शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: गौतमी पाटीलला उचलायचं की नाही?; मंत्री चंद्रकांत पाटील यांचा डीसीपींना फोन, म्हणाले...
2
राज्यात पुन्हा बरसणार! या जिल्ह्यांमध्ये 'शक्ती' चक्रीवादळाचा इशारा; जोरदार वाऱ्यांसह मुसळधार पाऊस
3
पुतिन यांच्या भेटीआधी भारताला मोठं बळ! S-400 हवाई संरक्षण प्रणालीची एक नवीन खेप येणार
4
गुंतवणुकीचा पॅटर्न बदलला: आता लोक बँकांऐवजी शेअर बाजाराकडे वळले? बँकांसाठी मध्यम-दीर्घकाळात आव्हान
5
ज्योती मल्होत्रानंतर आणखी २ युट्यूबर अटकेत; पाकिस्तानसाठी हेरगिरी करत असल्याचा आरोप
6
रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडाने केली गुपचूप एंगेजमेंट, या दिवशी घेणार सातफेरे
7
Step UP SIP: मुलांचं शिक्षण होऊ शकतं फ्री, तरीही वाचू शकतात ५० लाख रुपये; 'हा' प्लान टेन्शनला करेल बाय-बाय
8
रहस्यमय! ६० विमा पॉलिसी, ३९ कोटी अन् ३ हत्या; आई-बाप आणि पत्नीच्या मृत्यूचा 'त्याने' केला सौदा
9
' भारतीय अपमान सहन करीत नाहीत, अमेरिकेच्या दबावापुढे भारत कधीच झुकणार नाही' : पुतिन
10
अमेरिकेच्या 'H-1B' निर्णयाने जगभरातील संधींचे दरवाजे उघडले! कॅनडा-जर्मनीचा नवा गेम प्लॅन, भारतीयांना मोठा फायदा
11
आजचे राशीभविष्य- ४ ऑक्टोबर २०२५: पैशांच्या गुंतवणुकीवर लक्ष द्या, कमी वेळात जास्त लाभ घेण्याची लालसा सोडा
12
...तर पाकिस्तान जागतिक नकाशावर दिसणार नाही! भारतीय लष्करप्रमुखांनी खडसावले 
13
अमेरिकी रस्त्यावर भारतीय बाइक्सने अभिमान वाटतो; राहुल यांनी अमेरिकेत केला भारतीय कंपन्यांचा गौरव
14
लेह हिंसाचार : सोनम वांगचुक यांना अटक; न्याय मागण्यासाठी पत्नी कोर्टात
15
‘बाबा’ विद्यार्थिनींना रात्री खोलीत येण्यास भाग पाडायचा; मिळाली १४ दिवस कोठडी
16
आता सौरऊर्जेवर चालणारी ई-बुलेट आली; ऊर्जाबचत, प्रदूषण नियंत्रणासाठी मोठा फायदा
17
नवी मुंबई विमानतळास दि. बा. पाटील यांचेच नाव; नामकरणासाठी पंतप्रधान मोदी सकारात्मक : मुख्यमंत्री 
18
अमेरिकेच्या टॅरिफ संकटात भारतासह युरोपियन देशांची भूमिका मोलाची; स्वेन ओस्टबर्ग यांचे मत
19
संपादकीय : आता खरी लढाई! मेळावे झाले, घोषणा झाल्या... आता सीमोल्लंघन कधी?
20
पाणंद रस्ते मोकळे करा,  तरच मिळेल सरकारी लाभ; प्रस्ताव विचाराधीन

डोनाल्ड ट्रम्प यांचा आता भारतालाही इशारा, 'अमेरिकन आयातीवरचा कर घटवा नाहीतर तुमच्यावरही तसाच कर लादू'

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2018 08:56 IST

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतासहीत चीनला धमकीवजा इशारा दिला आहे.

वॉशिंग्टन - अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत आणि चीनला धमकीवजा इशारा दिला आहे. ''अमेरिकन आयातीवरचा कर घटवा नाहीतर तुमच्यावरही तसाच कर लादू", असा इशारा ट्रम्प यांनी दिला आहे. '' दुस-या देशांच्या तुलनेत अमेरिकेकडून सामानांच्या आयतीवरील कर कमी प्रमाणात लावला जातो, मात्र दुसरे देश आमच्या सामानांवर जास्त कर लावत आहेत. त्यामुळे हे देश जर कर घटवणार नसतील तर आम्हीदेखील तसाच कर लादू'', असा धमकीवजा इशारा ट्रम्प यांनी दिला आहे. 

दरम्यान,  डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या 'नेशन फर्स्ट' या धोरणाला अनुसरून एक मोठा निर्णय घेतला आहे. त्यांनी अमेरिकेत आयात केल्या जाणाऱ्या स्टील आणि अॅल्युमिनियमवर मोठ्याप्रमाणावर कर लादला आहे. फक्त कॅनडा आणि मेक्सिको या दोन देशांना यामधून सूट देण्यात आली आहे. ट्रम्प यांच्या या निर्णयामुळे आंतरराष्ट्रीय उद्योगक्षेत्रात मोठी खळबळ माजली असून त्यामुळे भविष्यात जागतिक व्यापारयुद्ध छेडले जाण्याची शक्यता आहे. सध्या अमेरिकन उद्योगांना काही चुकीच्या व्यापार धोरणांमुळे झळ सोसावी लागत आहे. स्टील आणि अॅल्युमिनियच्या आयातीवर कर लादल्याने या क्षेत्रातील अमेरिकन उद्योगांना चालना मिळेल, असे ट्रम्प यांनी सांगितले. मात्र, अनेक देशांनी ट्रम्प यांच्या या निर्णयावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. तज्ज्ञांच्या मतानुसार, या निर्णयाचे आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठे पडसाद उमटू शकतात. भारतालाही याचा खूप मोठा फटका बसू शकतो. त्यामुळे भविष्यात जागतिक व्यापारयुद्ध छेडले जाण्याची शक्यता आहे. ट्रम्प यांच्या नव्या धोरणानुसार पोलादावर 25 टक्के आणि अॅल्युमिनियमवर 10 टक्के इतका कर आकारला जाईल. येत्या 15 दिवसांत या निर्णयाची अंमलबजावणी होईल. फक्त कॅनडा आणि मेक्सिको या दोन देशांना यामधून वगळण्यात आले आहे. ट्रम्प यांच्या या निर्णयाला रिपब्लिकन पक्षातील अनेक सिनेटर्स आणि अमेरिकेशी व्यापारी भागीदारी असणाऱ्या कंपन्यांनी विरोध केला आहे. मात्र, ट्रम्प यांनी आमचे सरकार अधिक निपक्षपाती आमि लवचिक होत असल्याचे म्हटले. निवडणुकीच्यावेळी दिलेल्या आश्वासनानुसार आमचे सरकार अमेरकिन कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी कटिबद्ध असल्याचे ट्रम्प यांनी म्हटले. 

टॅग्स :Donald Trumpडोनाल्ड ट्रम्पIndiaभारतchinaचीनTaxकर