अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आसियान (ASEAN) शिखर परिषदेसाठी मलेशियातील कुआलालंपूर येथे पोहोचले आहेत. येथे पोहोचल्यानंतर विमानतळावर त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. यावेळी ट्रम्प यांनी विमानातून उतरताच ढोल-ताशांच्या तालावर ठेका धरत डान्स करून सर्वांनाच आश्चर्यचकित केले. ट्रम्प यांच्या या डान्सचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जबदस्त व्हायरल होत आहे.
'एअर फोर्स वन'जवळ, विमानतळाच्या टरमॅकवर ढोल ताशांच्या तालावर ट्रम्प यांना अतिशय उत्साहत नाचताना पाहून, तेथील उपस्थित लोकांच्या चेहऱ्यावरही आनंद आणि हसू दिसत होते. या वेळी मलेशियाचे पंतप्रधान अनवर इब्राहिम हे देखील उपस्थित होते. त्यांनीही ट्रम्प यांच्या या अनौपचारिक स्टाईलकडे पाहून स्मितहास्य केले. ट्रम्प यांच्या हा अंदाजाला 'मजेदार आणि अनौपचारिक' असल्याचे लोक म्हणत आहेत.
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये डोनाल्ड ट्रम्प मलेशियातील मुख्य जाती समूह, बोर्नियोचे मूलनिवासी, मलय, चीनी आणि भारतीयांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या रंगीबेरंगी पारंपरिक वेशभूषा परिधान केलेल्या डान्सर्ससोबत नाचताना दिसत आहेत.
पाहा व्हिडिओ -
ट्रम्प तीन देशांच्या दौऱ्यावर -आसियान शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी ट्रम्प तीन देशांच्या दौऱ्यावर आहेत. मलेशियानंतर ते जपान आणि दक्षिण कोरियाला भेट देतील. या दौऱ्यादरम्यान, २०१९ नंतर ते प्रथमच उत्तर कोरियाचे नेते किम जोंग उन यांची भेट घेऊ शकतात, अशी शक्यता आहे.
Web Summary : Donald Trump danced to drums upon arrival in Malaysia for the ASEAN summit, stunning onlookers, including Prime Minister Anwar Ibrahim. Trump's informal style was met with smiles and amusement. He's on a three-nation tour, possibly meeting Kim Jong Un.
Web Summary : आसियान शिखर सम्मेलन के लिए मलेशिया पहुंचने पर डोनाल्ड ट्रम्प ढोल की थाप पर नाचे, प्रधानमंत्री अनवर इब्राहिम सहित दर्शक दंग रह गए। ट्रम्प की अनौपचारिक शैली को मुस्कुराहट और मनोरंजन के साथ मिला। वह तीन देशों के दौरे पर हैं, संभवतः किम जोंग उन से मिलेंगे।