शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
3
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
4
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
5
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
6
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
7
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
8
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
9
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
10
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
11
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
12
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
13
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
14
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
15
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
16
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
17
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश
18
खंडाळ्यात जुन्या वैमनस्यातून दोन गटात हिंसक हाणामारी; एकाचा मृत्यू, दोन जण जखमी
19
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
20
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI

ट्रम्प काही ऐकेनात, जगाची मदत रोखली; ६० अब्ज डाॅलरची मदत बंद करणार; ‘यूएसएड’च्या ९०% करारांना कात्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2025 04:37 IST

राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या आक्रमक धोरणामुळे ‘यूएसएड’ने ९० टक्के करारांना कात्री लावण्याचा निर्णय घेतला आहे. ट्रम्प प्रशासनाने यासंबंधीचा आराखडा सादर केला आहे. 

वाॅशिंग्टन : ‘यूएसएड’ अर्थात युनायटेड स्टेटस् एजन्सी फॉर इंटरनॅशनल डेव्हलपमेंटच्या माध्यमातून जगभरातील विविध देशांना अमेरिकेतून दिल्या जाणाऱ्या आर्थिक मदतीसंबंधीचे ९० टक्के करार संपुष्टात येतील. या माध्यमातून जगभरात दिल्या जाणाऱ्या ६० अब्ज डॉलरची मदत बंद केली जात आहे. यानंतर अगदी मोजक्या योजनाच सुरू राहतील. 

राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या आक्रमक धोरणामुळे ‘यूएसएड’ने ९० टक्के करारांना कात्री लावण्याचा निर्णय घेतला आहे. ट्रम्प प्रशासनाने यासंबंधीचा आराखडा सादर केला आहे. 

न्यायालयाचा हस्तक्षेप‘यूएसएड’च्या मदतनिधी कपातीच्या निर्णयात अमेरिकी संघीय सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी हस्तक्षेप केला. फेडरल न्यायालयाने ट्रम्प प्रशासनास इतर देशांना दिल्या जाणाऱ्या अब्जावधी डॉलरची मदत देण्याप्रकरणी मध्यरात्रीपर्यंत मुदत दिली होती. या आदेशाला तात्पुरती स्थगिती दिली. याबाबत वरिष्ठ न्यायालयात जोवर सर्वार्थाने विचार केला जात नाही तोवर ही स्थगिती कायम राहील.  (वृत्तसंस्था)

नेमके प्रकरण काय?ट्रम्प दुसऱ्यांदा सत्तेत आल्यानंतर ‘डोज’चे प्रमुख मस्क यांनी विविध देशांना दिल्या जाणाऱ्या निधीचे धोरण पैशाची नासाडी असल्याचे नमूद करीत हा निधी बंद करण्याची शिफारस केली. त्यानुसार ट्रम्प प्रशासनाने हा निधी बंद केला. 

व्हेनेझ्युएलास धक्काव्हेनेझ्युएलातून इंधन तेल काढून ते निर्यात करण्याची परवानगी असलेला अमेरिकी कंपनीचा परवाना ट्रम्प प्रशासनाने रद्द केला आहे. यामुळे या छोट्या देशाची आर्थिक नाडी आवळली जाणार असून, व्हेनेझ्युएलास आर्थिक अडचणींचा सामना करावा लागू शकतो. 

भारतीयांना अमेरिकी कंपन्यांत अशी मिळेल संधीअमेरिकेत प्रस्तावित ‘गोल्ड कार्ड’ योजनेमुळे तेथील कंपन्यांना हार्वर्ड आणि स्टॅनफोर्डसारख्या विद्यापीठांत शिकलेल्या भारतीय पदवीधारकांना नियुक्त करण्याची परवानगी मिळणार आहे. या योजनेत सुमारे ४४ कोटी रुपये शुल्क भरून अमेरिकेत राहण्याचा, काम करण्याचा अधिकार मिळेल. स्वत: ट्रम्प यांनी ही घोषणा केली आहे. म्हणजेच एखाद्या व्यक्तीकडे ग्रीन कार्ड असेल आणि हे एक गोल्ड कार्ड घेतले तर ग्रीन कार्डचे सर्व अधिकार त्याला मिळतील. शिवाय अमेरिकी नागरिकत्व मिळवण्याचे मार्गही मोकळे होतील. या ‘गोल्ड कार्ड’ खरेदीतून मोठा महसूल मिळवण्याचा ट्रम्प यांचा हेतू आहे. शिवाय, हेच श्रीमंत लोक अमिरिकेत वास्तव्यास राहिले तर मोठ्या प्रमाणात कर भरतील. विशेष म्हणजे रशियन लोकांनाही या योजनेचा लाभ देण्याचा ट्रम्प यांचा विचार असून काही रशियन लोक खूपच चांगले आहेत, ते ५ दशलक्ष डॉलर खर्च करू शकतात, असे ट्रम्प यांनी म्हटले आहे.

टॅग्स :Donald Trumpडोनाल्ड ट्रम्पAmericaअमेरिका