शहरं
Join us  
Trending Stories
1
सौदी अरेबियात भीषण अपघात, ४२ भारतीयांचा मृत्यू; प्रवासी बस डिझेल टँकरला धडकली, आगीचा उडाला भडका
2
काँगोमधील तांब्याच्या खाणीत मोठी दुर्घटना; पूल कोसळून ३२ जणांचा मृत्यू, अनेक जण अजूनही बेपत्ता
3
भारताचा अमेरिकेसोबत ऐतिहासिक LPG करार; घरगुती गॅस सिलिंदरची किंमत कमी होणार?
4
Delhi Blast : दिल्ली स्फोटातील डॉ. शाहीनच्या कोट्यवधींच्या फंडिंगबाबत धक्कादायक खुलासा, ATS-NIA चे छापे
5
टॅक्स भरणे झाले सोपे! बँक, नेट बँकिंगचा झंझट नाही; आता UPI ॲपद्वारे मिनिटांत भरा प्राप्तीकर
6
पालघर साधू हत्याकांडात आरोप केले, त्यालाच पक्षात घेतले? चौफेर टीका होताच भाजपानं दिलं असं स्पष्टीकरण
7
देवेंद्र फडणवीसांना भेटला, सत्कार करून घेतला; पंतप्रधान कार्यालयात सचिव म्हणणारा निघाला...
8
नोकरीच्या शोधात असलेल्यांसाठी सुवर्णसंधी! ९०% कंपन्या 'या' पदावर प्रोफेशनल्सची करणार भरती
9
देवेंद्र फडणवीसांचं 'धक्कातंत्र'! उद्धव ठाकरेंसह आदित्य ठाकरेंवर पुन्हा सोपवली जबाबदारी
10
टीम इंडिया ९३ धावांवर 'ऑलआउट', दुसरीकडे करुण नायरने एकट्याने केल्या त्यापेक्षा जास्त धावा
11
अजय देवगणपेक्षाही खतरनाक! विकी कौशलच्या 'तौबा तौबा' गाण्यावर काजोलने केला डान्स, सर्वांची हसून पुरेवाट
12
पुण्यातील या नगर परिषदेत ठाकरे आणि शिंदे गट एकत्र, नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराला पाठिंबा
13
"इंडस्ट्रीत पदार्पण मिळू शकते, पण...", करीना कपूर बॉलिवूडमधील नेपोटिझ्मबद्दल स्पष्टच बोलली
14
पाक विरुद्धच्या पराभवानंतर भारतीय संघासाठी कसे असेल Asia Cup स्पर्धेतील सेमीच समीकरण?
15
जे शिंदेंना मिळालं नाही ते नितीश कुमारांना मिळणार; बिहारमध्ये पुन्हा CM पद, फॉर्म्युला ठरला
16
भ्रष्टाचाराचं Live प्रेझेंटेशन... तरुणाचा महापौरांसमोरच कॉल, अधिकाऱ्यांच्या 'रेट लिस्ट'चा पर्दाफाश
17
ट्रम्प यांचा यु-टर्न! अमेरिकेच्या 'या' निर्णयानं भारताला होणार २६ हजार कोटींचा फायदा, 'यांना' मिळणार मोठा लाभ
18
सौदीचे प्रिन्स ७ वर्षानंतर अमेरिका दौऱ्यावर, ट्रम्प यांचा आनंद गगनात मावेना, कारणही आहे खास
19
Stock Market: किरकोळ तेजीसह शेअर बाजाराच्या कामकाजाला सुरुवात; सेन्सेक्समध्ये १०० अंकांची तेजी, निफ्टी २५,९०० च्या वर
20
Chandrayaan 4: भारत चंद्रावर जाणार; तेथील नमुने पृथ्वीवर आणणार, चांद्रयान-४ मोहिमेला सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

रशियावर युक्रेनचे ‘ऑपरेशन स्पायडर वेब’! रिमोटने ४,३०० किमीवर लाकडी डब्यांतून झेपावले ११७ ड्रोन

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2025 08:54 IST

क्लिष्ट लॉजिस्टिकचा वापर करीत ट्रकमध्ये भरून नेले ११७ ड्रोन; दीड वर्षापासून सुरू होते नियोजन; बलाढ्य रशियाला पुसटशीही कल्पनाही नव्हती

मॉस्को: रशियाच्या हल्ल्यांना प्रत्युत्तर देताना युक्रेनने रविवारी ड्रोनचा मोठ्या युक्तीने वापर केला आणि रशियाची ४१ अत्यंत शक्तिशाली लढाऊ विमाने नष्ट केली. कंटेनरमध्ये ड्रोन भरून ते कंटेनर ट्रकच्या माध्यमातून रशियामध्ये तब्बल ४ हजारांहून अधिक किमी दूरवरील हवाई तळांवर नेण्यात आले आणि त्या ड्रोनचा रिमोटच्या साहाय्याने मारा करण्यात आला. त्यासाठी युक्रेनने वापरलेली रणनीती अतिशय गुप्त आणि धक्कादायक ठरली. ‘ऑपरेशन स्पायडर वेब’ हे नाव मोहिमेला देण्यात आले होते.

