शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंसा हे प्रश्नांचं उत्तर नाही, लोकशाहीतूनच आमूलाग्र बदल शक्य; सरसंघचालकांनी टोचले राजकीय पक्षांचे कान
2
'पीओके'मध्ये निदर्शने हिंसक झाली, पाकिस्तानी सुरक्षा दलांनी गोळीबार केला; १२ नागरिकांचा मृत्यू
3
Post Office च्या ‘या’ स्कीममध्ये संपेल पेन्शनचं टेन्शन, दर महिन्याला मिळतील ₹२००००
4
Video: "आय लव्ह मराठी! मी मराठी शिकतोय, माझ्याशी मराठीत बोला..."; अबू आझमींना झाली उपरती
5
महात्मा गांधींच्या पणतीला पाहिलंत का? दिसायला आहे खूप ग्लॅमरस, गाजवतेय हॉलिवूड
6
भारतासाठी नवीन संकट? अमेरिकेसह सात देश करत आहेत मोठी तयारी; रशियासोबत कनेक्शन
7
'मानवी इतिहासाचा मार्ग बदलला', पंतप्रधान मोदींनी राजघाटावर महात्मा गांधींना श्रद्धांजली वाहिली
8
आता चीनला जाण्यासाठी भारतातून मिळणार थेट विमान सेवा; प्रवाशांचा वेळ अन् पैसा वाचणार
9
डायबिटीज रुग्णांसाठी गुडन्यूज! ब्लड शुगर आणि लठ्ठपणा गुणकारी औषधीच्या विक्रीला केंद्राची मंजुरी
10
तृप्ती, शर्वरी की अनन्या, कोणती अभिनेत्री दिसणार 'चांदनी बार'च्या सीक्वलमध्ये मुख्य भूमिकेत?
11
युक्रेन युद्धानंतर पुतिन पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर येणार, अनेक करारांवर स्वाक्षऱ्या होणार
12
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
13
चार आरोपींवर १९ वर्षांनंतर झाले आरोप निश्चित मालेगाव बॉम्बस्फोट; विशेष न्यायालयांत सुनावणी
14
राशीभविष्य २ ऑक्टोबर २०२५: आज कामात यश मिळून आर्थिक लाभ होतील, नशिबाची साथ मिळेल
15
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
16
केंद्रीय मंत्रिमंडळाची दसरा भेट : ४९.१९ लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांसह ६८.७२ लाख निवृत्तीवेतनधारकांना मिळणार लाभ
17
आज गाजणार मेळावे! वाचा महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या सभांचे वेळापत्रक आणि प्रमुख मुद्दे
18
भ्रष्टाचारात महाराष्ट्र सलग तिसऱ्या वर्षी देशात टॉप; पुण्यात सर्वाधिक लाचखोर!
19
ईएमआय भरले म्हणून पती संयुक्त मालमत्तेवर एकट्याने मालकीचा दावा करू शकत नाही!
20
रा. स्व. संघाने शिकवली फक्त शिस्त आणि सेवा! मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितली संघ शाखेतील प्रार्थनेची शक्ती

दोन बॉम्बस्फोटांनी हादरले सोमालिया; १००हून अधिक जण ठार, ३०० जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2022 05:58 IST

दहशतवादी ‘अल् शबाब’ने स्वीकारली हल्ल्यांची जबाबदारी

मोगादिशू : सोमालियाची राजधानी मोगादिशू येथे शिक्षण मंत्रालयाच्या इमारतीसमोर शनिवारी झालेल्या दोन कार बॉम्बस्फोटांमध्ये १००हून अधिक जणांचा मृत्यू झाला, तर ३००पेक्षा जास्त लोक जखमी झाले आहेत. ही माहिती त्या देशाचे राष्ट्राध्यक्ष हसन शेख मोहम्मद यांनी दिली आहे. अल् शबाब या दहशतवादी संघटनेने दोन कारबॉम्ब स्फोटांची जबाबदारी स्वीकारल्याचे सोमालिया सरकारच्या सूत्रांनी सांगितले.

मोगादिशू पोलिसांचे प्रवक्ते सादिक दूदिशे यांनी सांगितले की, मृतांमध्ये लहान मुले, महिला यांचाही समावेश आहे. शिक्षण मंत्रालयाची इमारत, तेथे असलेली एक शाळा, निरपराध नागरिक यांना लक्ष्य करण्यासाठीच हे कार बॉम्बस्फोट घडविण्यात आले. त्यात सोमालियातील वृत्तवाहिनीचा एक पत्रकार मोहम्मद इसे कोना यांचाही मृत्यू झाला आहे. मृतांच्या संख्येत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.  स्फोटांमुळे अनेक जणांच्या जागीच चिंधड्या उडाल्या. पहिला बॉम्बस्फोट झाल्यानंतर त्यात सापडलेल्या लोकांना मदत करण्यासाठी अनेक लोक घटनास्थळी धावले व काही मिनिटांतच दुसरा बॉम्बस्फोट झाला. 

अल् शबाबच्या वाढत्या कारवाया- 

सोमालियामध्ये अल् कायदाशी संलग्न असलेली अल् शबाब ही संघटना गेल्या दहा वर्षांपासून त्या देशात घातपाती कारवाया करत आहे. विद्यमान केंद्र सरकारला घालवून अल् शबाबला सत्तेवर कब्जा करायचा आहे. यंदाच्या वर्षी ऑगस्ट महिन्यात मोगादिशू येथील हयात हॉटेलवर अल् शबाबच्या दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. त्यात २० जणांचा मृत्यू झाला. त्यावेळी दहशतवादी व सुरक्षा सैनिकांमध्ये सुमारे ३० तास चकमक झाली होती. 

टॅग्स :Deathमृत्यूInternationalआंतरराष्ट्रीय