शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

झेलेन्स्की यांचा कॉल ट्रम्प यांनी स्पीकरवर टाकला! सोबत होते इलॉन मस्क; त्या 7 मिनिटांत काय-काय झालं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2024 11:42 IST

निवडणुकीच्या पहिल्याच संबोधनात ट्रम्प यांनी झेलेन्स्की यांच्यावर जोरदार निशाणा साधत त्यांना 'सेल्समन', म्हटले होते.

अमेरिकन राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीतील विजयानंतर जगभरातील अनेक नेते डोनाल्ड ट्रम्प यांना शुभेच्छा देत आहेत. माध्यमांतील वृत्तांनुसार, मतमोजणीच्या दुसऱ्या दिवशी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेंस्की यांनी शुभेच्छा देण्यासाठी ट्रम्प यांना फोन केला होता. यावेळी ट्रम्प आणि इलॉन मस्क सोबतच होते. मस्क यांनीही झेलेन्स्की यांच्यासोबत संवाद साधला. सीएनएनने दिलेल्या वृत्तानुसार चर्चा सकारात्मक राहिली.

सात मिनिटे चालला कॉल -माध्यमांतील वृत्तांनुसार, ट्रम्प Mar-a-lago या आपल्या निवासस्थानी इलॉन मस्क यांच्यासोबत होते. याचवेळी झेलेन्स्की यांचा ट्रम्प यांना शुभेच्छा देण्यासाठी कॉल आला. ट्रम्प यांनी फोन स्पीकर मोडवर केला. यावेळी ट्रम्प यांच्याबरोबरच मस्क यांनीही झेलेन्स्की यांच्यासोबत चर्चा केली. झेलेन्स्की यांनी रशियाविरोधातील युद्धात युक्रेनला स्टारलिंकच्या माध्यमाने कम्युनिकेशनची सुविधी निर्माण करून दिल्याबद्दल मस्क यांचे आभार मानले.

माध्यमांनी सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, हा कॉल साधारणपणे 7 मिनिटे चालला. यात कसल्याही प्रकारच्या पॉलिसीसंदर्भात चर्चा झाली नाही. यासंदर्भात झेलेन्स्की यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट करत, झेलेन्स्की यांनी बुधवारी ट्रम्प यांना फोन केला आणि विजयाबद्दल शुभेच्छा दिल्या, असे लिहिले आहे.

झेलेन्स्की यांना 'सेल्समन' म्हणाले आहेत ट्रम्प -खरे तर, अमेरिकन राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांच्या झालेल्या विजयाने युक्रेनचे टेन्शन वाढू शकते. कारण, रशियासोबत गेल्या साधारणपणे तीन वर्षांपासून सुरू असलेल्या युद्धात युक्रेन परदेशी लष्करी मदतीवर अवलंबून आहे. यात अमेरिका युक्रेनला मोठ्या प्रमाणावर मदत करत आहे. याच वेळी, रशियासोबत सुरू असलेल्या युद्धात युक्रेनला मिळणाऱ्या अमेरिकन लष्करी आणि आर्थिक मदतीवर ट्रम्प यांनी टीका केली होती.

निवडणुकीच्या पहिल्याच संबोधनात ट्रम्प यांनी झेलेन्स्की यांच्यावर जोरदार निशाणा साधत त्यांना 'सेल्समन', म्हटले होते. तसेच बायडेन प्रशासनावर अमेरिकन नागरिकांच्या टॅक्सचा पैसा त्यांच्यावर खर्च करण्याऐवजी, युद्धात दुसऱ्या देशांना मदत करण्यासाठी खर्च करत आहेत.

टॅग्स :Donald Trumpडोनाल्ड ट्रम्पelon muskएलन रीव्ह मस्कRussia Ukrainयुक्रेन आणि रशिया