शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

अमेरिकेत दोन विमानांची आकाशात धडक, अपघाताचे थरारक दृश्य कॅमेऱ्यात कैद!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2022 11:26 IST

US War Plane Crash : या अपघातात 6 जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे.

अमेरिकेतल्या (America) टेक्सासमधल्या (Texas) दल्लासमध्ये एक मोठी विमान दुर्घटना घडली आहे. एअर शो (Air Show) दरम्यान दोन लढाऊ विमाने एकमेकांवर आदळली.  या अपघातानंतर दोन्ही विमानांना आग लागली. माजी सैनिक दिनानिमित्त एअर शोचे आयोजन करण्यात आले होते. 

बी-17 फ्लाइंग फोर्ट्रेस विमानात पाच क्रू सदस्य आणि पी-63 किंग कोब्रा विमानात एक व्यक्ती होती, असे अपघातग्रस्त विमानाची मालकी असलेल्या कॉमेमोरिटिव्ह एअर फोर्सचे प्रवक्ते लियाह ब्लॉक यांनी सांगितले. या अपघातात 6 जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे.

एअर शो दरम्यान, ही घटना शनिवारी दुपारी 1.20 च्या सुमारास शहराच्या मुख्य भागापासून 16 किमी अंतरावर असलेल्या दल्लास एक्झिक्युटिव्ह विमानतळावर घडली. या दुर्घटनेची माहिती मिळताच आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या 40 हून अधिक गाड्या घटनास्थळी पोहोचल्या.

घटनास्थळी तात्काळ बचावकार्य सुरु करण्यात आले. या दुर्घटनेत सर्वच्या सर्व 6 जणांचा मृत्यू झाल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. ट्विटरवर पोस्ट करण्यात आलेल्या अनेक व्हिडीओंमध्ये दोन विमाने हवेत एकमेकांवर आदळताना दिसत आहेत. दोन्ही विमाने आकाशात एकमेकांवर आदळली आणि स्फोट झाला.

दरम्यान, FAA आणि राष्ट्रीय वाहतूक सुरक्षा मंडळाने अपघाताची चौकशी सुरू केली आहे. अमेरिकेच्या फेडरल एव्हिएशन मंत्र्यांनी या अपघाताच्या चौकशीचे आदेश जारी केले आहेत. एअर शोमध्ये एवढी मोठी चूक कशी झाली, असा प्रश्न उपस्थित होत आहे. 

टॅग्स :Americaअमेरिकाairplaneविमान