी पुतिन हे क्रेमलिनमध्ये नव्हते. ते सुरक्षित असल्याचे निवेदन प्रशासकीय अधिकाऱ्यांनी जारी केले. ड्रोनद्वारे केलेल्या हल्ल्याचा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे. वास्तूच्या घुमटानजीक थोडीफार आग  लागली असून धूरही निघत असल्याचे त्यात दिसत आहे. 

जोरदार प्रत्युत्तर देणार रशियाच्या हल्ल्यांना जोरदार प्रत्युत्तर देणार असल्याचे युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांनी म्हटले. झेलेन्स्की फिनलंड दौऱ्यावर असून तेथे त्यांनी स्वीडन, नॉर्वे, डेन्मार्क आणि आइसलॅंडच्या नेत्यांची भेट घेतली. आम्हाला लवकरच अत्याधुनिक शस्त्रास्त्रांचा पुरवठा होणार असल्याचा विश्वास झेलेन्स्की यांनी व्यक्त केला.

किव्ह नष्ट करा! क्रेमलिनवरील ड्रोन हल्ल्यानंतर रशियाने तीव्र शब्दांत प्रतिक्रिया व्यक्त केली. यापुढे झेलेन्स्की यांच्याशी कोणतीही वाटाघाटी करणार नसल्याचे रशियाचे खासदार वाचेस्लाव वोलोदिन यांनी म्हटले. तसेच किव्ह नष्ट करण्यासाठी एकत्र येण्याचे आवाहन रशियाच्या एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याने केले.

परस्परांवर ड्रोन हल्लेमागील काही दिवसांपासून रशिया आणि युक्रेनकडून एकमेकांवर मोठ्या प्रमाणात ड्रोन हल्ले करण्यात येत आहेत. रशियाने सलग तिसऱ्या दिवशी युक्रेनची राजधानी कीव्हसह अन्य ठिकाणी ड्रोनद्वारे हल्ला केला. तसेच युक्रेनने केलेल्या ड्रोनच्या हल्ल्यात रशियातील तेल डेपोला भीषण आग लागली.

 

टॅग्स :Russia Ukrainयुक्रेन आणि रशियाVladimir Putinव्लादिमीर पुतिन