शहरं
Join us  
Trending Stories
1
Gambhira Bridge Collapse : भयानक Video! गुजरातमध्ये गंभीरा पूल कोसळला, अनेक वाहने पाण्यात पडली; तिघांचा मृत्यू, शोध सुरु 
2
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये भारतानं पाकिस्तानला मूर्ख बनवलं अन् त्यांना कळलंही नाही! 'त्या'वेळी नेमकं काय झालेलं?
3
"फडणवीसजी, तुमच्या राज्यात गरीब आणि दुर्बलांचे असे हाल आहेत", संजय राऊतांनी व्हिडीओ दाखवला
4
जगातील सर्वात श्रीमंत देश बनू शकतो पाकिस्तान? 'या' नैसर्गिक खजिन्यापुढे चीन-अमेरिकाही काहीच नाही
5
Video: प्रसिद्ध गायकाविरोधात पोलिसांची कारवाई, बांद्रा वरळी सी-लिंकवर केला जीवघेणा स्टंट
6
भयंकर! ३२ वर्षीय प्रसिद्ध अभिनेत्रीचा मृत्यू; दोन आठवड्यानंतर घरात आढळला मृतदेह, चाहत्यांना धक्का
7
Trump Tariff: धमक्यांवर धमक्या, ट्रम्प यांची आता औषध कंपन्यांना धमकी; "अमेरिकेतच औषधं बनवा, अन्यथा..."
8
'चीन, पाकिस्तान आणि बांगलादेशची एकी भारतासाठी धोकादायक', CDS प्रमुख चौहान यांचं मुद्द्यावर बोट
9
मेट्रो प्रकल्पाला गती देण्यासाठी २५० परप्रांतीय मजूर मुंबईत दाखल; काहींना विमानाने मुंबईत आणले
10
ही तर सोनमपेक्षा एक पाऊल पुढे! बॉयफ्रेंडसाठी पतीला विष दिलं अन् कुणालाही कळण्याआधी केला खेळ खल्लास!
11
Stock Market Today: ७६ अंकांनी घसरून उघडला सेन्सेक्स; ३ सेक्टर्समध्ये तेजी, का अस्थिर आहे मार्केट?
12
भारत बंद होण्याआधीच इंडिया आघाडीचा चक्का जाम; बिहारमध्ये निवडणूक आयोगाविरोधात रस्ते बंद, रेल्वे रोखल्या
13
Pension Scheme: वृद्धापकाळात दरमहा ₹२०,५०० चं पेन्शन देईल ही स्कीम; पाहा याचे जबरदस्त ५ फायदे
14
Alia Bhatt : अभिनेत्री आलिया भटच्या माजी पर्सनल असिस्टंटला अटक; ७६ लाखांच्या फसवणुकीचा गंभीर आरोप
15
"मृणालची इमेज खराब होणार नाही अशी आशा", अजय देवगणसोबतचा डान्स पाहून केलं ट्रोल
16
लेकीला वाचवण्यासाठी आईने घरही विकलं, तरीही...; कोण आहे निमिषा प्रिया? येमेनमध्ये होणार फाशीची शिक्षा
17
लग्नाच्या पहिल्या रात्रीच पती नपुंसक असल्याचे समजले, तिने मोठ्या जावेला सांगितले, मग दीर आला...
18
Sanjay Gaikwad : आमदार संजय गायकवाडांचा राडा, आमदार निवास कँटिनमधील कर्मचाऱ्याला लाथा-बुक्क्यांनी मारहाण
19
स्मृती ईराणींचा राजकारणातून अभिनयाकडे युटर्न, १७ वर्षांनंतरच्या कमबॅकवर म्हणाल्या- 'पार्ट टाइम अ‍ॅक्ट्रेस'
20
लग्नाच्या ३ वर्षांतच पायल रोहतगीचा होणार घटस्फोट? ७ वर्ष लहान कुस्तीपटूशी थाटलेला संसार

UAE Golden Visa : केवळ २३ लाख रुपये देऊन चालणार नाही, युएईचा 'गोल्डन व्हिसा' मिळवण्यासाठी 'या' गोष्टीही महत्त्वाच्या!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2025 11:21 IST

UAE Golden Visa : युएई गोल्डन व्हिसाची ही प्रक्रिया फक्त पैसे भरण्याइतकी सोपी नाही. हा व्हिसा मिळवण्यासाठी अजूनही वेगवेगळ्या निकषातून पात्रता तपासली जाईल.

