शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
US Israel Iran War : युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
4
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
5
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
6
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
7
मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
8
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
9
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
10
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
11
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
12
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
13
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
14
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
15
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
16
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
17
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
18
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
19
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
20
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
Daily Top 2Weekly Top 5

दोन इराणी एजंट, तीन खोल्यांमध्ये बॉम्ब आणि..., हानियाच्या हत्येसाठी मोसादने आखला असा प्लॅन   

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2024 15:30 IST

Ismail Haniyeh News: हमासविरोधात पुकारलेल्या युद्धादरम्यान, इस्राइलने ३१ जुलै रोजी हमासचा नेता इस्माइल हानिया याची उत्तर तेहरानमधील अत्यंत सुरक्षित अशा भागात घरामध्ये बॉम्बस्फोट घडवून हत्या केली. हानियाची हत्या करण्यासाठी इस्राइलची गुप्तहेर संघटना  मोसादने आखलेला प्लॅन आता समोर आला आहे.

हमासविरोधात पुकारलेल्या युद्धादरम्यान, इस्राइलने ३१ जुलै रोजी मोठी कारवाई केली. या कारवाईत इस्राइलने हमासचा नेता इस्माइल हानिया याची उत्तर तेहरानमधील अत्यंत सुरक्षित अशा भागात घरामध्ये बॉम्बस्फोट घडवून हत्या केली. सुरुवातीला इस्राइलने हवाई हल्ला करून हानिया याची हत्या केल्याचा दावा हमासकडून करण्यात आला. तर इराणी प्रसारमाध्यमांनी ड्रोनद्वारे ३ क्षेपणास्रे डागण्यात आली. नंतर ही क्षेपणास्त्रे इराणबाहेरून डागण्यात आल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, हानियाची हत्या करण्यासाठी इस्राइलची गुप्तहेर संघटना  मोसादने आखलेला प्लॅन आता समोर आला आहे.

इस्माइल हानिया याच्या हत्येप्रकरणी सातत्याने नवनवे गौप्यस्फोट होत आहेत. अनेक माध्यमांनी केलेल्या दाव्यानुसार मोसादने इराणमधील एजंटांना इस्माइल हानिया वास्तव्यास असणाऱ्या तेहरानमधीस इमारतीमध्ये स्फोटके ठेवण्यासाठी नियुक्त केलं होतं. इस्माइल हानियाच्या हत्येची योजना मे महिन्यामध्ये आखण्यात आली होती. हानिया इराणीचे तत्कालीन राष्ट्रपती इब्राहिम रईसी यांच्या अंत्यसंस्कारासाठी तेहरानच्या दौऱ्यावर आला असताना त्याची हत्या करण्याची तयारी करण्यात आली होती. मात्र तेव्हा मोठ्या प्रमाणावर गर्दी असल्याने ही योजना रद्द करण्यात आली. कदाचित हा प्लॅन अयशस्वी ठरण्याची शक्यता होती. त्यामुळे तो स्थगित करण्यात आला. 

दरम्यान, नव्याने आखण्यात आलेल्या योजनेनुसार मोसादच्या सूचनेनुसार काम करत असलेल्या दोन हस्तकांनी उत्तर तेहरानमधील इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्स गेस्ट हाऊसच्या तीन वेगवेगळ्या खोल्यांमध्ये स्फोटकं ठेवली. हानिया इथेच वास्तव्यास राहील, याचा अंदाज घेऊन हे ठिकाण निवडण्यात आलं. आता इराणी अधिकाऱ्यांना मिळालेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये एजंट तिथे फिरताना आणि अनेक खोल्यांमध्ये घुसून बाहेर येताना दिसत आहेत. दरम्यान, स्फोटकं पेरल्यानंतर हे एजंट कुणाच्याही हाती न लागता इराणच्या बाहेर निघून गेले. मात्र त्यांनी आपला एक हस्तक इराणमध्ये ठेवला होता. दरम्यान, ३१ जुलै रोजी पहाटे २ च्या सुमारास स्फोट घटवण्यात आला. त्यात इस्माइल हानिया याचा मृत्यू झाला.  

टॅग्स :Israel-Hamas warइस्रायल - हमास युद्धIranइराणInternationalआंतरराष्ट्रीय