इस्लामाबाद - पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यात अलीकडेच सैन्य संघर्ष पाहायला मिळाला. त्यामागील एक कारण म्हणजे तहरीक ए तालिबान संघटनेकडून सातत्याने पाकिस्तानवर होणारे हल्ले आहेत. पाकिस्तानने टीटीपीवर नियंत्रण मिळवण्याबाबत अनेक दावे केले परंतु ही संघटना अद्यापही त्यांची ताकद दाखवून देत आहे. पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वा प्रांतातील राजधानी पेशावरमध्ये टीटीपीचे लोक उघडपणे वावर करत आहेत. रस्त्यांवर त्यांच्या चौक्या बांधल्या आहेत. त्यामुळे पाकिस्तानी लष्कर प्रमुख असीम मुनीर यांच्या समोर नवं आव्हान उभे राहिले आहे.
पेशावरमधील एक कथित व्हिडिओ समोर आला आहे. ज्यात टीटीपी बंडखोर रस्त्यांवर चौक्या बनवत आहे. त्यातून या परिसरात पाकिस्तानी सरकार आणि तिथले लष्कर यांचे पूर्णपणे नियंत्रण हटल्याचे दिसून येते. पेशावरच्या आसपास परिसरात ना पाकिस्तानी सैन्य पाहायला मिळत आहे ना तिथे कुठलीही पोलीस यंत्रणा आहे. याठिकाणी टीटीपीचे बंडखोर संपूर्ण शहर कंट्रोल करत आहेत.
दोहा करारावर प्रश्नचिन्ह
टीटीपीने पेशावर ताब्यात घेतल्याचे व्हिडिओ समोर आल्यानंतर पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमधील अलिकडच्या करारावरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. अहमद शरीफजाद यांनी एक्स वर लिहिले आहे की, "टीटीपीने पेशावरला जाणारा मुख्य रस्ता रोखला. याचा अर्थ तालिबानने त्यांचे वचन मोडले आहे असा आरोप त्यांनी केला. तालिबानच्या पाठिंब्याने टीटीपी उघडपणे त्यांचे काम करत आहे. टीटीपी जर विना कुठलीही भीती बाळगता चौक्या बनवत आहे. त्यामुळे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी पाकिस्तानने दोहा येथे तालिबानसोबत काय केले हे सांगायला हवे असंही अहमद शरीफाजाद यांनी म्हटलं.
पाकिस्तानसमोर टीटीपी सातत्याने आव्हान उभे करत आहे. तहरीक ए तालिबान पाकिस्तानला अफगाणिस्तानातील तालिबान आश्रय देत असल्याचा पाकचा आरोप आहे. मात्र पाकचे आरोप अफगाणिस्तानने नाकारले आहेत. सध्या या मुद्द्यावरून दोन्ही देशात तणाव आहे. पाकिस्तानच्या केपीके आणि बलूचिस्तानमध्येही टीटीपीने पाकिस्तानी सैन्य आणि सुरक्षा जवानांवर हल्ले केले आहेत. पाकिस्तानला मुख्य आव्हान खैबर पख्तूनख्वा या भागात आहे. २०२१ पासून याठिकाणी हिंसाचारात वाढ झाली आहे, जेव्हा अफगाणिस्तानात तालिबानी वर्चस्व आले. अमेरिकेने अफगाणिस्तान सोडल्यावर तिथला हिंसाचार कमी होईल अशी पाकिस्तानला अपेक्षा होती परंतु त्याउलट चित्र दिसून येत आहे.
Web Summary : Video shows TTP insurgents controlling Peshawar, challenging Pakistan's authority. Despite claims of control, TTP's presence raises questions about agreements with Afghanistan and highlights escalating tensions. The situation presents a significant challenge to Pakistan's military leadership.
Web Summary : वीडियो में टीटीपी आतंकवादियों का पेशावर पर नियंत्रण, पाकिस्तान के दावों को चुनौती। नियंत्रण के दावों के बावजूद, टीटीपी की उपस्थिति अफगानिस्तान के साथ समझौतों पर सवाल उठाती है और बढ़ते तनाव को उजागर करती है। यह स्थिति पाकिस्तान के सैन्य नेतृत्व के लिए एक महत्वपूर्ण चुनौती है।