शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
6
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
7
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
8
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
9
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
10
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
11
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
12
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
13
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
14
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
15
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
16
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
17
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
18
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
19
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
20
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
Daily Top 2Weekly Top 5

डोनाल्ड ट्रम्प यांना आता कोणी रोखू शकणार नाही! अमेरिकन सिनेटने इराण युद्ध रोखणारे 'वार पॉवर्स बिल' फेटाळले

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2026 06:42 IST

US Senate rejects War Powers Bill Iran : इराण-अमेरिका युद्धाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेच्या राजकारणातून एक मोठी बातमी समोर आली आहे. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या युद्धखोर धोरणांना लगाम घालण्यासाठी आणलेला प्रस्ताव अमेरिकन सिनेटने फेटाळून लावला आहे. 

वॉशिंग्टन: मध्य-पूर्वेतील युद्ध भीषण वळणावर असतानाच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना मोठी राजकीय ताकद मिळाली आहे. इराणवरील लष्करी हल्ले थांबवण्यासाठी आणि ट्रम्प यांचे युद्धाचे अधिकार मर्यादित करण्यासाठी अमेरिकन सिनेटमध्ये आणलेला 'वार पॉवर्स बिल' फेटाळण्यात आला आहे. यामुळे आता इराणविरुद्धच्या लष्करी कारवाया सुरू ठेवण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

डेमोक्रॅटिक पक्षाने ट्रम्प यांच्या युद्ध करण्याच्या अधिकारांवर अंकुश ठेवण्यासाठी हा प्रस्ताव मांडला होता. मात्र, सिनेटमधील मतदानात हा प्रस्ताव टिकू शकला नाही, ज्यामुळे ट्रम्प प्रशासनाला मोठा दिलासा मिळाला आहे.

काँग्रेसच्या मंजुरीची गरज नाहीहा प्रस्ताव फेटाळला गेल्यामुळे, आता इराणवर पुढील हल्ले करण्यासाठी ट्रम्प यांना अमेरिकन काँग्रेसच्या वारंवार मंजुरीची आवश्यकता भासणार नाही. ते आपल्या अधिकारात लष्करी निर्णय घेऊ शकतील. बहुतांश रिपब्लिकन खासदारांनी ट्रम्प यांच्या धोरणांचे समर्थन केले असून, इराणचा धोका पाहता लष्करी कारवाई आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले आहे.

विरोधकांचा इशारादुसरीकडे, हा प्रस्ताव फेटाळल्यामुळे अमेरिका एका मोठ्या आणि अनियंत्रित युद्धाच्या खाईत ढकलली जाण्याची भीती विरोधकांनी व्यक्त केली आहे.

युद्धावर होणारा परिणामसिनेटच्या या निर्णयामुळे आता ट्रम्प प्रशासन इराणमधील महत्त्वाच्या लष्करी आणि अणू तळांवर अधिक आक्रमकपणे हल्ले करू शकते. ट्रम्प यांनी आधीच जाहीर केले आहे की, हे युद्ध आगामी चार आठवडे सुरू राहू शकते. आता कायदेशीर अडथळा दूर झाल्याने इराण-अमेरिका संघर्ष अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Trump Unstoppable: US Senate Rejects Iran War Powers Bill!

Web Summary : The US Senate rejected the 'War Powers Bill,' empowering President Trump to continue military actions against Iran without congressional approval. Republicans supported Trump, citing Iran's threat. Opponents fear escalation towards a larger, uncontrolled conflict. This decision allows Trump to aggressively target Iranian military sites.
टॅग्स :IranइराणAmericaअमेरिकाwarयुद्धDonald Trumpडोनाल्ड ट्रम्प