कीव्ह : रशिया-युक्रेन युद्ध संपवण्यासाठी आपण केलेल्या शांतता प्रस्तावावर युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी अद्याप सही केलेली नाही आणि तो स्वीकारण्यासही ते तयार नसल्याचे वक्तव्य अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केले.
शनिवारी युक्रेन युद्ध संपुष्टात आणण्यासाठी अमेरिकेच्या प्रस्तावावर युक्रेनच्या शिष्टमंडळाची तीन दिवस सुरू असलेली चर्चा संपली. यावर रविवारी ट्रम्प यांनी युक्रेन ही चर्चा पुढे नेण्यास फारसे उत्सुक नाहीत, असे सांगितले. अमेरिकेचे प्रयत्न स्वागतार्ह
ट्रम्प यांच्या विधानावर झेलेन्स्की यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. पण अमेरिकेसोबत झालेली चर्चा शांततेसाठी महत्त्वाची आहे. युक्रेन शांततेसाठी कटिबद्ध असल्याची झेलेन्स्की यांनी प्रतिक्रिया दिली. रशियानेही अमेरिकेच्या प्रयत्नांचे स्वागत केले. अमेरिकेची योजना रशियाच्या दृष्टिकोनाशी सुसंगत असल्याची प्रतिक्रिया रशियाने दिली.
रशियाचे हल्ले सुरूच
तीन दिवसांची चर्चा संपत असताना, शनिवारी आणि रविवारी रशियाने युक्रेनवर क्षेपणास्त्र, ड्रोन हल्ले आणि गोळीबार केला. यात चार नागरिक ठार झाले. युक्रेनची ऊर्जा संयंत्रे निकामी करण्यासाठी रशियाचे हल्ले सुरूच असल्याचा त्यांच्यावर आरोप होत आहे.
Web Summary : Trump says Zelenskyy hasn't accepted the US peace proposal. Russia continues attacks, despite peace talks. Ukraine affirms commitment to peace, while Russia welcomes US efforts.
Web Summary : ट्रंप का कहना है कि जेलेंस्की ने अमेरिकी शांति प्रस्ताव स्वीकार नहीं किया। शांति वार्ता के बावजूद रूस ने हमले जारी रखे हैं। यूक्रेन ने शांति के प्रति प्रतिबद्धता जताई, रूस ने अमेरिकी प्रयासों का स्वागत किया।