UAE Golden Visa Explained : संयुक्त अरब अमिराती अर्थात युएईने त्यांच्या गोल्डन व्हिसा योजनेत काही बदल केले आहेत. या बदलांमध्ये, विशेषतः भारतीय आणि बांगलादेशी नागरिकांसाठी, एका खास 'नॉमिनेशन' पद्धतीची सुरुवात झाली आहे. यानुसार, एकदा १ लाख यूएई दिरहम् (सुमारे २३.३ लाख रुपये) भरले की, तुम्हाला आयुष्यभर यूएईमध्ये राहण्याची परवानगी मिळू शकते. मात्र, जर तुम्ही केवळ २३ लाख रुपये भरून काम होईल असा विचार करत असाल, तर तसे नाही. 

युएई गोल्डन व्हिसाची ही प्रक्रिया फक्त पैसे भरण्याइतकी सोपी नाही. यूएई सरकारच्या अधिकृत वेबसाइटनुसार, हा व्हिसा मिळवण्यासाठी अजूनही वेगवेगळ्या निकषातून तुमची पात्रता तपासली जाईल. तुम्ही पैसे दिले असले तरी, तुमची पार्श्वभूमी, गुन्हेगारी रेकॉर्ड, तुम्ही करत असलेला व्यवसाय आणि इतर कागदपत्रांची तपासणी केली जाणार आहे.

यूएई गोल्डन व्हिसा म्हणजे काय?हा एक खास प्रकारचा रेसिडेन्सी परवाना आहे. तो मिळाल्यावर परदेशी नागरिक यूएईमध्ये स्थानिक व्यक्तीच्या मदतीशिवाय राहू शकतात, काम करू शकतात किंवा शिक्षण घेऊ शकतात. 

काय आहेत 'या' व्हिसाची वैशिष्ट्ये?

> ५ किंवा १० वर्षांसाठी व्हिसा, ज्याची मुदत पुन्हा वाढवता येते.

> अनेक वेळा यूएईमध्ये ये-जा करण्याची परवानगी.

> तुमच्या कुटुंबाला आणि घरकाम करण्यासाठी नोकरांना तुमच्यासोबत आणण्याची सोय.

> तुम्ही यूएईबाहेर कितीही काळ राहू शकता, त्यावर कोणतेही बंधन नाही.

कोणाला गोल्डन व्हिसा मिळू शकतो?युएईचा गोल्डन व्हिसा मिळवण्यासाठी काही ठराविक अटी आणि वर्गवारी आहेत.

गुंतवणूकदार: यूएईमध्ये मान्यताप्राप्त मालमत्ता किंवा फंडमध्ये २० लाख यूएई दिराम (४.६७ कोटी रुपये) गुंतवलेले असतील. हे पैसे तुमचे स्वतःचे असावे, कर्ज नसावे. तसेच, तुमच्याकडे वैद्यकीय विमा असावा आणि तुम्ही वर्षाला २,५०,००० यूएई दिराम इतका कर यूएईमध्ये भरट असाल.

उद्योजक: जर तुमचा तंत्रज्ञान किंवा नवीन कल्पनांवर आधारित व्यवसाय असेल, ज्याची किंमत ५ लाख यूएई दिराम  १.१७ कोटी रुपये) पेक्षा जास्त आहे आणि त्याला यूएईमधील संस्थांकडून मान्यता मिळाली असेल.

खास कौशल्य असलेले लोक: वैज्ञानिक, कलाकार, डॉक्टर, खेळाडू यांसारख्या व्यक्तींना यूएई सरकारच्या संबंधित विभागांकडून शिफारसपत्र (endorsement) आवश्यक आहे. कार्यकारी पदांवरील व्यक्तींचा पगार किमान ५०,००० यूएई दिराम प्रति महिना असावा आणि त्यांना पाच वर्षांचा कामाचा अनुभव असावा.

