शहरं
Join us  
Trending Stories
1
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...
2
“भारत महाशक्ती, लादलेले टॅरिफ असंविधानिक”; ट्रम्प यांना अमेरिकन अर्थशास्त्रज्ञांचा घरचा अहेर
3
"जे देश सध्या दादागिरी करताहेत ते..."; भारत-अमेरिका तणावावर नितीन गडकरी यांचे रोखठोक विधान
4
लवकरच भडकणार पुढचं युद्ध! लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी यांचा सूचक आणि गंभीर इशारा  
5
'कृपया मला काम द्या...', हिना खानने मांडल्या भावना; म्हणाली, "कॅन्सरनंतर कोणीही..."
6
मंगळवारी संकष्ट चतुर्थी: श्रावणात अत्यंत शुभ अंगारक योग; पाहा, वैशिष्ट्ये, महात्म्य, मान्यता
7
जगदीप धनखड गायब? राऊतांना वेगळाच संशय; म्हणाले, “रशिया-चीनची पद्धत भारतात सुरू केली का?”
8
“शरद पवारांनंतर ते लोक उद्धव ठाकरेंनाही भेटले, लोकसभा अन् विधानसभेला...”; संजय राऊतांचा दावा
9
“RSS शिस्तबद्ध संघटना, ७५ वर्षे अटीचे पालन करेल”; शरद पवारांचा नाव न घेता PM मोदींकडे रोख!
10
अमेरिका-भारत नव्हे, 'या' देशाने बनवला जगातील सगळ्यात घातक ड्रोन! ११ टन वजन अन् AIवर चालणार
11
LIC ने गुंतवणूकदारांना केले मालामाल; ५ दिवसात केली १७००० कोटींची कमाई...
12
रोहित शर्माने खरेदी केली Lamborghini, नंबरने वेधले चाहत्यांचे लक्ष; काय आहे ३०१५ चा अर्थ?
13
गडकरींचे ३.५० लाख मतदार वगळले, कुटुंबीयांचाही समावेश; अजून पुरावे मागणार की माफी?; काँग्रेसचा सवाल
14
साप्ताहिक राशीभविष्य: मोठी जोखीम टाळा, पैसे उसने देऊ नये; ८ राशींना लाभ, सुख-सुबत्ता-कल्याण!
15
ट्रम्प टॅरिफचा पहिला फटका, अनेक कारखान्यांत काम बंद, भारतातील व्यापार गेला पाकिस्तानात
16
Video : भर पावसात बाबांचा स्वयंपाक, चिमुकल्यांनी डोक्यावर धरलं 'असं' छत, पाहून डोळ्यांत येईल पाणी! 
17
कियारा अडवाणीच्या बिकिनी सीन्सवर कात्री? 'वॉर २'ला प्रमाणपत्र देताना सेन्सॉर बोर्डाचे निर्देश
18
RCBच्या यश दयालवर बंदीची कारवाई; अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी 'या' स्पर्धेतून बाद
19
पाकिस्तानला झाले तब्बल 'इतक्या' कोटींचे नुकसान; भारतीय विमानांसाठी हवाई क्षेत्र बंद करणे पडले महागात!
20
सर्वाधिक धावा कुटल्या, मग कर्णधाराला माघारी धाडलं, २२ वर्षांच्या ऑलराउंडरने जिंकवला सामना

Russia-Ukraine War :खारकीवमध्ये रशियन मेजर जनरल ठार; युक्रेनचा मोठा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2022 07:58 IST

Russia-Ukraine War : रशियाला या युद्धात आपले दोन मोठे सैन्य अधिकारी गमवावे लागले आहेत. यापूर्वी युक्रेननं मेजर जनरल आंद्रेई सुखोवेत्सकींना ठार केल्याचा दावा केला होता.

Russia-Ukraine War : रशिया आणि युक्रेन यांच्यात सुरू असलेल्या युद्धाला जवळपास दोन आठवड्यांचा कालावधी पूर्ण होत आला आहे. या युद्धातून रशियाला अद्यापही काहीही साध्य झालेलं नाही. परंतु त्यांना आपले दोन मोठे सैन्य अधिकारी मात्र गमवावे लागले आहेत. रशियाला कडवी झुंज देत असलेल्या युक्रेननं आता आणखी एक मोठा दावा केला आहे. रशियाचे मेजर जनरल विटाली गेरासिमोव्ह (Russian Major General Vitaly Gerasimov) यांना ठार केल्याचा दावा युक्रेननं केला आहे. 'द कीव इंडिपेंडंट'ने युक्रेनच्या संरक्षण मंत्रालयाच्या मुख्य गुप्तचर संचालनालयाच्या हवाल्याने हा दावा केला आहे. याआधी रशियाच्या आणखी एका वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्याला युद्धात ठार केल्याचा दावा युक्रेननं केला होता.

"युक्रेनच्या संरक्षण मंत्रालयाच्या मुख्य गुप्तचर विभागाने सांगितलं की, युक्रेनने खारकीवजवळ रशियन मेजर जनरल विटाली गेरासिमोव्ह यांना ठार केलं आहे," असं कीव इंडिपेंडंटनं एका ट्वीटद्वारे म्हटलं. गेरासिमोव्ह हे वरिष्ठ लष्करी अधिकारी होते. त्यांनी दुसऱ्या चेचेन युद्धात भाग घेतला होता आणि क्रिमिया ताब्यात घेतल्याबद्दल त्यांना पदक देऊन गौरवण्यातही आलं होतं. रशियन लष्करी अधिकारी विटाली यांनीही सीरिया युद्धात भूमिका बजावली होती. यापूर्वी युक्रेनच्या सैन्याने रशियन मेजर जनरल आंद्रेई सुखोवेत्स्की यांना ठार केले होते. पुतीन यांचे खास मानले जाणारे आंद्रेई हे रशियाच्या सातव्या एअरबोर्न डिव्हिजनचे कमांडिंग ऑफिसर होते. २४ फेब्रुवारीपासून सुरू असलेल्या या संघर्षात रशियाने आपले दोन सर्वोच्च लष्करी अधिकारी गमावले आहेत. मात्र, रशियन सरकारने याला अद्याप अधिकृत दुजोरा दिलेला नाही.

युक्रेन सध्या रशियाला कडवी झुंज देतआहे. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदमीर झेलेंन्स्की यांनी आतापर्यंत रशियाच्या ११ हजारांपेक्षा अधिक जवानांना ठार केल्याचा दावा केला आहे. तसंच मोठ्या प्रमाणात रशियन युद्ध सामग्रीदेखील नष्ट केल्याचा दावा त्यांनी केलाय.

टॅग्स :Russia Ukrainयुक्रेन आणि रशियाwarयुद्ध