शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO: पाकिस्तानात भीषण अपघात; दोन ट्रेन्सच्या जोरदार धडकेत ३० जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2021 09:17 IST

दोन एक्स्प्रेस रेल्वे गाड्यांची आमनेसामने धडक; मृतांचा आकडा वाढण्याची भीती

सिंध: पाकिस्तानमधील सिंध प्रांतात सकाळच्या सुमारास एक मोठा अपघात झाला आहे. सिंधच्या डहारकी भागात दोन रेल्वेगाड्यांनी एकमेकांना धडक दिली. यामध्ये ३० जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. मिल्लत एक्स्प्रेस आणि सर सय्यद एक्स्प्रेसची जोरदार धडक झाली. दोन्ही एक्स्प्रेसचे काही डबे रुळावरून घसरले आहेत. तर काही डबे उलटले आहेत. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. सिंधमधील घोटकी भागात रेल्वे गाड्यांचा अपघात झाला. जियो टीव्हीनं दिलेल्या वृत्तानुसार, मिल्लत एक्स्प्रेसचे डबे नियंत्रणाबाहेर जाऊन रेल्वे रुळांच्या शेजारी पडले. त्याचवेळी समोरून येत असलेल्या सय्यद एक्स्प्रेसनं मिल्लत एक्स्प्रेसला धडक दिली. यामुळे सय्यद एक्स्प्रेसचे चार डबे इंजिनासह रुळांवरून घसरले. या अपघातात ३० जणांचा मृत्यू झाला आहे. तर ४० ते ५० जण जखमी झाले आहेत. मिल्लत एक्स्प्रेसचे ८ डबे रुळांवरून खाली घसरले आहेत.  मिल्लत एक्स्प्रेस कराचीहून सरगोधाला, तर सय्यद एक्स्प्रेस रावळपिंडीहून कराचीला जात असताना हा अपघात झाला. त्यावेळी पहाटेचे पावणे चार वाजले होते. अपघात झाल्यानंतर ४ तासांनंतरही रेल्वेचे अधिकारी दुर्घटनास्थळी पोहोचले नाहीत. अद्यापही अनेक प्रवासी अपघातग्रस्त डब्यांमध्ये अडकले आहेत. डबे कापून त्यांची सुटका करण्याचं काम अद्याप सुरू व्हायचं आहे. अनेक जखमींना ट्रॅक्टर ट्रॉलीमधून रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. रेल्वेचे डबे कापण्यासाठी लागणारे कटर्स आणि इतर साहित्य अद्याप तरी घटनास्थळी आणण्यात आलेलं नाही.