शहरं
Join us  
Trending Stories
1
जागरूक हो मतदारराजा; महाराष्ट्रासह १० राज्यांतील ९६ जागांसाठी आज होणार मतदान
2
बाळासाहेबांवर अन्याय करणाऱ्यांना सोबत कसे घेतले? राज ठाकरे, ठाण्यातील लोंढ्यांबाबत चिंता
3
पंतप्रधानांची निवड तुम्ही संगीत खुर्चीतून करणार का? उपमुख्यमंत्री फडणवीसांचा विरोधकांना सवाल
4
लोकशाही न मानणाऱ्या नरेंद्र मोदींची पावले हुकूमशाहीकडे; शरद पवारांची टीका
5
मूल दुसऱ्याचे पण आपल्याला हवे, यांना सगळे रेडीमेड पाहिजे; उद्धव ठाकरेंची भाजपवर कडाडून टीका
6
ही लोकसभेची निवडणूक भाजप विरुद्ध जनता अशी झालेली आहे: प्रकाश आंबेडकर
7
“यापुढे विधानसभा, लोकसभेची निवडणूक लढविणार नाही, राजकीय संन्यास…”: एकनाथ खडसे
8
भाजपाने उद्योग, नोकऱ्या गुजरातला पळविल्या, उद्या मंत्रालयही पाठवले जाईल: आदित्य ठाकरे
9
सत्तेच्या लालसेपोटी उद्धव ठाकरे रामाला विरोध करणाऱ्यांबरोबर; पुष्करसिंह धामी यांची टीका
10
४ जूनला भाजपा जाऊन इंडिया आघाडीचे सरकार येईल: शशी थरूर, देशभरात हवा बदलल्याचा दावा
11
मुंबईत प्रचाराचा सुपरसंडे! मतदानाआधीचा शेवटचा रविवार; सभांमुळे वातावरण तापले
12
चौथ्या टप्प्यातही नात्यांची कसोटी; विखे, गावित, खडसे, मुंडे यांची प्रतिष्ठा पणाला
13
पोट भरण्याचे अन् विजेचे वांदे; महागाईविरोधात ‘पीओके’ पेटले
14
पाटण्यात 'मोदी वादळ', पंतप्रधानांच्या रोड शोला 3.5 किलोमीटरपर्यंत प्रचंड गर्दी
15
RCB ने प्ले ऑफच्या आशा कायम राखल्या, DC च्या अडचणी वाढल्या; विराट-अनुष्का खूश 
16
"...तर इस्रायल दुसऱ्याच दिवशी गाझावरील हल्ले थांबवेल"! पण हमासला बायडेन यांची एवढी एक गोष्ट ऐकावी लागेल
17
चिखलीत व्यावसायिक स्पर्धेतून गोळीबार, एक जण गंभीर जखमी 
18
पुण्यात रवींद्र धंगेकराचं पोलीस ठाण्यातच ठिय्या आंदोलन; वाचा नेमकं काय घडलं?
19
निवडणूक बंदोबस्तासाठी आलेल्या अमरावतीच्या होमगार्डचा मृत्यू
20
२२ वर्षीय फलंदाज दुर्दैवीरित्या बाद झाला, विराट कोहली पाहा किती खूश झाला; Video 

ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन विवाहबद्ध; प्रचंड गोपनीयता, निवडक पाहुणे

By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2021 6:43 AM

लंडनमध्ये झालेल्या या विवाहाला निवडक पाहुण्यांना अगदी आयत्यावेळी निमंत्रित करण्यात आले होते. जॉन्सन यांच्या कार्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही या विवाहाची गंधवार्ता नव्हती, इतकी त्याबाबत गोपनीयता पाळण्यात आली होती.

लंडन : ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी आपली वाग्दत्त वधू कॅरी सायमंडस्‌ यांच्याशी शनिवारी वेस्टमिनस्टर कॅथेड्रलमध्ये अत्यंत गुप्तता पाळून विवाह केला. यासंदर्भात त्या देशातील प्रमुख वृत्तपत्रांनी बातम्या प्रसिद्ध केल्या आहेत. लंडनमध्ये झालेल्या या विवाहाला निवडक पाहुण्यांना अगदी आयत्यावेळी निमंत्रित करण्यात आले होते. जॉन्सन यांच्या कार्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही या विवाहाची गंधवार्ता नव्हती, इतकी त्याबाबत गोपनीयता पाळण्यात आली होती. लंडनच्या मध्यवर्ती भागात असलेले वेस्टमिनस्टर कॅथेड्रल शनिवारी दुपारी दीड वाजता अचानक बंद करण्यात आले. त्यानंतर अर्ध्या तासाने पंतप्रधान बोरिस जॉन्सन व त्यांची वाग्दत्त वधू कॅरी सायमंडस्‌ हे चर्चमध्ये दाखल झाले, असे त्याबाबतच्या वृत्तात म्हटले आहे. बोरिस जॉन्सन हे ५६ वर्षांचे असून, सायमंडस्‌ या ३३ वर्षे वयाच्या आहेत. 

जॉन्सन २०१९ साली पंतप्रधान झाल्यापासून हे दोघेही लंडनमधील डाऊनिंग स्ट्रीट येथील निवासस्थानी एकत्र राहत होते. आपला साखरपुडा झाल्याचे या दोघांनी गेल्या वर्षी जाहीर केले होते. बोरिस व कॅरी यांना एप्रिल २०२० मध्ये पुत्ररत्नाचा लाभ झाला. या मुलाचे नाव विल्फ्रेड लॉरी निकोलस जॉन्सन असे आहे. बोरिस जॉन्सन व कॅरी हे जुलै २०२२ मध्ये विवाहबद्ध होणार असून, त्याचे निमंत्रण मित्र परिवाराला आतापासूनच पाठविण्यात आले आहे, असे वृत्त ब्रिटनमधील एका वृत्तपत्राने या महिन्याच्या प्रारंभी प्रसिद्ध केले होते. (वृत्तसंस्था)दोनदा घटस्फोटितबोरिस जॉन्सन यांनी आपल्या विवाहबाह्य संबंधांबाबत माहिती लपवून ठेवल्यामुळे त्यांना कॉन्झर्व्हेटिव्ह पक्षाच्या धोरणविषयक  समितीतून काढून टाकण्यात आले होते. इंग्लंडचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांचा दोनदा घटस्फोट झाला आहे.