युक्रेनच्या संरक्षण सेवेने (एसबीयू) ड्रोन आधीच रशियाच्या सीमेत तस्करी करून पोहोचवले होते. हे ड्रोन ट्रकच्या आतील भागात लाकडी कंटेनरमध्ये अत्यंत कुशलतेने लपवण्यात आले होते. हल्ल्याच्या वेळी या ट्रकच्या छतांवर लपवलेल्या डब्यांचे झाकण रिमोटद्वारे उघडले गेले आणि त्यातून ड्रोन आकाशात झेपावले. त्यानंतर त्यांनी रशियाच्या प्रमुख लष्करी विमानतळांवर एकाच वेळी अचूक हल्ले चढवले. ही संपूर्ण मोहीम इतकी गोपनीय होती की रशियासारख्या तगडी हेर यंत्रणा असलेल्या देशालाही या कारवाईची पुसटशीही कल्पना येऊ शकली नाही.

सात अब्ज डॉलरचे नुकसान

युक्रेनच्या दाव्यानुसार, या हल्ल्यात रशियाची अंदाजे सात अब्ज डॉलर किमतीची विमाने नष्ट झाली आहेत. रशियाने मात्र अद्याप यावर अधिकृत टिप्पणी केलेली नाही.

कशी आखली ‘स्पायडर वेब’ योजना?

या कारवाईचे युक्रेनने तब्बल दीड वर्ष आधी नियोजन केले होते. राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी यावर लक्ष ठेवले. ही आपल्या इतिहासातील सर्वांत लांब पल्ल्याची आणि यशस्वी कारवाई असल्याचे सांगत या मोहिमेचे त्यांनी कौतुक केले. हल्ल्याच्या तयारीसाठी अत्यंत क्लिष्ट लॉजिस्टिक वापरण्यात आले. ड्रोन आधीच रशियन भूभागात गुप्तपणे पोहोचवले गेले होते. ट्रकवर लाकडी केबिनच्या छपराखाली ड्रोन लपवले होते.

६ हजार युक्रेनी सैनिकांचे मृतदेह परत करणार रशिया

रशिया-युक्रेन युद्धावर शांततेचा तोडगा काढण्याच्या दृष्टीने सुरू असलेल्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून दोन्ही देशांची शिष्टमंडळे तुर्कस्थानची राजधानी असलेल्या इस्तंबूलमध्ये भेटली. युक्रेनच्या राष्ट्राध्यक्ष कार्यालयाचे प्रमुख येरकम यांनी युक्रेनियन मुलांची यादी सादर करत या मुलांना सोडण्याची मागणी केली. दोन्ही देशांनी कैद्यांच्या देवाणघेवाणीवर सहमती दर्शविली आहे. रशिया ६,००० मारले गेलेल्या युक्रेनी सैनिकांचे मृतदेहही परत करणार असल्याचे युक्रेनचे संरक्षण मंत्री उमरोव यांनी सांगितले.

दुसऱ्या महायुद्धानंतर ८० वर्षांनी तिसरे महायुद्ध?

दुसरे महायुद्ध १९३९ साली सुरू होऊन १९४५ साली समाप्त झाले. त्यानंतर ८० वर्षांनी तिसरे महायुद्ध होण्याची भीती पाश्चिमात्य देशांना वाटत आहे. युगोव या संघटनेने सर्वेक्षणातून हा निष्कर्ष काढण्यात आला. येत्या पाच ते दहा वर्षांत तिसरे महायुद्ध होईल, अशी शक्यता नागरिकांना वाटत आहे. रशियासोबत वाढलेला तणाव, अमेरिकेचे परराष्ट्र धोरण, अण्वस्त्रांचा धोका ही त्यामागची कारणे आहेत. युद्धात अण्वस्त्रांचा वापर होईल, असे ७६% लोकांना वाटते. तिसरे महायुद्ध अधिक विनाशकारी असेल, असे लोकांना वाटते.

टॅग्स :Russia Ukrainयुक्रेन आणि रशिया