शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

थेरेसा मे यांना मोठा दिलासा; अविश्वासदर्शक ठराव जिंकल्यानं सरकार सुरक्षित

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2019 07:23 IST

विरोधकांनी आणलेला अविश्वास ठराव मे यांनी 19 मतांनी जिंकला

लंडन: ब्रेक्झिट ठराव संसदेत मंजूर करुन घेण्यात अपयशी ठरल्यानंतर पंतप्रधान थेरेसा मे यांना मोठा दिलासा मिळाला आहे. विरोधकांनी आणलेला अविश्वास प्रस्ताव थेरेसा यांनी जिंकला. मजूर पक्षानं थेरेसा मे यांच्याविरोधात अविश्वास प्रस्ताव आणला. या प्रस्तावाच्या बाजूनं 306 सदस्यांनी मतदान केलं. तर विरोधात 325 जणांनी मत नोंदवलं. त्यामुळे मे यांच्या सरकारवरचं संकट टळलं आहे. मात्र ब्रेक्झिटचं नेमकं काय होणार, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. युरोपियन युनियनमधून बाहेर पडण्यासाठी पंतप्रधान थेरेसा मे यांनी मंगळवारी संसदेत प्रस्ताव आणला होता. त्यावर कनिष्ठ सभागृहात मतदान झालं. यात ब्रेक्झिट ठरावाविरोधात 432 सदस्यांनी कौल दिला. तर ब्रेक्झिटच्या बाजूनं 202 सदस्यांनी मतदान केलं. विशेष म्हणजे थेरेसा मे यांच्याच पक्षाचे 118 सदस्य विरोधात गेल्यानं पंतप्रधानांना मोठ्या नामुष्कीला सामोरं जावं लागलं. यानंतर विरोधात असलेल्या मजूर पक्षानं मे सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव आणला. यावर भारतीय वेळेनुसार बुधवारी रात्री उशिरा मतदान झालं. यामध्ये मे यांना 325 सदस्यांचा पाठिंबा मिळाला. तर 306 सदस्यांनी अविश्वास ठरावाच्या बाजूनं मतदान केलं. त्यामुळे 19 मतांनी मे यांचं सरकार वाचलं. ब्रिटन 1973 पासून युरोपियन युनियनचा सदस्य आहे. 2016 मध्ये ब्रिटनमध्ये युरोपियन युनियनमधून बाहेर पडण्याबद्दल जनमताचा कौल घेण्यात आला. त्यात 52 टक्के ब्रिटिशांनी ब्रेक्झिटच्या बाजूनं कौल दिला. त्यानंतर या संदर्भातील कायदेशीर प्रक्रिया सुरू झाली. युरोपियन युनियनमधून बाहेर पाडण्यासाठी ब्रिटनला 29 मार्चपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. मात्र याबद्दलचा प्रस्ताव मे यांना अद्याप संसदेत मंजूर करुन घेता आलेला नाही. मजूर पक्षाचे नेते जेरेमी कॉर्बेन यांच्यासह मे यांच्यासह मे यांच्या हुजूर पक्षातील अनेक खासदारांनी ब्रेक्झिट ठरावाविरोधात भूमिका घेतली आहे.  

टॅग्स :Theresa Mayथेरेसा मेEnglandइंग्लंड