शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
2
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
3
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
4
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
5
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
6
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
7
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
8
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
9
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
10
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
11
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
12
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
13
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
14
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
15
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
16
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
17
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
18
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
19
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
20
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
Daily Top 2Weekly Top 5

ज्याने चेहऱ्यावर फेकलं होतं अ‍ॅसिड, तरूणीने त्याच्यासोबतच केलं लग्न; सोशल मीडियावरून टिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2021 17:34 IST

Acid Survivor Love Marriage: याप्रकरणी तरूणाला १३ वर्ष ६ महिन्यांची तुरूंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली होती. पण कायद्यात बदल झाल्याने तो तुरूंगातून लवकर सुटला. 

तुर्कीमध्ये (Turkey) राहणारी २० वर्षीय एका तरूणीने मोठं मन दाखवत त्या व्यक्तीसोबत लग्न केलं (Acid Survivor Love Marriage) ज्याने तिच्या चेहऱ्यावर अ‍ॅसिड फेकलं होतं. या घटनेनंतर तरूणीला आता केवळ ३० टक्केच दिसतं. या तरूणीवर लोक सोशल मीडियावर टीका करत आहेत. लोक म्हणत आहेत की, तिने तसं करायला नको होतं. 

तरूणीचं नाव बेरफिन ओजेक आहे. ज्या व्यक्तीसोबत तिने लग्न केलं त्याचं नाव कासिम ओजन सेल्टी आहे. डेली मेलमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, कासिमने बेरफिनवर २०१९ मध्ये अ‍ॅसिड हल्ला केला होता. दोघेही रिलेशनशिपमध्ये होते. दोघे वेगळे झाले होते तेव्हा कासिमने तिच्यावर अ‍ॅसिड हल्ला केला होता. याप्रकरणी तरूणाला १३ वर्ष ६ महिन्यांची तुरूंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली होती. पण कायद्यात बदल झाल्याने तो तुरूंगातून लवकर सुटला. 

कासिम अ‍ॅसिड हल्ला करण्याआधी तरूणीला म्हणाला होता की, 'जर ती त्याची नाही झाली तर दुसऱ्या कुणाची होऊ शकत नाही'. या घटनेनंतर जेव्हा तरूणी शुद्धीवर तेव्हा तिने याचा खुलासा केला होता. त्यानंतर तिच्या बॉयफ्रेन्डला शिक्षा मिळाली होती. मात्र, नंतर तिच्या बॉयफ्रेन्ड पश्चाताप झाला आणि तो तिला पुन्हा पुन्हा माफी मागत होता. त्यानंतर बेरफिनने तिची तक्रार मागे घेतली होती. 

बेरफिनचे वडील म्हणाले की, त्यांना याबाबत काहीच माहीत नाही. आम्ही इतकी वर्ष कायदेशीर लढाई लढली. पण आता सगळं वाया गेलं. या कपलच्या या निर्णयामुळे त्यांच्यावर सोशल मीडियातून टीका होत आहे. 

पण त्यांनी कुणाच्याही टिकेवर उत्तर दिलं नाही. एका यूजरने लिहिलं होतं की, माफी मागितल्याने त्याचा गुन्हा कमी होत नाही. मला तर वाटतं हे लग्न एक-दोन महिन्यात तुटेल. या तरूणीला त्याच तरूणासोबत रहाययंच ज्याने तिच्यासोबत इतकं वाईट केलं. 

टॅग्स :Internationalआंतरराष्ट्रीयJara hatkeजरा हटके