शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus: कोरोनाच्या डेल्टा व्हेरिएंटनं हॉस्पिटलमध्ये दाखल होण्याचा धोका अधिक; यूकेच्या रिपोर्टमध्ये दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2021 22:39 IST

अल्फा व्हेरिएंटच्या तुलनेत कोरोनाचा डेल्टा व्हेरिएंट(Coronavirus Delta Variant) अधिक संक्रमण पसरवणारा आहे.

ठळक मुद्दे अल्फा व्हेरिएंटच्या तुलनेत डेल्टा संक्रमित रुग्णांना आपत्कालीन आणि हॉस्पिटलमध्ये दाखल करण्याचा धोका अधिक या स्टडीत ४३ हजार ३३८ कोविड रुग्णांचा अभ्यास करण्यात आला. मार्च ते मे या काळात अल्फा आणि डेल्टा दोन्ही यूकेत होतेज्या लोकांनी लसीकरणाचाही एकही डोस घेतला नाही अशांनी लवकरात लवकर लस घ्यावी

नवी दिल्ली – गेल्या वर्षभरापासून संपूर्ण जगात कोरोनानं हाहाकार माजवला आहे. यातच कोविडचे नवनवीन व्हेरिएंट लोकांसाठी धोकादायक ठरत असल्याचं समोर आलं आहे. यूकेच्या नव्या स्टडीनुसार, कोविड १९ च्या डेल्टा व्हेरिएंट संक्रमित लोकांना अल्फा व्हेरिएंटच्या तुलनेत हॉस्पिटलमध्ये दाखल करण्याचा धोका दुपटीनं आढळून आला आहे. पब्लिक हेल्थ इंग्लंड आणि कॅम्ब्रिज यूनिवर्सिटीनं हा रिपोर्ट तयार केला आहे.

शुक्रवारी द लैसेंट जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या या रिपोर्टमध्ये हॉस्पिटलमध्ये दाखल करण्याचा धोका ते लोकांना पूर्णपणे आरोग्यविषयक काळजी घेण्यावर भर दिला आहे. संशोधकांनी सांगितले आहे की, अल्फा व्हेरिएंटच्या तुलनेत कोरोनाचा डेल्टा व्हेरिएंट(Coronavirus Delta Variant) अधिक संक्रमण पसरवणारा आहे. या स्टडीत अल्फा व्हेरिएंटच्या तुलनेत डेल्टा संक्रमित रुग्णांना आपत्कालीन आणि हॉस्पिटलमध्ये दाखल करण्याचा धोका अधिक आढळला आहे. लसीकरण न झालेली लोकसंख्या जर डेल्टा व्हेरिएंटच्या विळख्यात अडकली तर अल्फा व्हेरिएंटहून अधिक आरोग्य व्यवस्थेवर ताण पडण्याची शक्यता आहे.

या स्टडीत ४३ हजार ३३८ कोविड रुग्णांचा अभ्यास करण्यात आला. मार्च ते मे या काळात अल्फा आणि डेल्टा दोन्ही यूकेत होते. ज्या लोकांचं लसीकरण झालं नाही अशा लोकांचे प्रमाण कोरोनानं संक्रमित होणाऱ्यांमध्ये अधिक आहे. या स्टडीमुळे मागील रिपोर्टची पुष्टी झाली आहे. अल्फा व्हेरिएंटच्या तुलनेत डेल्टा व्हेरिएंटनं संक्रमित रुग्णांना हॉस्पिटलची जास्त गरज भासू शकते. पण यात बहुतांश लस न घेतलेल्यांचा समावेश असेल असं पीएचई नॅशनल इन्फेक्शन सर्व्हिसचे डॉ. गोविन डबरेरा यांनी सांगितले आहे.

ताज्या निष्कर्षानुसार, ब्रिटनमध्ये ४७.९ मिलियनपेक्षा अधिक लोक अथवा १६ वर्ष आणि त्यापेक्षा अधिक वयाच्या ८८ टक्के लोकांना आतापर्यंत लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे. जवळपास ४२ मिलियन लोकांना ७८ टक्के लोकांना दोन्ही डोस दिले आहेत. लसीकरण डेल्टा व्हेरिएंटविरोधात उत्तम प्रकारे सुरक्षा प्रदान करते. यूकेत ९८ टक्के प्रकरण समोर आले आहेत. ज्या लोकांनी लसीकरणाचाही एकही डोस घेतला नाही अशांनी लवकरात लवकर लस घ्यावी हे महत्वाचं आहे असं गोविन डबरेरा यांनी सांगितले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लस