शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

उत्तर कोरियाविरोधात सर्व पर्यायांवर विचार सुरू- व्हाइट हाऊस

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2017 11:33 IST

उत्तर कोरियाविरोधात सर्व पर्यायांवर विचार सुरू असल्याचं व्हाइट हाऊसनं स्पष्ट केलं आहे.

ठळक मुद्देउत्तर कोरियाविरोधात सर्व पर्यायांवर विचार सुरू असल्याचं व्हाइट हाऊसनं स्पष्ट केलं.राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प या पर्यायांना सार्वजनिक करणार नाहीत, असंही व्हाइट हाऊसकडून जारी करण्यात आलं.अमेरिकेचा संरक्षण विभाग सहयोगी देशांचं संरक्षण करण्यास आणि उत्तर कोरियाशी कोणत्याही परिस्थितीत दोन हात करण्यासाठी तयार आहे.

वॉशिंग्टन, दि. 1 - उत्तर कोरियाविरोधात सर्व पर्यायांवर विचार सुरू असल्याचं व्हाइट हाऊसनं स्पष्ट केलं आहे. उत्तर कोरियानं आंतरखंडीय बॅलिस्टिक मिसाइल(आयसीबीएम)ची चाचणी घेऊन आंतरराष्ट्रीय नियमांचं उल्लंघन केल्यानंतर आता अमेरिकेनंही उत्तर कोरियावर कारवाईसाठी सर्व पर्यायांचा विचार सुरू असल्याचे सूतोवाच केले आहेत. मात्र राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प या पर्यायांना सार्वजनिक करणार नाही, असंही व्हाइट हाऊसकडून जारी करण्यात आलं आहे. व्हाइट हाऊसचे प्रवक्ते सारा सेंडर्स यांनी एका संमेलनात याची माहिती दिली आहे. राष्ट्राध्यक्ष कोणत्याही पर्यायाला सार्वजनिक करणार नाहीत, मात्र सर्व पर्यायांवर विचार सुरू आहे.तर पेंटागॉनच्या माहितीनुसार, अमेरिकेचा संरक्षण विभाग सहयोगी देशांचं संरक्षण करण्यास आणि उत्तर कोरियाशी कोणत्याही परिस्थितीत दोन हात करण्यासाठी तयार आहे. उत्तर कोरियानं आयसीबीएस या बॅलिस्टिक मिसाइलची चाचणी गेतल्यानं काहीत तासांतच अमेरिका आणि दक्षिण कोरियाच्या सेनेनं पाच संयुक्त सैन्य अभ्यास केला होता.उत्तर कोरियानं केलेल्या क्षेपणास्त्र चाचणीनंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्विट करत चीनवर नाराजी व्यक्त केली होती. ट्रम्प म्हणाले होते, मी चीनमुळे खूप निराश आहे. आमच्या मागच्या नेत्यांनी त्यांना व्यापारात करोडो डॉलर कमावण्याची मोकळीक दिली होती. चीन उत्तर कोरियाच्या मुद्द्यावर अमेरिकेसाठी काहीच करू शकत नाही. चीननं वार्तालापाशिवाय उत्तर कोरियाशी अमेरिकेचे संबंध सुधारण्यासाठी कोणताच प्रयत्न केला नाही. चीन ही समस्या चुटकीसरशी सोडवू शकत होता. मात्र हे जास्त दिवस चालणार नाही, ही समस्या तात्काळ निकालात काढणार आहोत. अमेरिका सहयोगी देशांच्या संरक्षणाखातर शक्य ते सर्व प्रयत्न करणार असल्याचंही ट्रम्प म्हणाले होते. त्यानंतर चीनचं सरकारी वृत्तपत्र ग्लोबल टाइम्समधून ट्रम्प यांच्यावर हल्लाबोल करण्यात आला होता.ट्विटवरून ट्रम्प यांचा मूड समजतो. उत्तर कोरियानं आंतरखंडीय बॅलेस्टिक क्षेपणास्त्र चाचणी केल्याचं ऐकिवात आहे. उत्तर कोरियानं न्यूयॉर्कसह संपूर्ण अमेरिकेवर हल्ला करण्याची क्षमता प्राप्त झाल्याचा दावाही केला आहे. ट्रम्प यांच्यासाठी ही लाजिरवाणी गोष्ट ठरतेय. ज्यांनी उत्तर कोरियाच्या क्षेपणास्त्र चाचणीला सर्वाधिक महत्त्व दिलं आहे, असं ग्लोबल टाइम्समधून छापून आलं आहे. उत्तर कोरियावर कोळसा आयात करण्यात बंदी घालण्यात आली आहे. चीनच्या प्रतिबंधामुळे दोन्ही देशांतील संबंध बिघडले आहेत. स्वतःच्या शेजारील देशांची व्यापार करताना चीनला मोठी किंमत चुकवावी लागली आहे. चीन उत्तर कोरियाची समस्या चुटकीसरशी सोडवू शकतो, ट्रम्प यांचं हे विधान फक्त अनुभव नसलेला राष्ट्राध्यक्षच देऊ शकतो. ज्यांना उत्तर कोरियाच्या अण्वस्त्र कार्यक्रमाबाबत फार काही माहिती नाही, असंही ग्लोबल टाइम्समधून छापून आले होते.