शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशच्या माजी पंतप्रधान बेगम खालिदा झिया यांचे ८० व्या वर्षी निधन; मुलगा १७ वर्षांनी परतताच...
2
हिंगोलीकरांची पहाट भीतीदायक! पिंपळदरी, नांदापूर परिसरात धरणी माता हादरली; पहाटे ५:५६ची ती वेळ...
3
नाशिकच्या श्री काळाराम मंदिराच्या विश्वस्तपदासाठी राजकारण्यांचे वावडे
4
"...तर इस्रायल संपला असता!" ट्रम्प यांनी केलं नेतन्याहूंचं कौतुक, ५ मिनिटांत ३ मोठे प्रश्न लावले मार्गी!
5
केंद्र सरकारने साखरेचा विक्री दर वाढवावा; शरद पवार घेणार केंद्रीय मंत्री अमित शाह यांची भेट 
6
आजचे राशीभविष्य ३० डिसेंबर २०२५ : मेष आणि मिथुन राशीला भाग्याची साथ, तर कन्या अन् धनु राशीने...
7
येमेनच्या नागरिकाच्या अटकेचा भार सरकारी तिजोरीवर; खटला निकाली काढा, मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश
8
शिक्षक भरती : प्रमाणपत्र अटीमुळे मराठा उमेदवार होणार बेरोजगार? खुल्या प्रवर्गातून अर्ज भरलेल्यांमध्ये तीव्र नाराजी
9
चारित्र्याच्या संशयातून पत्नी व चार वर्षीय मुलाचा निर्घृण खून
10
नवी मुंबई, मिरा-भाईंदर, उल्हासनगरात युती तुटली; मुंबई, ठाण्यात युतीचे जमले; केडीएमसी, पनवेल, वसई-विरारमध्ये युतीचे संकेत 
11
मोठी दुर्घटना टळली! डायलिसिस उपचार केंद्रात आग, काच फोडून आठ जणांना वाचविले; उमरखेड येथील रुग्णालयातील घटना
12
अरवलीच्या व्याख्येचा वाद तज्ज्ञ समितीकडे; आपल्याच निर्देशांना सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती; आता २१ जानेवारीला सुनावणी 
13
भांडुपमध्ये बेस्ट इलेक्ट्रिक बसने घेतला चौघांचा बळी; दहा जखमी
14
चांदीची किंमत का वाढतेय? कुठे-कुठे होतोय वापर? बनली जागतिक तंत्रज्ञान क्रांतीचा कणा
15
अपेक्षित गॅस गेला कुठे? सरकारने मागितली २.७९ लाख कोटींची भरपाई
16
Nashik: नाशिकमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शिंदेसेना एकत्र लढणार; भाजपचं काय?
17
TMC: ठाण्यात महायुतीचं जागावाटप फायनल; शिंदेसेना ८७ तर भाजप ४० जागा लढणार!
18
शिवीगाळ, दमदाटी, धक्काबुक्की...;  एबी फॉर्मवरून काँग्रेस कार्यालयात कार्यकर्त्यांमध्ये राडा!
19
Ahilyanagar: अहिल्यानगरमध्ये शिंदेसेनेची महायुतीकडं पाठ, स्वबळावर लढणार, गणित कुठं बिघडलं?
20
 Mira Bhayandar: भाजपच्या 'त्या' निर्णयामुळे आमदारपुत्र तकशील मेहतांची उमेदवारी धोक्यात!
Daily Top 2Weekly Top 5

ट्रम्प यांचा मुस्लिमबहुल देशांसाठीचा प्रवेशबंदीचा निर्णय पुन्हा लागू

By admin | Updated: June 26, 2017 22:37 IST

6 देशांच्या नागरिकांना अमेरिकेत प्रवेशबंदी करण्याचा राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी काढलेला वादग्रस्त आदेश अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने कायम ठेवला

ऑनलाइन लोकमतवॉशिंग्टन, दि. 26 - मुस्लिमबहुल 6 देशांच्या नागरिकांना अमेरिकेत प्रवेशबंदी करण्याचा राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी काढलेला वादग्रस्त आदेश अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने कायम ठेवला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांचा आदेश रद्दबातल ठरवण्याच्या राज्यांच्या न्यायालयांनी दिलेले अंतरिम आदेश सर्वोच्च न्यायालयाने रद्द केेले आहेत. इराण, लीबिया, सोमालिया, सुदान, सीरिया आणि येमेन या देशांच्या नागरिकांना 90 दिवस अमेरिकेत प्रवेश करण्यास मज्जाव करणे ट्रम्प प्रशासनास आता शक्य होणार आहे. न्यायालयानं या निर्णयावर शिक्कामोर्तब केल्यामुळे आता ही बंदी 72 तासांत लागू केली जाईल, असे ट्रम्प यांनी याआधीच स्पष्ट केले होते.  "तत्पूर्वी 7 मुस्लिमबहुल देशातील निर्वासितांना अमेरिकेमध्ये नो एन्टी लागू करण्यात आली होती. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हा फतवा काढला होता. राज्यांच्या न्यायालयांनी ट्रम्प यांचा निर्णय रद्द केल्यानंतर त्यांनी 6 देशांच्या नावाचा प्रतिबंध यादीत समावेश केला होता. या संबंधीचा एक नवा आदेश जारी करण्यात आला होता, याद्वारे 6 मुस्लिम देशांतील निर्वासितांनी अमेरिकेत येण्यास बंदी घालण्यात आली होती. कट्टर मुस्लिम दहशतवाद्यांपासून अमेरिकेचा बचाव करण्यासाठी हा निर्णय घेतल्याची सबब त्यावेळी ट्रम्प यांनी दिली होती. सीरिया, इराण, लीबिया, सोमालिया, सुदान, येमेन या 6 देशांचा यात समावेश होता. "कट्टर इस्लामिक दहशतवाद्यांना अमेरिकेबाहेर ठेवण्यासाठी हा उपाय असून, केवळ अमेरिकेला पाठिंबा देणा-या, अमेरिकेवर प्रेम करणा-यांचाच स्वीकार करू", असे ट्रम्प यांनी स्पष्ट केले होते. ट्रम्प यांच्या निर्णयामुळे किमान 4 महिने तरी या सात देशांतील निर्वासितांना अमेरिकेत प्रवेश मिळणार नव्हता. मात्र ट्रम्प यांच्या या निर्णयाला कालांतरानं अमेरिकेतील राज्यांनी स्थगिती दिली होती. त्यामुळे तो निर्णय लागू करण्यात आला नव्हता. अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयानं आता ट्रम्प यांच्या निर्णयावर शिक्कामोर्तब केल्यानं आता 6 मुस्लिमबहुल देशातील निर्वासितांवरील बंदी पुन्हा लागू होणार आहे.