शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

चिंताजनक! ब्रिटनमध्ये ओमायक्रोन व्हेरियंटमुळे पहिला मृत्यू; पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी दिली माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2021 18:51 IST

कोरोनाच्या ओमायक्रॉन (Omicron) या नव्या व्हेरियंटने जन्म घेतल्याने संपूर्ण जगाची चिंता पुन्हा वाढली आहे.

नवी दिल्ली: कोरोनाच्या ओमायक्रॉन  (Omicron)  या नव्या व्हेरियंटने जन्म घेतल्याने संपूर्ण जगाची चिंता पुन्हा वाढली आहे. ब्रिटनमध्ये ओमायक्रॉन या व्हेरियंटची लागण होऊन एकाचा मृत्यू झाला आहे. ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी याबाबत माहिती दिली आहे. त्यामुळे  ओमायक्रॉन व्हेरियंटमुळे मृत्यू झालेल्या जगभरातील पहिल्या रुग्णाची नोंद आता झाली आहे.

बोरिस जॉन्सन म्हणाले की, दररोज ओमायक्रॉनची लागण झालेल्या शेकडो लोकांना रुग्णालयात दाखल कराव लागत आहे. त्यातच आज कोरोनाच्या ओमायक्रॉन या नव्या व्हेरियंटमुळे एका रुग्णाचा मृत्यू झाला. त्यामुळे ३० पेक्षा अधिक वयाच्या लोकांनी कोरोना व्हॅक्सीनचा बुस्टर डोस घ्यावा, असं आवाहन बोरिस जॉन्सन यांनी केलं आहे. त्याचप्रमाणे ओमिक्रानकडे जराही दुर्लक्ष करू नका, असा सावधतेचा इशाराही बोरिस जॉन्सन यांनी दिला आहे.

दरम्यान, कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमायक्रॉननं अनेक देशांची चिंता वाढवली आहे. जगभरात वेगाने पसरणाऱ्या ओमायक्रॉन व्हेरिएंटबाबत वैज्ञानिकांनी पुन्हा एकदा कोरोनाची लाट येण्याची शक्यता वर्तवली आहे. जागतिक आरोग्य संघटनेने ओमायक्रॉन व्हेरिएंटला व्हेरिएंट ऑफ कंसर्न श्रेणीत टाकलं आहे. आता या नव्या व्हेरिएंटवर UK च्या वैज्ञानिकांनी एक स्टडी केली आहे. ज्याचा खुलासा धक्कादायक आहे.

या रिपोर्टमध्ये म्हटलं आहे की, जर सुरक्षेचे अतिरिक्त उपाय केले नाही तर पुढील वर्षाच्या एप्रिल महिन्यापर्यंत कोरोना व्हायरसच्या ओमायक्रॉन व्हेरिएंटमुळे २५ हजार ते ७५ हजार मृत्यू होऊ शकतात. लंडनच्या स्कूल ऑफ हाइजीन एंड ट्रॉपिकल मेडिसिन आणि दक्षिण आफ्रिकेच्या स्टेलनबोश यूनिवर्सिटीच्या संशोधकांनी हा रिसर्च केला आहे.

लहान मुलांसाठी धोकादायक-

ब्रिटिश एक्सपर्टनुसार, ओमायक्रॉन व्हेरिएंट प्रत्येकासाठी एक मोठं आव्हान आहे. दक्षिण आफ्रिका आणि UK डेटानुसार, हा व्हेरिएंट लहान मुलांसाठी धोकादायक आहे. आता तो लहान मुलांमध्ये पसरत आहे. त्यांच्यात मध्यम ते गंभीर लक्षणं पाहायला मिळत आहे. याआधी कोरोनाचे जितके व्हेरिएंट आढळले तेव्हा मुलांमध्ये सौम्य किंवा काहीच लक्षणं आढळली नाही. ओमायक्रॉन व्हेरिएंटची लक्षणं प्रत्येकामध्ये वेगवेगळी असू शकतात असं डॉक्टरांनी सांगितले आहे.

टॅग्स :Omicron Variantओमायक्रॉनcorona virusकोरोना वायरस बातम्या