शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus : कधी येऊ शकतो कोरोनाचा नवा व्हेरिएंट? वैज्ञानिकांनी केला याबाबत खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2021 16:25 IST

सिन्हुआच्या रिपोर्टनुसार ब्रिटनमध्ये यावर्षी हिवाळ्यात कोरोना व्हायरसचा नवा व्हेरिएंट सक्रिय होईल.

कोरोना व्हायरसची दुसरी लाट अजूनही पूर्णपणे ओसरली नसतानाच तिसरी लाट येण्याची शक्यता ब्रिटनला सतावत आहे. असं मानलं जात आहे की, कोरोना व्हायरसची तिसरी लाट (Coronavirus Third Wave) या हिवाळ्यात येऊ शकते. ज्यामुळे जगभरातील सरकारांना पुन्हा एकदा लॉकडाऊन लावण्याची गरज पडू शकते.

अडचणींचा ठरू शकतो हिवाळा

सिन्हुआच्या रिपोर्टनुसार ब्रिटनमध्ये यावर्षी हिवाळ्यात कोरोना व्हायरसचा नवा व्हेरिएंट सक्रिय होईल. अशात ब्रिटनमध्ये यावर्षी हिवाळ्याच्या सीझनमध्ये लोकांना फार समस्यांचा सामना करावा लागू शकतो. रिपोर्टनुसार यावर्षीच्या शेवटी लहान मुले आणि वयोवृद्ध  मोठ्या संख्येने या व्हायरसचे शिकार होऊ शकतात. (हे पण वाचा : दिलासादायक बातमी! एकदा पॉझिटिव्ह झाल्यानंतर दुसऱ्यांदा कोरोना संक्रमणाचा धोका कमी)

देशात लागू शकतो लॉकडाऊन

रिपोर्टमध्ये सांगण्यात आलं आहे की, ब्रिटिश सरकारची सल्लागार संस्था, सायंटिफिक अॅडव्हायजरी ग्रुप फॉर इमर्जन्सीने हा इशारा दिला आहे. SAGE चे सदस्य प्राध्यापक कॅलन सॅम्पल म्हणाले की, ब्रिटनमध्ये कोरोना व्हायरस डोकं वर काढण्याची चिंता वाढू शकते.  ज्यामुळे देशात लॉकडाऊनही लावला जाऊ शकतो.

कॅलम म्हणाले की, 'मला वाटतं की, कोरोनामुळे हिवाळा फारच घातक ठरणार आहे. त्यामुळे आम्हाला मोठ्या अडचणींचा सामना करावा लागेल. मला वाटतं की, पुढील वर्षी सामान्य रूपाने व्यापार केला जाऊ शकेल'.

व्हायरससोबत लढू शकतो

पब्लिक हेल्थ इंग्लंडचे निर्देशन सुसान हॉपकिंस यांनी याबाबत इशारा जारी केला आहे. ते म्हणाले की, 'कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटमुळे आम्हाला या हिवाळ्यात लॉकडाऊन लावावा जाऊ शकतो. असं असलं तरी आमच्याकडे या व्हेरिएंटसोबत लढण्यासाठी कोरोना वॅक्सीन टेस्टिंग आणि दुसरे उपचार असतील. ज्यांद्वारे आम्ही या व्हायरससोबत लढू शकतो.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याLondonलंडन