हुशार विद्यार्थी: ज्यांनी हायस्कूलमध्ये ९५% गुण मिळवले आहेत किंवा विद्यापीठात टॉप केले आहे, त्यांना ५ ते १० वर्षांसाठी हा व्हिसा मिळू शकतो.

समाजसेवक आणि फ्रंटलाइन वर्कर्स: ज्यांनी समाजसेवेत मोठे योगदान दिले आहे किंवा मानवतावादी कामात सक्रिय आहेत, त्यांनाही हा व्हिसा मिळू शकतो.

भारतीयांसाठी नवीन काय?आता रायद ग्रुप, वन वास्को आणि व्हीएफएस ग्लोबल यांसारख्या अधिकृत एजंट्समार्फत भारतीय आणि बांगलादेशी नागरिकांना 'नॉमिनेशन-आधारित' गोल्डन व्हिसा दिला जात आहे. यामुळे २० लाख यूएई दिराम गुंतवणुकीची अट रद्द झाली आहे. यात तुम्हाला फक्त एकदा १ लाख यूएई दिरहम् (२३.३ लाख रुपये) शुल्क भरायचे आहे.

मात्र, पैसे भरून काम होणार नाही. हा व्हिसा देण्याआधी तुमच्यावर कोणताही गुन्हेगारी रेकॉर्ड नाही, तुमची आर्थिक स्थिती चांगली आहे आणि तुमच्या सोशल मीडियाचा इतिहासही तपासला जाईल.

रायद ग्रुपचे रायद कमल अयुब यांनी म्हटले की, "अर्जदारांची निवड ते यूएईच्या अर्थव्यवस्थेसाठी आणि समाजासाठी किती महत्त्वाचे आहेत यावर आधारित असते. ही एक सुवर्णसंधी आहे, पण याचा अर्थ असा नाही की प्रत्येकाला हा व्हिसा मिळेल. याबाबत अंतिम निर्णय यूएईचे अधिकारीच घेतील."

अर्ज कसा करावा?या व्हिसासाठी अर्ज करण्यासाठी तुम्ही पारंपरिक किंवा नॉमिनेशन-आधारित पद्धत निवडू शकता.

>सगळ्यात आधी तुम्ही गुंतवणूकदार, उद्योजक, प्रतिभावान व्यक्ती, विद्यार्थी किंवा समाजसेवक यापैकी कोणत्या कॅटेगरीत येता हे ठरवा.

> आवश्यक कागदपत्रे, पगाराच्या स्लिप्स, शिफारसपत्रे, मालमत्तेची कागदपत्रे, कर भरल्याची पावती, शैक्षणिक गुणपत्रिका आणि ओळखपत्रे गोळा करा.

> आयसीपीच्या (ICP) वेबसाइटवर किंवा व्हीएफएस ग्लोबलसारख्या अधिकृत एजंट्समार्फत अर्ज सादर करा. 

> या प्रक्रियेसाठी तुम्ही 'वन टच' सेवा देखील निवडू शकता. यात व्हिसा देणे, वैद्यकीय तपासणी, अमिरात आयडी मिळवणे आणि व्हिसा नूतनीकरण करणे या सर्व गोष्टींचा समावेश असतो.

> यानंतर तुमची पार्श्वभूमी तपासली जाईल. मंजूरी मिळाल्यावर तुम्हाला गोल्डन व्हिसा मिळेल.

अधिक माहितीसाठी कुठे संपर्क साधावा?याबाबत काही शंका किंवा काही माहिती हवी असल्यास, तुम्ही खालील सरकारी संस्थांशी संपर्क साधू शकता.

ICP - Federal Authority for Identity, Citizenship, Customs and Port Security

GDRFAD Dubai - General Directorate of Residency and Foreigners Affairs

नवीन नियमांमुळे व्हिसा मिळवणे थोडे सोपे झाले असले तरी, गोल्डन व्हिसा अजूनही तुमच्या पात्रतेवर आधारित आहे, तो नुसता पैसे देऊन खरेदी करता येत नाही. फक्त पैसे असणे म्हणजे तुम्हाला आजीवन रेसिडेन्सी मिळेल याची हमी नाही, असे अधिकारी वारंवार सांगत आहेत.

टॅग्स :Visaव्हिसाUnited Arab Emiratesसंयुक्त अरब अमिरातीDubaiदुबई