शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
2
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
3
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
4
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
5
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
6
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
7
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
8
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
9
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
10
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
11
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
12
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
13
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
14
अरेरे... देवाचं कामही नीट केलं नाही! तीन वर्षांत ५० कोटींचा खर्च तरीही विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या छताला गळती
15
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
16
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
17
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
18
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
19
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
20
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल

Liz Truss New PM: लिझ ट्रस ब्रिटनच्या नव्या पंतप्रधान; ऋषी सुनक यांचा पराभव

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2022 17:30 IST

British Prime Minister: सुरुवातीला आघाडीवर असलेले सुनक हे नंतर पिछाडीवर पडत गेले.

ब्रिटनमध्ये गेल्या काही काळापासून सुरु असलेल्या पंतप्रधान पदाची निवड आज संपली आहे. अनिवासी भारतीय उद्योजक ऋषी सुनक यांचा पराभव करून लिझ ट्रस ब्रिटनच्या नव्या पंतप्रधान बनल्या आहेत. 

ऋषी सुनक(Rishi Sunak) आणि लिझ ट्रस(Liz Truss) यांच्यात चुरशीची लढत पाहायला मिळाली होती. ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी राजीनामा दिला होता. लैंगिक शोषणाचे आरोप असलेल्या क्रिस पिंचर यांना बोरिस यांनी सरकारमध्ये सहभागी करून घेतल्याचा वाद उफाळून आला होता. यामुळे सुनक यांच्यासह जवळपास ५० जणांनी राजीनामा देत बंड पुकारले होते. यात सरकारचे मंत्रीदेखील असल्याने जॉन्सन यांनी अखेर राजीनामा दिला होता. यानंतर नवा पंतप्रधान निवडण्याची प्रक्रिया सुरु झाली होती. 

कॉन्झर्व्हेटिव्ह पक्षाचा नवा नेता निवडण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाल्यानंतर सुनक आणि ट्रस यांच्यात चुरस होती. देशात रोजगार संकट, औद्योगिक अशांतता आणि मंदीचा सामना करत असताना देशाची सत्ता हाती घेण्यास लिझ तयार आहेत. टीव्ही डिबेटमध्ये सुनक त्यांच्या खूप मागे पडले होते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, निवडणूक प्रचारादरम्यान, ऋषी सुनक हे देशातील समस्यांबाबत जनतेवर फारसा प्रभाव टाकू शकले नाहीत तर कंझर्व्हेटिव्ह पक्षातील त्यांच्या प्रतिस्पर्धी लिझ ट्रस या ते करण्यात यशस्वी ठरल्या आहेत.

लिझ ट्रस यांना 81,326 मते मिळाली, तर ऋषी सुनक यांना 60,399 मते मिळाली, तर मतदानाची टक्केवारी 82.6 टक्के होती. 

कर वाढवण्याचा आग्रहलिझ ट्रस यांनी कर कमी करण्याच्या आश्वासनावर निवडणूक लढवली आहे. पंतप्रधान झाल्यास १.२५ टक्क्यांपर्यंत कर कपात करण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे, तर ऋषी सुनक याउलट कर वाढवण्याचा आग्रह धरत राहिले. कर कपातीचा फायदा फक्त श्रीमंतांनाच होईल, त्यामुळे त्याची गरज नाही असे ऋषी सुनक यांनी म्हटले होते. 

टॅग्स :Liz Trussलिज ट्रसBoris Johnsonबोरिस जॉन्सन