शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
2
'पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना आधीच पकडले होते, काल मारले'; काँग्रेस नेत्याने ऑपरेशन महादेववर व्यक्त केला संशय
3
UPI व्यवहारांवर नवे निर्बंध; १ ऑगस्टपासून ‘डिजिटल शिस्त’ लागू, तुमच्यावर काय परिणाम होणार
4
मनसे-उद्धवसेना युती झाल्यास शिंदेंकडे गेलेल्या माजी नगरसेवकांच्या जागांवर दावा कुणाचा राहणार?
5
भारताची नक्कल करायला गेला अन् पाकिस्तान तोंडावर पडला! १३ चाचण्या करूनही क्षेपणास्त्र अयशस्वी
6
"१८ वर्षांनी बदलणार जग, माझा मुलगा कॉलेजला जाईल वाटत नाही"; Open AI च्या CEO काय वाटते भीती?
7
Nag Panchami 2025: पौराणिक कथांमधील 'या' तीन नागांचे स्मरण केल्याने मिळते सर्पदोषातून मुक्ती!
8
हलगर्जीपणाचा कळस! डॉक्टर काढत होते झोपा; मिळाले नाही उपचार, रुग्णाचा तडफडून मृत्यू
9
माजी कमांडो मारला जाताच पाकिस्तान तडफडू लागला; तीन दहशतवाद्यांना 'निष्पाप पाकिस्तानी' म्हणू लागला...
10
बँकांमध्ये ₹६७,००० कोटींची रक्कम पडून; कोणीही दावा केला नाही, सर्वाधिक पैसे कुठे?
11
माझ्या बाप्पाचं नाव मी शाहरुख ठेवलंय, तर सिद्धिविनायकाचं..., हर्षदा खानविलकर असं का म्हणाल्या?
12
पहलगामचा बदला घेतला; २६ पर्यटकांची हत्या करणारे तीन दहशतवादी ठार, अमित शाहांची माहिती
13
PF पेन्शन वाढीवर सरकारचा 'यू-टर्न'? ७,५०० रुपये पेन्शन मिळणार की नाही? संसदेत केलं स्पष्ट
14
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
15
पत्नीचा विरह सहन होईना! घटस्फोटानंतर पतीनं जेवण सोडलं; ३० दिवस फक्त बिअर पिऊन जगला, मग जे घडले...
16
Nag Panchami 2025: नागपंचमीला उघडतो मंदिराचा तिसरा दरवाजा; काय दडले आहे तिथे?
17
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
18
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
19
नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा खरंच रद्द झाली का? काय आहे या दाव्याचं सत्य? जाणून घ्या...
20
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी

Rishi Sunak : ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक अडचणीत? पक्षात फूट पडण्याची शक्यता, नेत्यांनी घेतली अशी भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2023 11:51 IST

पक्षाचे नेते ऋषी सुनक यांच्या धोरणांमध्ये समाविष्ट असलेल्या निर्वासितांशी संबंधित विधेयकावर सहमत नाहीत.

भारतीय वंशाचे ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांच्यापुढे सध्या अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. आपल्या पक्षात फूट पडू, नये यासाठी ते सध्या प्रयत्न करत आहेत. ऋषी सुनक हे त्यांच्या पंतप्रधानपदाच्या कार्यकाळातील सर्वात धोकादायक टप्प्यातून जात आहेत. कोरोना नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल त्यांच्यावर खटलेही प्रलंबित आहेत, त्यामुळे बोरिस जॉन्सन यांना सत्ता गमवावी लागल्याचे बोलले जात आहे. याशिवाय, पक्षाचे नेते त्यांच्या धोरणांमध्ये समाविष्ट असलेल्या निर्वासितांशी संबंधित विधेयकावर सहमत नाहीत. नेत्यांनी विरोधी भूमिका घेतली आहे. 

सध्या सरकारच्या धोरणांवर पक्षाच्या नेत्यांना एकत्र करणे, हे ऋषी सुनक यांच्यासमोर सर्वात मोठे आव्हान आहे. रवांडामध्ये निर्वासितांना पाठवण्याबाबत ब्रिटनची धोरणे त्यांना बदलायची आहेत, त्यानंतर ब्रिटनमध्ये राहणाऱ्या निर्वासितांना त्यांच्या देशात परत पाठवले जाईल. ऋषी सुनक यांनी त्यांच्या निवडणूक प्रचारसभांमध्येही ही आश्वासने दिली होती. ब्रिटनमध्ये निर्वासितांचा मोठा प्रश्न आहे आणि कंझर्व्हेटिव्ह पक्षाची धोरणे त्यांना काही प्रमाणात पाठिंबा देणारी आहेत.

ऋषी सुनक हे कंझर्व्हेटिव्ह पक्षाचे नेते आहेत, जे वर्षभरापूर्वी ब्रिटनचे पंतप्रधान झाले. ऋषी सुनक यांना केवळ पक्षश्रेष्ठींकडूनच विरोध होत नाही, तर निर्वासितांशी संबंधित नियमांचे पुनरुज्जीवन करण्याच्या मुद्द्यावरून डाव्या विचारसरणीपासून उजव्या विचारसरणीपर्यंतच्या इतर पक्षांच्या नेत्यांचाही विरोध होत आहे. अशी विधेयके संसदेत मांडली गेल्यास विरोधात मतदान करू, असा इशाराही पक्षाच्या नेत्यांनी दिला आहे.

पक्षातील उदारमतवादी नेत्यांचा विरोधकाही मानवी हक्क कायद्यांवर परिणाम करणार्‍या कायद्यावर ब्रिटिश संसद मंगळवारी पहिले मतदान घेणार आहे. यामुळे पुढील वर्षी राष्ट्रीय निवडणुकांपूर्वी रवांडासाठी प्रथम निर्वासन उड्डाणे निघू शकतील. पक्षातील काही उदारमतवादी नेते ऋषी सुनक यांच्या या धोरणाला विरोध करत आहेत. हे ब्रिटनचे मानवी हक्कांचे उल्लंघन आहे. तसेच, हे आंतरराष्ट्रीय मानवाधिकार कायद्यांचे उल्लंघन मानले जाईल, असे उदारमतवादी नेते म्हणत आहेत. याशिवाय, काही उजव्या विचारसरणीचे नेतेही विरोधात आहेत.

सर्वोच्च न्यायालयाने ठरवले घटनाबाह्य याचबरोबर, ऋषी सुनक यांना केवळ राजकीयच नव्हे तर आर्थिक आघाडीवरही अडचणींचा सामना करावा लागत आहे. ओपिनियन पोलमध्ये कंझर्व्हेटिव्ह पक्षाचा पराभव होत असलेल्या सुनकसाठी पुढील वर्षीच्या निवडणुकाही आव्हानात्मक आहेत. अशा परिस्थितीत, ऋषी सुनक यांचे रवांडा धोरण त्यांच्या सरकारसाठी एक मोठा टर्निंग पॉईंट असू शकते. ब्रिटनच्या सर्वोच्च न्यायालयाने या धोरणाला घटनाबाह्य ठरवले असून काही वैध निर्वासितांवरही याचा परिणाम होऊ शकतो, असे म्हटले आहे.

टॅग्स :Rishi Sunakऋषी सुनकInternationalआंतरराष्ट्रीय