शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
3
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
4
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
5
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
6
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
7
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
8
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
9
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
10
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
11
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
12
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
13
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
14
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
15
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
16
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
17
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
18
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
19
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
20
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी

ब्रिटनमध्ये ७५ टक्के नागरिकांचं लसीकरण पूर्ण, तरीही मार्चनंतर एका दिवसात रेकोर्ड ब्रेक मृत्यू!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2021 17:09 IST

ब्रिटनमध्ये कोरोना विरोधी लसीकरण मोहीम मोठ्या प्रमाणात सुरू असली तरी मंगळवारी कोरोनामुळे झालेल्या मृत्यूंच्या आकडेवारीनं सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. ...

ब्रिटनमध्ये कोरोना विरोधी लसीकरण मोहीम मोठ्या प्रमाणात सुरू असली तरी मंगळवारी कोरोनामुळे झालेल्या मृत्यूंच्या आकडेवारीनं सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. मार्च महिन्यानंतर आज पहिल्यांदाच ब्रिटनमध्ये कोरोनामुळे रेकॉर्ड ब्रेक मृत्यूंची नोंद झाली आहे. चिंताजनक बाब म्हणजे ब्रिटनमध्ये १८ वर्षांवरील ७५ टक्के नागरिकांचं कोरोना विरोधी लसीकरण पूर्ण झालेलं आहे. असं असतानाही कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूंचा आकडा भीतीदायक ठरताना दिसत आहे. (UK reports biggest daily Covid 19 deaths since March even as 75 percent adults fully vaccinated)

ब्रिटनमध्ये जवळपास ८९ टक्के नागरिकांना कोरोना विरोधी लसीचा पहिला डोस देण्यात आलं आहे. याशिवाय देशातील कोरोना निर्बंधांमध्ये बहुतांश प्रमाणात सूट देखील देण्यात आली आहे. 

सरकारनं दिलेल्या आकडेवारीनुसार, ब्रिटनमध्ये मंगळवारी १४६ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. यासह देशातील मृत्यूंची एकूण संख्या १ लाख ३० हजार ५०३ इतकी झाली आहे. गेल्या सात दिवसांत २८ दिवसांच्या आत कोरोना संक्रमित झालेल्या रुग्णांमध्ये मृत्यूच्या प्रमाणात १४.८ टक्क्यांची वाढ देखील नोंदविण्यात आली आहे. मृत्यूंचा वाढता दर अधिकाऱ्यांसाठी चिंतेची बाब ठरत आहे. 

डेल्टा व्हेरिअंटनं वाढवली चिंताब्रिटनमध्ये कोरोना विषाणूच्या डेल्टा व्हेरिअंटनं एक भीषण संकट उभं केलं आहे. कारण देशात आढळणाऱ्या नव्या रुग्णांमागे ९९ टक्के डेल्टा व्हेरिअंटच कारणीभूत ठरला आहे. कोरोना विषाणूला कोरोनाची लस घेतलेले नागरिक देखील पसरवू शकतात असा अहवाल पब्लिक हेल्थ इंग्लंडनं दिला होता. ज्यापद्धतीनं लसीकरण न झालेले व्यक्ती कोरोना विषाणूचे प्रसारक ठरू शकतात त्याचपद्धतीनं लसीकरण झालेले व्यक्ती डेल्टा व्हेरिअंटचे प्रसारक ठरू शकतात, असं अहवालात नमूद करण्यात आलं होतं. 

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्या